परराज्यातील मजुरांसाठी विशेष ट्रेन सोडणं सध्यातरी अशक्य- नितीन गडकरी

मुंबई । परराज्यातील कामगार, मजुरांना त्यांच्या घरी परतण्यासाठी स्पेशल ट्रेनची सोय करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारकडे केली होती. मुख्यमंत्र्यांच्या सल्लाचा आम्ही सन्मान करतो. मात्र सध्याच्या परिस्थितीत तसे करणे अयोग्य ठरेल असं एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. मुंबईतून या परराज्यातील कामगारांना त्यांच्या घरी जाण्यासाठी ट्रेन सोडली, … Read more

कोरोनाच्या संकटात कोणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये; गडकरींनी टोचले भाजप नेत्यांचे कान

नवी दिल्ली । ”आपला देश करोनाच्या संकटाशी लढतो आहे. अशात कुणीही राजकारणाचा डमरु वाजवू नये” असं वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अप्रत्यक्षपणे राज्यातील भाजपा नेत्यांचे कानच टोचले आहेत. “एखादा मुद्दा पटला नसेल तर त्याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करा. सध्याची वेळ ही एकजुटीने कोरोनाच्या संकटाचा सामना करण्याची आहे, असं गडकरी यांनी एका मराठी … Read more

करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण नक्की जिंकू- नितीन गडकरी

नवी दिल्ली । जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत कोरोनाच्या लढाईत पुढे आहे. राष्ट्रीय महामार्ग हळूहळू सुरु झाले आहेत. बंदरं सुरु झाली आहेत. फॅक्ट्रींमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळलं जातं आहे. एप्रिल महिन्याच्या शेवटापर्यंत आपण बरंच नियंत्रण मिळवू आणि पुढे जाऊ तसंच करोनासोबतचीच नाही तर त्यापुढे येणारी आर्थिक लढाईही आपण लढतो आहोत. त्या लढाईतही आपण जिंकू असा विश्वास … Read more

घाबरु नका, जनतेसाठी सरकारी तिजोरी नेहमीच उपलब्ध – नितीन गडकरींचा देशवासीयांना दिलासा

देशातील लॉकडाऊनचा मोठा फटका अर्थव्यवस्थेला बसलेला असताना ती भरुन काढण्यासाठीच्या सर्व उपाययोजना हळूहळू अंमलात आणणं सुरु असून महिना अखेरपर्यंत आपण कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असं मत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केलं.

Breaking | देशातील सर्व टोलनाके अनिश्चित काळासाठी बंद – नितिन गडकरी

वृत्तसंस्था |  कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. पंतप्रधान मोदी यांनीही मंगळवारी संध्याकाळी देशात २१ दिवसांसाठी संचारबंदी लागू केली. आता देशातील सर्व टोलनाक्यावरील टोलवसून तात्पुरत्या काळासाठी बंद ठेवण्याचे आदेश केंद्रीय रस्ते व वाहतुक मंत्री नितिन गडकरी यांनी दिले आहेत. In view of #COVID19, it has been ordered to temporarily suspend the collection of toll at … Read more

अल्पसंख्यांकांच लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलरिझम नव्हे!- नितीन गडकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अल्पसंख्यांकांच किंवा इतर कोणत्याही समुदायाचं लांगुलचालन करणं म्हणजे सेक्युलर नव्हे, सेक्युलर या शब्दाचा अर्थ धर्मनिरपेक्षता असा नाही तर सर्वधर्म समभाव असा आहे. हे हिंदू संस्कृतीचं नैसर्गिक स्वरुप आहे. आम्ही सर्व संस्कृतींचा सन्मान केला आहे. आपल्या देशाचं वैशिष्ट्य हे विविधतेत एकता आहे. आजच्या स्थितीत आपल्याला सर्वसमावेशक, प्रगतीशील असताना खऱ्या अर्थानं सर्वधर्म समभावासह … Read more

सुप्रीम कोर्टानं धाडला नितीन गडकरींना हजर राहण्याचा सांगावा, हे आहे कारण..

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सार्वजनिक वाहतूक आणि सरकारी वाहनांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रूपांतरित करण्याच्या प्रक्रियेवर बुधवारी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली. सरन्यायाधीश एस.ए. बोबडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना न्यायालयात हजर करण्यास सांगितले. सरन्यायाधीश बोबडे म्हणाले, ‘आमची अशी इच्छा आहे कि, गडकरी यांनी कोर्टात येऊन प्रदूषण नियंत्रित करण्याबाबत कोणत्या समस्या येत आहेत … Read more

पक्षाला काडया करणारे कार्यकर्ते नको, निष्ठावंत कार्यकर्ते हवेत – नितीन गडकरी

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : “पक्षाला इकडून तिकडे जाणारे,गटबाजी करणारे, काड्या करणारे लोकं नको तर निष्ठावंत कार्यकर्ते हवेत, असे मत केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. ते भाजपचे निष्ठवंत आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आनंदराव ठवरे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. आनंदराव ठवरे … Read more

पी. चिदंमबरम यांच्यावरील कारवाईत आम्ही सूडबुद्धीने वागलो नाही- नितीन गडकरी

आयएनएक्स मीडिया आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी काँग्रेस नेते आणि माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना आज सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांनी चौकशीला सहकार्य करावं आणि देश सोडून जाऊ नये या दोन अटींवर त्यांना न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. पी. चिदंबरम यांना जामीन मंजूर करण्यात आल्यानंतर काँग्रेसने ट्विट करत नेहमी सत्याचाच विजय झाला असल्याचे सांगितले आहे. याच पार्श्वभूमीवर ‘भाजपा’चे नेते नितीन गडकरी यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

सत्तास्थापनेबाबत नितीन गडकरींच ‘हे’ विधान खरं ठरलं

आजची सकाळ महाराष्ट्राच्या राजकारणात अचंबित करणारी ठरली. इतके दिवस सत्तास्थापनेच्या चर्चेत भाजप गायब होती तर तिकडे शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यात नवं नातं सरकारस्थापनेच्या निमित्ताने तयार होत असताना. अचानक देवेंद्र फडणवीस यांच्या रूपात भाजपने गनिमी काव्याचा वापर करत सत्तास्थानेच दावा केला, तो ही राष्ट्रवादीची बुलंद तोफ असणाऱ्या अजित पवार यांच्या मदतीने. अशाप्रकारे फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.