“ओ साहेब, दोन लाखांचं कर्ज काढलंय; एवढं पीक झाल्यावर घ्या ना जमीन..!!” गुनामधील शेतकरी दाम्पत्याने पोलिसांच्या मारहाणीनंतर पिलं तणनाशक

मध्यप्रदेशमधील गुना भागात एका दलित शेतकरी कुटुंबियांना सरकारी जागेत शेती केल्याबद्दल मारहाण करण्यात आली असून या मारहाणीनंतर त्यांनी विष पिऊन स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आहे.

Breaking | खासदारांच्या वेतनात वर्षभरासाठी ३० टक्के कपात

नवी दिल्ली । करोनाशी लढा देतांना देशातील अनेक नामवंत लोकांनी पुढाकार घेत मोठी आर्थिक मदत देऊ केली आहे. अशा वेळी लोकप्रतिनिधींची कोरोनाच्या सर्वात अधिक जवाबदारी ओळखून केंद्रानं एक मोठा निर्णय घेतला आहे. वर्षभरासाठी खासदारांच्या वेतनात ३० टक्के कपात करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ही माहिती दिली आहे. याचसोबत … Read more

‘आमचासुद्धा दिवस येईल’- कमलनाथ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । नीतीमत्तेचं राजकारण सोडणार नाही असं म्हणत राजकारणात प्रत्येकाचा दिवस येतो असं कमलनाथ यांनी राजीनामा देण्याआधी स्पष्ट केलं. राजकारण आज आहे, उद्या आहे आणि परवासुद्धा हे सांगत आज आणि उद्या आमचा नसला तरी त्यानंतरचा दिवस आमचाच असेल असा विश्वास कमलनाथ यांनी व्यक्त केला. बहुमत चाचणी घेण्यापूर्वीच आपल्याकडे आमदार नसल्याचं लक्षात आल्याने कमलनाथ … Read more

मध्यप्रदेशमध्ये ‘कमल’नाथ सरकार रुतलं चिखलात, भाजपचं कमळ फुलण्याच्या तयारीत

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मध्यप्रदेशमध्ये सुरु असलेल्या सत्तानाट्याचा अखेर अंत झाला आहे. विद्यमान मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बहुमत चाचणी सिद्ध करण्यापूर्वीच राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. आपला राजीनामा ते थोड्याच वेळात राज्यपाल लालजी टंडन यांच्याकडे सुपूर्द करतील. काँग्रेसचे पॉवरपॅक नेते ज्योतिरादित्य सिंदिया यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर काँग्रेसला सरकार वाचवणं अशक्य झालं होतं. बहुमत चाचणी २६ तारखेला … Read more

‘या’ राज्यात खुलणार केवळ महिलांसाठी दारूचे अड्डे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बऱ्याचदा महिला दारूच्या दुकानात दारू विकत घेण्यासाठी लाजतात. असं होणं साहजिक आहे, कारण एखादी महिला दारू खरेदी करायला गेल्यास तिच्या आजूबाजूचे लोक, तसेच दुकानदारसुद्धा तिला अशा नजरेनं पाहतात की ज्यामुळं तिच्या मनात अस्वस्थता निर्माण होते. मात्र, मध्य प्रदेश सरकारने दुकानातून दारू खरेदी करण्यास इच्छुक असलेल्या महिलांसाठी एक नवा मार्ग शोधला आहे. … Read more

धक्कादायक..!! ओमराजे निंबाळकरांवर चाकूहल्ल्याचा प्रयत्न

उस्मानाबादमधील भाजप खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर कळंब येथे आयोजित जाहीर प्रचारसभेत एका तरुणाकडून चाकू हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कळंब तालुक्यातील नायगाव पाडोळी याठिकाणी ही घटना घडली असून हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आलं आहे.

उदयनराजेंचं कमळ फुलणार का रुतून बसणार ?? पुरुषोत्तम जाधवांचा उदयनराजेंविरूद्ध तिसऱ्यांदा शड्डू

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढणाऱ्या श्रीनिवास पाटील यांचं मजबूत आव्हान एका बाजूला उभं असताना खंडाळ्याच्या घाटात उदयनराजेंना गाठण्याचं काम पुरुषोत्तम जाधव यांनी हाती घेतलं आहे.

झोपडीत राहणारा हा नेता झालाय केंद्रात मंत्री!

नवी दिल्ली | प्रताप सारंगी हे नाव कदाचित तुम्हा, आम्हाला नवं आहे. मात्र ओडिशातील नागरिकांना नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते म्हणून सारंगी यांनी ओडिशातील बालासोर भागामध्ये अनेक सामाजिक कार्य उभी केली आहे. यापूर्वी ते दोन वेळा आमदारही झाले होते. 2014 च्या निवडणुकीत भाजपने त्यांना तिकीट दिलं होतं. पण 1.42 लाख मतांनी ते पराभूत झाले होते. … Read more