Video: खा. नवनीत राणांनी केले बाप्पासाठी मोदक; फेसबुक लाइव्हद्वारे जनतेशी साधला संवाद

मुंबई । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा गेल्या २२ दिवसापासून कोरोनाशी लढत आहेत. मुंबई येथील निवासस्थानी त्यांनी आज गणपती बसवत विधीवत पूजा केली. आमदार रवी राणा यांनी देखील गणपतीची आरती करत लवकरात लवकर कोरोनाचे संकट दूर होवो अशी अपेक्षा आणि प्रार्थना गणरायाकडे केली. नवनीत राणा यांनी घरी गणपतीसाठी आपल्या हाताने मोदक करत संवाद साधला. https://youtu.be/ryc-T4kLUDs नवनीत … Read more

खळबळजनक! खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोनाची लागण

मुंबई । श्वास घेण्यास त्रास झाल्यामुळं मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना डिस्चार्जनंतर पुन्हा कोरोनाचा संसर्ग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नवनीत राणा यांनी कोरोनावर यशस्वी मात केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र, आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांची कोरोना चाचणी केली असता … Read more

अखेर खासदार नवनीत राणांना मुंबईतील लिलावती रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज

मुंबई । प्रकृतीत झपाट्यानं सुधारणा झाल्यामुळं अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना मुंबईतील लिलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. मात्र, जरी डिस्चार्ज मिळाला असला तरी त्यांना पुढील २० दिवस क्वारंटाइन राहावं लागणार आहे. याआधी त्यांचे पती आमदार रवी राणा यांनाही शनिवारी डिस्चार्ज देण्यात आला. त्यांनाही करोनाची लागण झाली होती. ते आता कोरोनामुक्त झाले असून त्यांना शनिवारी … Read more

खासदार नवनीत राणांची प्रकृती आणखी बिघडली; नागपूरहून मुंबईकडे रवाना

मुंबई । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (navneet rana) यांच्या प्रकृतीत सात दिवस उपचार करूनही कोणतीही सुधारणा झालेली नाही. आज त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना नागपूरहून मुंबईला (mumbai) हलविण्यात येत आहे. नवनीत राणा यांना ६ ऑगस्ट रोजी कोरोनाची लागण झाल्याचं निदान झालं होतं. त्यामुळे त्यांना घरीच क्वॉरंटाइन करून त्यांच्यावर उपचार करण्यात येत होते. मात्र, … Read more

खासदार नवनीत राणा यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी नागपूरला हलविले

अमरावती । अमरावतीच्या खासदार नवनीत राणा-कौर (Navneet Rana ) यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरला (Nagpur) तात्काळ हलविण्यात आले आहे. नवनीत राणा यांचा कोरोना रिपोर्ट गेल्या आठवड्यात पॉझिटिव्ह (COVID Positive ) आला आहे. त्यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. मात्र, तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी नागपूरच्या वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले आहे. जवळपास सहा दिवसांपूर्वी नवनीत … Read more

खासदार नवनीत‌ राणांनंतर आमदार रवी राणा यांना सुद्धा कोरोनाची लागण

अमरावती । खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाल्यांनतर आता त्यांचे पती आमदार रवी राणा सुद्धा कोरोनाबाधित झाले आहेत. रवी राणा यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉजिटीव्ह आला‌ आहे. यापूर्वी चारच दिवसापूर्वी नवनीत आणि रवी राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील इतर सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. त्यांनतर आज नवनीत राणा यांच्या पाठोपाठ … Read more

खासदार नवनीत राणा यांना कोरोना विषाणूची लागण

अमरावती । चार दिवस आधी खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलासोबत कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. दरम्यान, खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली आहे. नवनीत राणा यांच्या कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. गुरुवारी नवनीत राणा यांना अस्वस्थ वाटत असल्याने रॅपिड अँटिजिन टेस्ट व स्वॅब घेण्यात आले.रॅपिड … Read more

खासदार नवनीत राणांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; मुलांसह १० जणांना बाधा

अमरावती । खासदार नवनित राणा आणि बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा यांच्या घरातही कोरोनानं शिरकाव केला आहे. रवी राणा यांच्या कुटुंबातील १० जणांचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून यामध्ये त्यांचा मुलं आणि सासू सासऱ्यांचाही समावेश आहे. रवी राणा यांचे वडिल गंगाधर राणा यांचा रविवारी कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्य, कार्यकर्ते यांच्यासह ५० … Read more

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब

धक्कादायक! तरुणीच्या गुप्तांगामधून घेतला कोरोना चाचणीचा स्वॅब #HelloMaharashtra

खासदार नवनीत राणांनी बँक अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर; बँकेच्या अनागोंदी कारभारावर भडकल्या

बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी आदिवासी लोकांना त्रास देतात आणि तासनतास रांगेत उभे ठेवतात. अशा प्रकारच्या काही तक्रारी गेल्या अनेक दिवसांपासून अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे येत होत्या. त्यामुळे नवनीत राणा यांनी या मेळघाटमधील चुर्णी गावातील या बँकेला भेट दिली असता बँकेचा अनागोंदी कारभार पाहून त्यांनी राणा यांचा राग अनावर झाला. त्यामुळे त्यांनी बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले.