खासदार हेमंत पाटील यांच्यावर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल, लवकरच होणार अटक? डिनला स्वच्छतागृह साफ करायला लावणं अंगलट

Hemant Patil

Nanded News : डॉ.शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात सोमवारी ३१ हुन अधिक रुग्णांचा मृत्यू (Nanded Deaths) झाल्याचे समोर आले आहे. औषंधाचा पुरेसा साठा उपलब्ध नसल्याने शासकीय रुग्णालयात नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याचे बोलले जात आहे. यामध्ये १२ नवजात बालकांचाही समावेश असल्याने या घटनेनंतर सरकारवर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यांनतर आता शिवसेना खासदार हेमंत … Read more

खासदार इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन 

औरंगाबाद – औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांना धमक्यांचे फोन येत आहे. याबाबत स्वतः जलील यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. यात एक राणे समर्थक असल्याचे त्यांनी सांगितले आहे. याकडे महाराष्ट्रातील गृहविभाग लक्ष देत नसल्याचा आरोप जलील यांनी केला आहे. खुलताबाद येथील औरंगजेब यांच्या कबरीवर गेल्यामुळे फोनवरुन धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले.   मुख्यमंत्री … Read more

खासदार श्रीनिवास पाटील यांची लग्नाच्या वाढदिवसानिमीत्त खास पोस्ट; म्हणाले…

shrinivas patil history in marathi love story

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । साताऱ्याचे खासदार श्रीनिवास पाटील आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. एक सनदी अधिकारी ते लोकसेवा करणारा राजकारणी असा खासदार पाटील यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. सिक्कीमचे राज्यपाल असतानाची कामगिरी असो व भारतीय प्रशासकीय सेवेतील काम असो, प्रत्येकच ठिकाणी पाटील यांनी आपल्या कामाचा एक वेगळा ठसा उमटवला आहे. आज खासदार पाटील यांच्या लग्नाचा … Read more

मेट्रोच्या डीपीआरवर 7.5 कोटींची उधळपट्टी कशाला ? जलील यांचा सवाल

imtiaz jalil

औरंगाबाद – औरंगाबाद शहरात स्मार्ट सिटी प्रकल्पातंर्गत 7.5 कोटी रुपये खर्च करुन मेट्रोलाईन डीपीआर तयार करण्याचे काम सुरु आहे. या कामाला तत्काळ स्थगिती देऊन नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या विकास कामांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. या आशयाचे पत्र त्यांनी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांना पाठवले … Read more

महापुरुषांच्या पुतळ्यातून तुम्हाला प्रेरणा मिळत नसावी; सेना-एमआयएम पुन्हा आमने-सामने

Danve

औरंगाबाद – शहरातील सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा न उभारता त्या पैशातून सैनिकी शाळा सुरु करावी, अशी मागणी खासदार इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली होती. यावरून आता शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत प्रतिउत्तर दिले आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष आ. अंबादास दानवे यांनी, महाराणा प्रताप देशाचा गौरव होते, कदाचित तुम्हाला महापुरुषांच्या पुतळ्यातून प्रेरणा … Read more

पुतळ्यावर करोडो रुपये खर्च करण्याऐवजी सैनिक शाळा सुरू करा – इम्तियाज जलील

imtiyaj jalil

औरंगाबाद – शहरातील सिडको कॅनॉट परिसरामध्ये महाराणा प्रताप यांचा पुतळा उभारण्यासाठी 1 कोटी रुपये खर्च करण्याऐवजी त्यांच्या नावाने ग्रामीण भागातील युवक व युवतींना राष्ट्रीय सेवेसाठी सैनिक शाळा सुरू करण्याची मागणी खा. इम्तियाज जलील यांनी पालकमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे केली आहे. तसेच जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, मनपा प्रशासक आस्तिक कुमार पाण्डेय यांना योग्य ती कार्यवाही करणेबाबत पत्राद्वारे … Read more

मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का – खासदार जलील

imtiyaj jalil

औरंगाबाद – असे का होते की जेव्हा-जेव्हा निवडणुकाजवळ येतात तेव्हा तुम्ही मराठी बोर्ड, कर्नाटक सीमा विवाद, मराठी अस्मिता इत्यादींबद्दल बोलतात. लोक मुर्ख नाहीत की त्यांना या नौटंकी समजत नाही. मराठी पाट्या लावून मराठी तरुणांना नोकऱ्या देणार का? हा एक मिलियन डाॅलरचा प्रश्न आहे, अशी खोचक टीका औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी महाविकास … Read more

काँग्रेस-राष्ट्रवादीने आम्हाला बेवकूफ बनवू नये; मुस्लिम आरक्षणावरून खासदार जलील आक्रमक

Imtyaj jalil

औरंगाबाद – केंद्र सरकार जोपर्यंत आरक्षरणासाठीचा कोटा वाढवत नाही, तोपर्यंत मुस्लिम समाजाला आरक्षण देणे कठीण आहे, असे वक्तव्य राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केले. मलिक यांच्या या वक्तव्यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी कडाडून टीका केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आधी मुस्लिमांना बेवकूफ बनवणे सोडून द्यावे. सरकारने मनात आणलं तर एका दिवसात आरक्षण देऊ … Read more

खासदार जलीलांवर पुन्हा एकदा नोटांची उधळपट्टी; खासदार म्हणतात ही तर परंपरा

jaleel

औरंगाबाद – औरंगाबादचे खासदार तथा एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांच्यावर शनिवारी एका लग्नसमारंभात चक्क नोटांचा वर्षाव करण्यात आला. बुलडाण्याच्या नगराध्यक्षा झेबुन्नीसा यांचे पती तथा स्वीकृत नगरसेवक सज्जादभाई आणि इतर उपस्थितांनी हा नोटवर्षाव केला. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला. खा. जलील यांच्यावर नोटा उधळण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वी एमआयएमच्या कार्यकर्त्यांनीही नोटा उधळल्या होत्या. एमआयएमचे … Read more

राज्य व केंद्र सरकार गंभीर नसल्याने OBC वर अन्याय – खासदार जलील

jalil

औरंगाबाद – केंद्र आणि राज्य सरकार गंभीर नसल्याने ओबीसींवर केवळ अन्याय झाला आहे. आम्ही ओबीसी आरक्षणाला पाठिंबा देतोय, असे मत एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केले आहे. यासंदर्भात खासदार जलील यांनी ट्विट केले आहे. Sheer injustice on OBCs due to lack of seriousness of Central and State govt. We support OBC reservation.*BREAKING* … Read more