लॉकडाऊनमध्ये मजुरांनी ‘पार्ले-जी’ बिस्किटांवर शमवली भूक; कंपनीनं विक्रीचा 82 वर्षांचा विक्रम मोडला!

मुंबई । लॉकडाऊनदरम्यान शहरातून गावाला जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांसाठी पार्ले-जी बिस्कीटं संजिवनी देणारी ठरली. लॉकडाऊन काळात आर्थिक संकटात सापडलेल्या मजुरांना परवडणाऱ्या पार्ले-जी बिस्किटांवरच आपली भूक शमवावी लागली. याचाच परिणाम म्हणून पार्ले-जीची एवढी विक्री झाली की मागील ८२ वर्षांचा विक्रम मोडला आहे. केवळ ५ रुपयांचा पार्ले-जी बिस्किटाचा पुडा शेकडो-हजारो किमी पायपीट करणाऱ्या मजुरांच्या भुकेला आधार होतं. काहींनी … Read more

सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच- फडणवीस

मुंबई । अभिनेता सोनू सूद याच्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुरूच आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावर मत मांडलं आहे. ‘सोनू सूद भाजपचे आहेत असं जर शिवसेना म्हणत असेल तर आम्हाला आनंदच आहे. असं असलं तरी सोनू सूद यांच्यावर अन्याय होता कामा नये. त्यांनी स्वत:च्या हिंमतीवर एक … Read more

स्थलांतरीत मजुरांना १५ दिवसात त्यांच्या गावी सोडा; सुप्रीम कोर्टाचे राज्यांना निर्देश

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे देशातील विविध ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरीत मजुरांच्या मुद्द्यांवरून सुप्रीम कोर्टाने आज राज्यांना डेडलाइन दिली आहे. स्थलांतरीत मजुरांना १५ दिवसांत त्यांच्या गावी सोडा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने राज्यांना दिले आहेत. स्थलांतरीत मजुरांसबंधीच्या याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने राज्यांना आणखी हे निर्देश दिले आहेत. देशातील विविध ठिकाणी अडकलेल्यासर्व स्थलांतरीत मजुरांना आपल्या गावी सोडण्यासाठी राज्यांना … Read more

मजुरांनी कामावर परतावं म्हणून बिल्डरनं केली थेट विमान तिकिटांची सोय

हैद्राबाद । देशात कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलतात दिल्यांनतर आता अनेक राज्यांतील आपल्या घरी परतलेल्या श्रमिकांना परत बोलावण्याचं मोठं आव्हान आता उद्योग जगतासमोर उभं आहे. यात उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, छत्तीसगड राज्यातील मजुरांची संख्या अधिक आहे. दरम्यान, हैदराबादमधल्या एका बिल्डरनं मजुरांना कामावर परत आणण्यासाठी एक कमालीची शक्कल लढवली आहे. या बिल्डरनं आपल्या कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणाऱ्या मजुरांना … Read more

जेव्हा एक भाजप आमदार सरकार सोडून सोनू सूदला मदतीसाठी हाक मारतो..

नवी दिल्ली । कोरोना आणि लॉकडाऊनमुळे पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी भाजपच्या एका आमदार महाशयांनी अभिनेता सोनू सूद याच्याकडे मदतीची मागणी केली. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अडकलेल्या मजुरांना त्यांच्या घरी जाण्याची व्यवस्था सोनू करत आहे. दरम्यान, मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यातील भाजपचे आमदार राजेंद्र शुक्ला यांनी श्रमिकांना आपल्या राज्यात परत आणण्यासाठी सोनू सूद … Read more

धक्कादायक! श्रमिक रेल्वेमध्ये आतापर्यंत ८० मजुरांचा मृत्यू

नवी दिल्ली । लॉकडाऊनमुळे काळात अडकून पडलेल्या श्रमिकांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी चालवण्यात आलेल्या श्रमिक रेल्वेमध्ये जवळपास ८० प्रवाशांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर येतं आहे. १ मे ते २७ मे पर्यंत तब्बल ३८४० विशेष रेल्वे चालवण्यात आल्या. याद्वारे जवळपास ५० लाख स्थलांतरीत मजूर आपल्या घरी पोहचले. परंतु, श्रमिक रेल्वेने घरी निघालेल्या जवळपास ८० मजुरांचा त्याच्या … Read more

मजुरांचा ‘मसीहा’ सोनू सूद मुंबईत फक्त साडे पाच हजार रुपये घेऊन आला होता

मुंबई । बॉलिवूड अभिनेता सोनू सूद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात अचानक लॉकडाऊन करण्यात आलं. यामुळे असंख्य मजुरांची गैरसोय झाली. हाताचे काम गेले. उपासमारीची वेळ आली. घरी जाण्याचे रस्ते बंद झाले. अशा संकटाच्या परिस्थितीत सोनू सूद मजुरांच्या मदतीला धावून आला. सोनूने या मजुरांची अडचण ओळखत त्यांना बसने त्यांच्या गावी पाठवायला गेल्या काही … Read more

अशाप्रकारे सेहवागने सुरु केले स्थलांतरित मजूरांसाठी ‘घर से सेवा’ अभियान

नवी दिल्ली । कोरोनाच्या साथीनं निर्माण झालेल्या परिस्थितीत देशभरात विविध ठिकाणी अडकलेले आहेत. लॉकडाउनमूळ काम ठप्प आहे. त्यामुळे अनेकांचे हातचे काम गेले आहे. अशा बिकट परिस्थितीत मजुरांवर उपासमारीचेही वेळ आली आहे. अशा मजूरांना मदत करण्यासाठी अनेक संस्था, विविध क्षेत्रातील सेलिब्रिटी, तसेच इतर काही जण वैयक्तिक पातळीवर जमेल तशी मजूरांना मदत करत आहेत. भारताचा माजी क्रिकेटपटू … Read more

फडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा, म्हणाले ‘हा’ घ्या पुरावा

मुंबई । महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं. हा सगळा वाद सुरू असताना स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून स्यू मोटू … Read more

राज्यपाल कोश्यारींनी सोनू सूदला लावला फोन, अन मग..

मुंबई । सध्या सोशल मीडियावर स्थलांतरित मजुरांच्या मदतीला धावून जाणाऱ्या अभिनेता सोनू सूदवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. मजूर आणि कामगारांना त्यांच्या  घरी पोहोचवण्याच्या सोनूच्या कामाची सर्वत्र प्रशंसा होत आहे. आज स्थलांतराची मजुरांसाठी तो मसीहा बनला आहे. उत्तर प्रेदश, बिहार, कर्नाटक येथील हजारो मजूर आणि श्रमिकांनी त्यानं स्वखर्चानं बसची सोय करून घरी सुखरुप पोहोचवलं आहे. त्याच्या … Read more