कौतुकास्पद! ‘या’ अवलिया शेतकर्‍याने स्वत:च्या शेतातील गहू भुकेलेल्यांना मोफत वाटले

नाशिक प्रतिनिधी | कोरोनाने ग्रामिण भागातही आता पाय पसरलेत. सातासमुद्रापार सुरु झालेल्या या राक्षसी आजारानं आता गावोगावी भिती पसरवलीये. देशात लाॅकडाऊन असल्यानं सर्व छोटे मोठे व्यावसाय, उद्याग बंद आहेत. अशाने तळ हातावर पोट असणार्‍यांवर खूपच बिकट परिस्थिती आलीय. ग्रामिण भागात मोलमजूरी करुन घर चालवणार्‍या कुटूंबांवर उपासमारीची वेळ आलिये. कोणीच शेतावर कामाला बोलावत नसल्याने मजूरी, भांगलणी … Read more

कोरोना महाराष्ट्रात दाखल? नाशिकमध्ये आढळला संशयित रुग्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दिल्ली, तेलंगणमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर आता महाराष्ट्रातील नाशिकमध्ये कोरोनाचा संशयित रुग्ण आढळला आहे. एका मराठी वृत्तवाहिनीने या संदर्भातील वृत्त दिल आहे. या व्यक्तीमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली असून त्याला कोरोनाची लागण झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या संशयित रुग्णाच्या रक्ताचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले असल्याचे वृत्तवाहिनीच्या वृत्तात म्हटलं … Read more

त्र्यंबकेश्वर मंदिरात भक्तिमय वातावरणात महाशिवरात्री उत्साहात साजरी

नाशिक प्रतिनिधी । आज शुक्रवारी पारंपरिक पद्धतीने महामृत्युंजय भगवान त्र्यंबकराजाची पालखी काढण्यात आली. पालखी मेनरोडमार्गे लक्ष्मीनारायण चौक, पाच आळीतून त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या दारासमोरून येऊन पालखीचे औक्षण स्वीकारले. कुशावर्तावर स्नानपूजा, आरती होऊन नेहमीच्या परतीच्या पारंपरिक मार्गाने पालखी पुन्हा मंदिरात आणली गेली. या पालखी सोहळ्यात भाविक मोठ्या संख्येने सामील झाले होते. महाशिवरात्रीनिमित्त केलेल्या आकर्षक विद्युत रोषणाईमुळे त्र्यंबकेश्वर … Read more

मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते – देवेंद्र फडणवीस

Devendra Fadanvis

नाशिक । मी किती खवय्या आहे, याची कल्पना माझ्याकडे पाहूनच येते, असं विधान विरोधी पक्षनेते देवेंंद्र फडणवीस यांनी केले आहे. नाशिक येथे खानदेश महोत्सवाच्या समारोपावेळी ते बोलत होते. फडणवीस यांच्या सदर विधानामुळे सभागृहात एकच हशा पिकला होता. आपण सर्व जण भटके झालो आहोत. नोकरी व्यवसायानिमित्त आपण आपले मूळ गाव सोडून शहरात वास्तव्यास आहेत. मात्र आपल्या … Read more

‘या’ सुप्रसिद्ध गायिकेचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

नाशिकच्या सुप्रसिद्ध गायिका गीता माळी यांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. मुबंई -नाशिक महामार्गावर लाहे गावाजवळील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला असल्याचे प्राथमिक वृत्त सध्या मिळत आहे. गीता माळी त्यांचे पती विजय माळी यांच्यासोबत प्रवास करत होते. विजय या अपघातात किरकोळ जखमी झालेअसून शहापूर रुग्णालयात ते उपचार घेत आहेत.

ऐन निवडणुकीत भाजपने मनसे उपाध्यक्ष फोडून त्याला दिली उमेदवारी

नाशिक प्रतिनिधी| राजकरणात कधी काय होईल हे काहिच सांगता येत नाही. कारण उमेदवारी अर्ज भरण्यासाठीच अवघे काही तास शिल्लक असतानाच भाजपने मनसेचे उपाध्यक्ष राहुल ढिकले यांना नाशिक पूर्व मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तुम्ही बातमी वाचत असताना त्यांनी उमेदवारी अर्ज देखील भरलेला असेल. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज … Read more

महाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केला कलम ३७० हटवल्याचा उदो उदो

नाशिक प्रतिनिधी | देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या महाजनादेश यात्रेच्या सांगता करण्यासाठी आलेल्या नरेंद्र मोदी यांनी कलम ३७० हटवल्याचा उदो उदो केला आहे. रक्ताने रंजीत झालेल्या कश्मीरला आपण आता तयार करायाचे आहे. आम्ही आमच्या सरकारच्या १०० दिवसांचा चमत्कार दाखवला आहे अशा शब्दात नरेंद्र मोदींनी राष्ट्रीय मुद्दयांवरच भाषण दिले आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीत ज्या प्रमाणे नरेंद्र मोदींनी … Read more

महाजनादेश यात्रा : नरेंद्र मोदींनी केली भाषणाची मराठीतून सुरुवात

नाशिक प्रतिनिधी | विधानसभा निवडणुकीच्या शक्ती प्रदर्शनासाठी नाशिकमध्ये मोदींच्या जाहीर सभेचे आयोजन भाजपच्या वतीने करण्यात आले आहे. त्या सभेत भाषण करताना नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणाची सुरुवात मराठी मधून केली आहे. रामाच्या आणि सीतामाईच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नाशिकच्या धरतीला मी नमन करतो असे नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. आदिमाया शक्तीचे रूप असलेल्या सप्तशृंगी मातेच्या पदस्पर्शाने हि … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नाशिक मध्ये

नाशिक प्रतिनिधी। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर काढण्यात आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा समारोप आज गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. या वेळी भाजपकडून शक्तिप्रदर्शन केले जाणार असून, सभेची तयारी पूर्ण झाली आहे. मोदी आणि फडणवीस यांच्यासह अर्ध्या मंत्रिमंडळाच्या उपस्थितीत होत असलेल्या या जाहीर सभेच्या माध्यमातून विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. … Read more

पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याच्या शुभारंभाला भुजबळांची दांडी ; राजकीय चर्चाना पुन्हा उधाण

नाशिक प्रतिनिधी |  आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे घोंगावते आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी आतापर्यंत भाजप आणि शिवसेनेत प्रवेश केला. हे पाहता ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. आता संकटात सापडलेल्या राष्ट्रवादीला नवसंजीवनी देण्यासाठी शरद पवार हे राज्यव्यापी दौऱ्यावर आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्याला आज (सोमवार) नाशिकमधुन सुरूवात झाली आहे. एकीकडे … Read more