पंतप्रधान मोदीजी चीनवर सर्जिकल आघात करण्याची ‘ती’ वेळ; जितेंद्र आव्हाडांचा सल्ला

मुंबई । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत आणि चीन यांच्या लष्करी चर्चा सुरु असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवानच्या खोऱ्यात अचानक हिंसक झडप घालण्यात आली. गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री आणि मंगळवारी पहाटे झालेल्या संघर्षांत २० जवान शहीद झाले आहेत. यावरुन देशभरातील नेते आक्रमक झालेयत. झोपाळ्यावर बसून झालं आता चीनकडे ‘लाल आंखे’ करा असा सल्ला राज्याचे गृहनिर्माण … Read more

भारत-चीन तणाव: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलवली सर्वपक्षीय बैठक

नवी दिल्ली । पूर्व लडाखमध्ये गलवान खोऱ्यात झालेला हिंसक संघर्षात २० भारतीय सैनिक शहीद झाले आहेत. त्यामुळं चीन सीमेवरील तणावाच्या परिस्थिती संदर्भात चर्चा करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. सीमेवर एकूणच युद्ध सदृश परिस्थिती आहे. देशाच्या सीमेवर नेमके काय सुरु आहे? त्याची पंतप्रधानांनी देशाला माहिती द्यावी अशी मागणी विरोधी पक्षांकडून करण्यात येत … Read more

चीन प्रकरणात पंतप्रधान देशापासून काय लपवत आहेत? राहुल गांधींचा मोदींना गंभीर सवाल

नवी दिल्ली । सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत व चीन यांच्या लष्करी चर्चा सुरू असतानाच सोमवारी पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात अचानक हिंसक झडप झाली. या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले आहेत. सीमेवर तणाव वाढला असतानाच देशातही चीनविरोधात संतापाची लाट उसळली असून केंद्र सरकारच्या माहिती लपवा धोरणावर विरोधकांकडून टीका होत आहे. गलवान खोऱ्यातील संघर्षावरून काँग्रेस … Read more

भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के- पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली । भारतात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचा दर ५० टक्के असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. देशातील राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे वक्तव्य केलं. देशामधील राज्यांतील कोरोनाची स्थिती मला जाणून घ्यायची आहे. तसंच राज्यांमधली परिस्थिती काय आहे? त्याबाबत मला तुम्हा सगळ्यांचे सल्ले हवेत असं पंतप्रधान नरेंद्र … Read more

अज्ञानापेक्षा जास्त धोकादायक अहंकार असल्याचे लॉकडाउननं सिद्ध केलं- राहुल गांधी

नवी दिल्ली  । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर कोरोना रोखण्याच्या धोरणांवर संदर्भात टीकास्त्र सोडले आहे. शास्त्रज्ञ अल्बर्ट आइनस्टाइन यांच्या वाक्याचा आधार घेत अज्ञानापेक्षा अहंकार हा सर्वाधिक धोकादायक आहे आणि हे या लॉकडाउनने सिद्ध केले आहे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे. ट्विटवर ट्विट करत मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. This lock down proves … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार राम मंदिर शिलान्यास; ‘या’ तारखेवर होऊ शकतो शिक्कामोर्तब

नवी दिल्ली । श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधानांना भेटून अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनीही हे आमंत्रण स्वीकारले आहे. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी म्हणजेच देव शयनी एकादशीच्या दिवशी पायाभरणी करण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने अद्याप ही तारीख … Read more

PM Kisan Scheme अंतर्गत ‘या’ शेतकऱ्यांना मिळणार वर्षाला ६ हजार रुपये; पहा नवीन यादीत तुमचे नाव आहे का?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोदी सरकारच्या शेतकर्‍यांशी संबंधित सर्वात विशेष योजनांपैकी एक योजना असलेल्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा अनेक राज्यांनी पुरेपूर लाभ घेतला आहे. त्यापैकी यूपी हे राज्य आघाडीवर आहे, तिथूनच या योजनेला सुरुवात केली गेली होती. पश्चिम बंगाल वगळता सर्व भाजपा आणि बिगर भाजपा शासित लोक आपल्या शेतकर्‍यांना अधिकाधिक पैसे मिळवून देण्याचा प्रयत्न … Read more

कोरोनामुळे यंदाचा योगा दिवसही होणार ऑनलाईन; जिंकू शकता ‘ही’ मोठी बक्षिसे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरातील सर्व देशात पसरलेल्या कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर यंदाचा आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा डिजिटल मीडिया प्लॅटफॉर्मवर साजरा केला जाईल. या संदर्भात सरकारने सांगितले की, यावर्षी योगा दिनावर कोणताही सामूहिक सोहळा किंवा कार्यक्रम होणार नाही. दरवर्षी योग दिन हा एका विशिष्ट थीमवर साजरा केला जातो. यंदाची थीम ‘योगासहित घर आणि योगासहित कुटूंब’ … Read more

मोदी सरकारचं धोरणं सोन्याचं अंडं देणारी कोंबडीच मारून टाकण्यासारखं- भारतीय मजदूर संघ

नवी दिल्ली । मोदी सरकारच्या आर्थिक धोरणांविरुद्ध राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फूट पडल्याचं समोर येतं आहे. आर्थिक सुधारणांच्या नावावर सार्वजनिक क्षेत्रातील खाजगीकरण आणि गुंतवणुकीच्या निर्णयांना विरोध दर्शवण्यासाठी राष्ट्रीय स्वसंसेवक संघ (RSS) शी संबंधीत श्रमिक संघटना असलेल्या भारतीय मजदूर संघाकडून देशव्यापी ‘सेव्ह पब्लिक सेक्टर सेव्ह इंडिया’ आंदोलन सुरू करण्यात येतं आहे. भारतीय मजदूर संघ (BMS) कडून पंतप्रधान … Read more

PM Cares Fund बाबत RTI अंतर्गत विचारलेल्या प्रश्नांना पंतप्रधान कार्यालयाकडून केराची टोपली

मुंबई । PM Cares Fundबाबत विरोधकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले असतानाच या फंडाबाबत माहिती अधिकार कायद्यांतर्गतही माहिती दिली जात नसल्याचं समोर आलं आहे.मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते जितेंद्र घाडगे यांनी पीएम केअर फंडाबाबत पंतप्रधान कार्यालयाकडे माहिती मागवली होती. मात्र त्यांना ही माहिती देण्यात आली नाही. कोरोनाच्या राष्ट्रीय आपत्तीचा मुकाबला करण्यासाठी पीएम केअर फंडाची निर्मिती करण्यात आली … Read more