आता येणार चीप असणारे ई पासपोर्ट; अगोदरपेक्षा जास्त सुरक्षित

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पासपोर्ट (Indian Passport) अधिक सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकार (Government of India) आता मोठी पावले उचलणार आहे. सरकार भारतीय सुरक्षा प्रेस आणि नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर फॉर चिप एनेबल ई पासपोर्टवर काम करत आहे. यामुळे ट्रॅव्हल डॉक्युमेंटसची सुरक्षा वाढेल. पासपोर्टबाबत अनेक प्रकारच्या फसवणूकीचे प्रकार समोर येत आहेत. बर्‍याच वेळा गुन्हेगार आणि फसवणूक करणारे … Read more

दिल्लीत पेट्रोल पेक्षा डिझेल झाले महाग; जाणुन घ्या कारण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएलने बुधवारी डिझेलच्या दरात वाढ केली आहे. एचपीसीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या दरांनुसार दिल्लीत सध्या एक लिटर डिझेलची किंमत 79.92 रुपये आहे. त्याचवेळी, एक लिटर पेट्रोलची किंमत 79.80 आहे. मात्र, देशातील सर्वात मोठी ऑईल मार्केटिंग कंपनी आयओसीने दिल्लीतील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे … Read more

ती हवाई दलात अधिकारी बनली; चहा विकणार्‍या वडीलांचा ऊर अभिमानाने भरून आला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शनिवारी भारतीय वायुदलाच्या अकादमीमधून पदवी घेतलेली आंचल गंगवाल हिला टीव्हीवर बघून मध्य प्रदेशमधील निमच या गावातील चहाचा स्टॉल असणाऱ्या तिच्या वडिलांच्या ऊर अभिमानाने भरून आला होता. फ्लाइंग ऑफिसर आंचल गंगवाल यांना राष्ट्रपती स्मृतिचिन्ह मिळाले. भारतीय हवाई अकादमी मधून त्यांनी पदवी घेतली आहे. नीमच येथील शासकीय पदवी महाविद्यालयातून संगणक विज्ञान पदवी प्राप्त … Read more

जम्मू काश्मीरच्या कुलगाम मध्ये सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्यात चकमक 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जम्मू काश्मीर च्या कुलगाम जिल्ह्यात सुरक्षादल आणि दहशतवादी यांच्या मध्ये चकमक सुरु असल्याचे वृत्त समोर आले आहे. दहशतवाद्यांची संख्या २ ते ३ आहेत आणि ते सातत्याने फायरिंग करत आहेत. सुरक्षादल देखील उत्तरादाखल कारवाई केली जात आहे. इथे सुरक्षादलाचे सर्च ऑपरेशन सुरु आहे. अशी माहिती समोर आली आहे. दक्षिण काश्मीर मधील लकड़पोरा … Read more

धक्कादायक! बसपा नेत्याची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उत्तरप्रदेश मधील कानपुर येथे (शनिवारी) आज दुपारी बहुजन समाज पार्टीचे माजी नेते नरेंद्र सिंह उर्फ पिंटू सेंगर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. कानपूरमधील चकेरी याठिकाणी हल्लेखोरांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला, यानंतर गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यत आले. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. दिवसाढवळ्या असा प्रकार घडल्याने परिसरात … Read more

गुजरातमध्ये ३०० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक करण्यासाठी चीनी कंपनीचा अदानींशी करार 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या भारत आणि चीन या दोन्ही देशाच्या सीमेवर तणाव आहे. भारतातून चीनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जात आहे. अशातच आता चीनी कंपनीने गुजरातमध्ये गुंतवणूक करण्यासाठी अदानींशी करार केला आहे. या दोन्ही समूहातील प्रस्तावित समूहाचा भाग म्हणून ईस्ट होप समूहाकडून ३०० डॉलर पेक्षा जास्त गुंतवणूक अपेक्षित असल्याचे समोर आले आहे. चीनमधील ईस्ट … Read more

पेट्रोल-डिझेलच्या दारात १४ दिवसांत ८ रुपयांची वाढ; जाणून घ्या आजचे भाव

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशात कोरोनाचा संसर्ग पसरल्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी सतत वाढतच आहेत. अशातच आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रूड तेलाच्या किंमती घसरल्या असल्या तरीही त्याचा फायदा लोकांना मिळत नाही आहे. शनिवारी, देशातील सरकारी ऑईल मार्केटिंग कंपनी एचपीसीएल, बीपीसीएल, आयओसीने सलग 14 व्या दिवशी पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविले आहेत. यावेळी पेट्रोल 7.60 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 8.28 … Read more

किंगफिशर मधील नोकरी गमावल्यानंतर एअरहॉस्टेस बनली बस कंडक्टर; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बीएमटीसीत बस कंडक्टर म्हणून एका माजी किंगफिशर एअरहोस्टेसला नोकरीसाठी घेतल्याची बातमी सध्या समोर येत आहे. या सुंदर लेडी बस कंडक्टरचे एक छायाचित्र इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होत आहे. आपल्या सर्वांनाच माहिती असेल की विजय मल्ल्याची किंगफिशर एअरलाइन्स बंद झाल्यामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहे, मग अशा परिस्थितीत या एअरहोस्टेसने बस कंडक्टरचे काम … Read more

सरकारने सुरु केली LIC च्या IPO ची प्रक्रिया; पॉलिसी खरेदी केलेल्यांवर काय परिणाम होणार?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या एलआयसी-जीवन विमा कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने आयपीओ मिळण्याच्या प्रक्रियेला आता वेग दिला आहे. कंपनीतील भागभांडवल विक्रीसाठी सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. प्री-आयपीओ ट्रान्झॅक्शन अ‍ॅडव्हायझर नेमणूक करण्यासाठी निर्गुंतवणूक विभागाने निविदा मागविल्या. त्याची अंतिम तारीख 13 जुलै निश्चित करण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात सरकारने निर्गुंतवणुकीद्वारे 2.10 लाख … Read more

ओडिशातील महानदीत सापडले ५०० वर्षांपूर्वीचे मंदिर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात अशी अनेक प्राचीन स्थळे आहेत. जिथे पुरातन वास्तू सापडल्या आहेत. भारताच्या प्राचीन संस्कृतीचे अवशेषही बऱ्याच ठिकाणी सापडत असतात. काही वर्षांपूर्वी भूगर्भात अथवा पाण्यात विलीन झालेल्या वास्तू या संशोधनातून सापडत आहेत. इंडियन नॅशनल ट्रस्ट ऑफ आर्ट अँड हेरिटेज देखील अशा पद्धतीचे संशोधन करते आहे. या संस्थेच्या पुरातत्व विभागाकडून ओडिसातील महानदीच्या भागातील … Read more