ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांच्या वैधतेत पुन्हा एकदा वाढ; नितीन गडकरींचा निर्णय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी वाहन धारकांना मोठा दिलासा दिला आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर ड्रायव्हिंग लायसन्स आणि वाहन कागदपत्रांची वैधता पुन्हा एकदा वाढवण्याचा निर्णय नितीन गडकरी यांनी घेतला आहे. मोटार वाहनांच्या मुदत संपलेल्या कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात असल्याची माहिती नितीन गडकरी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे. याआधी लॉकडाउनमुळे मुदत संपलेल्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यात अडचणी येत असल्याने यापूर्वी 30 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती, ती मुदतवाढ नंतर 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. आता पुन्हा एकदा 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

या निर्णयानंतर मोटार वाहनाशी संबंधित कोणतेही कागदपत्र कालबाह्य झाले असल्यास 31 डिसेंबर 2020 पर्यंत त्याचे नूतनीकरण करता येणार आहे 1 फेब्रुवारी 2020 रोजी कालबाह्य होणाऱ्या किंवा आतापासून 31 डिसेंबरपर्यंत कालबाह्य होणाऱ्या मोटार वाहन कागदपत्रांना 31 डिसेंबर 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

वाहनांचे फिटनेस, परमिट (सर्व प्रकारचे), PUC, ड्रायव्हिंग लायसन्स, नोंदणी किंवा विमा इतर कोणतीही संबंधित कागदपत्रे ज्यांची वैधता संपलेली आहे किंवा देशव्यापी लॉकडाऊनमुळे त्यांचं नूतनीकरण करण्यात अडचणी येत आहेत, अशा वाहनधारकांना या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे. ज्यांच्या ड्रायव्हिंग लायसन्स, वाहनाचे नोंदणी प्रमाणपत्र, PUCसारख्या कागदपत्रांची मुदत 1 फेब्रुवारी ते 31 डिसेंबरच्या कालावधीत संपत आहे, त्यांच्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना देण्यात आले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment