”मी CAA ला समर्थन दिलेलं नाही”- राज ठाकरे

मनसेच्या पहिल्या महाअधिवेशनात राज ठाकरे यांनी घुसखोरांना हाकलून देण्यासाठी येत्या ९ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानावर मोर्चा काढण्याची घोषणा केली होती. या घोषणेनंतर राज ठाकरे यांनी सीएए आणि एनआरसीला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दर्शवला होता.मात्र, आता राज यांनी याबाबत आता नवीन खुलासा करत मी सीएएला कधीही समर्थन दिलेलं नसल्याचं म्हटलं आहे.

महाअधिवेशनात राज ठाकरेंचा फुसका बार; माध्यमांतील फुटेज खात, जुन्याच गोष्टी सांगत केली ‘महानिराशा’

२३ जानेवारी २०२० बाळासाहेब ठाकरे यांची ९४ वी जयंती. याच दिवशी महाराष्ट्रातील दोन मोठ्या नेत्यांनी शक्तिप्रदर्शनाची तयारी करत माध्यमांची फुटेज सकाळपासूनच खायला सुरुवात केली होती. एक होते अपघाताने राज्याचे मुख्यमंत्री झालेले उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्नरंजन करत धुव्वाधार भाषणं देणारे राज ठाकरे. यात राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने झेंडा बदलणे, महाअधिवेशन घेणे, अमित ठाकरे यांना सक्रिय राजकारणात उतरवणे आणि विधानसभा निवडणुकीनंतर आपली काय भूमिका आहे ते मांडणे हे सांगण्यासाठी मजबूत खटाटोप केला.

‘मी झेंड्याचा रंग बदलला, रंग बदलून सरकारमध्ये गेलो नाही!’; राज ठाकरेंनी लगावला शिवसेनेला टोला

राज ठाकरे यांनी आज मनसेच्या महाधिवेशनाची सुरुवात मराठी बांधवानो अशी न करता माझ्या तमाम हिंदू बंधुनो अशी केली. आपल्या भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना झेंडा आवडला का असा प्रथम सवाल केला. कार्यकत्यांचा उस्फुर्त प्रतिसाद मिळताच राज ठाकरे यांनी अधिवेशनाला झेंड्याचा रंग बदलला म्हणून मी रंग बदलणार नाही. मी रंग बदलून सरकारमध्ये जात नसल्याचा टोला शिवसेनेला लगावला.

मी आजही मराठी आणि हिंदूच मात्र, प्रत्येकाने आपला धर्म घरातच पाळावा – राज ठाकरे

पक्षांच्या अधिवेशनांची परंपरा कमी होत असताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अधिवेशन घ्यायची गरज वाटत होती असं म्हणत राज ठाकरेंनी २३ तारखेला घेतलेल्या अधिवेशनाविषयी स्पष्टता दिली. सोशल मीडिया वापरताना कोणतीही वाईट गोष्ट पदाधिकाऱ्यांनी पोस्ट करायची नाही अशी स्पष्ट तंबी राज ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना दिली. तुमच्या भावना महत्वाच्या असल्या तरी पद नावाच्या गोष्टीचा विचार व्हायलाच हवा असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.

मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा; मनसे हिंदुत्वाच्या वाटेवर..

मनसेच्या व्यासपीठावर पहिल्यांदाच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा लावण्यात आली. मनसेच्या व्यासपीठावर सावरकरांची प्रतिमा दिसून आल्यानं राज ठाकरे उजव वळण घेत हिंदुत्वाच्या वाटेवर आपली राजकीय वाटचाल करणार असल्याचे संकेत मिळत आहेत. 

‘राज’पुत्र अमित ठाकरेंचं आज राजकीय लॉन्चिंग?

अमित ठाकरे यांचं राजकीय लॉन्चिंग आज होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी याबद्दल बोलताना, अमित ठाकरे यांच्यावर राजकीय जबाबदारी दिली जावी अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.

मनसेच्या नव्या झेंड्याचं अनावरण; नव्या झेंड्यावर शिवमुद्राचं

मनसेच्या नव्या झेंड्याच अनावरण आज राज ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या नवीन झेंड्यावर रेल्वे इंजिन जाऊन त्याची जागी शिवमुद्रा दिसत आहे

”शिवसैनिकांनो मनसेचा झेंडा हाती घ्यायची हीच ती वेळ”

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन उद्या मुंबईत पार आहे. हे अधिवेशन मनसेला दिशा देणारं ठरणारं आहे. उद्याच्या अधिवेशनानंतर मनसे हिंदुत्ववादाची कास धरणार असल्याचीही जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतांना मसेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी शिवसैनिकांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा झेंडा हाती घेण्याचं आवाहन केलं आहे. बाळासाहेबांच्या जयंतीला ‘मन से’ सामील व्हा असं आवाहन करणारं ट्विट त्यांनी केलं आहे.

मनसेच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पक्षाचा झेंडा गायब, उरलं केवळ इंजिन

मनसेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटरवरुनही मनसेचा झेंडा गायब झाला आहे. केवळ इंजिनाचा फोटो या दोन्ही प्रोफाईलवर दिसत आहे. यापूर्वी चार रंगाच्या झेंड्यावर रेल्वे इंजिनचे चिन्ह होते.

राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र ; पंचायत समितीत भाजप – मनसे युती?

पालघर प्रतिनिधी | मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो एकाच बॅनरवर झळकले आहेत. पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यात हा प्रकार घडला आहे. राज ठाकरे आणि नरेंन्द्र मोदी एकाच बॅनरवर दिसल्याने कार्यकर्ते मात्र चांगलेच संभ्रमात पडले आहेत. लाव रे तो व्हिडिओ च्या माध्यमातून राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पंतप्रधान मोदींविरोधात रान पेटवले … Read more