हिंदुस्थानातं चमच्यांची सुद्धा कमतरता पडली आहे का?- नितीन गडकरी

‘देशभरातील उद्योग व्यवसायसंबंधी एक बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी चीनमधून उदबत्तीपासून प्लास्टिकचे चमचे देखील आपल्या देशात आयात केले जात आहे. ही माहिती मिळाली, त्यावरून मी सेक्रेटरीला म्हटलो की, अपने हिंदुस्थान में चमचो की भी कमी पड गई क्या?’ असा किस्सा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगताच सभागृहात एकच हशा पिकला.

मत कुणालाही द्या, पण मत द्या – नितीन गडकरी

भाजपचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी मतदानाचा हक्क बजावला. राज्यात देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्या खालोखाल सर्वाधिक प्रचारसभा नितीन गडकरी यांनी घेतल्या होत्या. यावेळी केंद्रात रस्ते, वाहतूक आणि जहाजबांधणी मंत्रीपद भूषवणाऱ्या नितीन गडकरी यांनी सर्व नागरिकांना मतदान करण्याबाबत आवाहन केलं. लोकशाही टिकवण्यासाठी मतदान करणं अत्यावश्यक असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले.

५ वर्षात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे – नितीन गडकरी

गेल्या ५ वर्षात भाजप सरकारच्या काळात झालेला विकास हा फक्त ट्रेलर आहे पिचर अजून बाकी आहे’ असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी निवडणूक प्रचारात विश्वास व्यक्त केला. गडकरी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभेत भाजप उमेदवार कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत बोलत होते.

मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो – नितीन गडकरी

एवढी वर्ष काँग्रेसला सत्ता दिली असली तरी देशातील जनता मात्र गरीबच राहिली. काँग्रेसने आजपर्यंत देशाचा कोणताही विकास केला नाही यावर चिंतन करण्याची गरज आहे असं म्हणत मी फोकनाड नेता नसून जे बोलतो ते करून दाखवितो असं मत केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी धामणगाव रेल्वे येथील जाहीर सभेत बोलतांना व्यक्त केलं.

देशभर विजयादशमीचा उत्साह, नागपूरात संघाचे विशेष संचलन संपन्न

नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विशेष कार्यक्रम सकाळी ७ वाजताच सुरू झाला होता. संघाच्या स्वयंसेवकांनी पारंपरिक पद्धतीने आपलं संचलन आज सादर केलं. रा

राजकारणात जातीचे कार्ड खेळणाराला गडकरी म्हणतात

नागपूर प्रतिनिधी | भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जातीय राजकारणावर चांगलेच तोंड सुख घेतले आहे. जेव्हा लोक स्वकर्तृत्वावर तिकीट मिळवण्यात अपयशी ठरतात तेव्हा ते जातीच्या आधारावर तिकीट मागू लागतात हे अयोग्य आहे असे ठोक मत नितीन गडकरी यांनी व्यक्त केले आहे. नागपुरात माळी समाजाने आयोजित केलेल्या मेळाव्यात ते बोलत होते. महात्मा फुले शिक्षण … Read more

पेट्रोल, डिझेलवरील वाहनांवर बंदी नाही- नितीन गडकरी

वृत्तसंस्था | मंदीचा फटका बसलेल्या वाहन उद्योगाला दिलासा देणारी ही बातमी आहे. पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनं सुरूच राहतील. त्यांच्यावर बंदी येणार नाही, असं केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले. ईलेक्ट्रिक वाहन उद्योगांना चालना देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. यामुळे पेट्रोल आणि डिझेलवरील वाहनांच्या विक्रीवर त्याचा थेट परिणाम झाल्याने अनेकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. पेट्रोल आणि … Read more

मुंबई मनपाच्या ५८ हजार कोटीच्या फिक्स ठेवी तरी देखील मुंबई पाण्यात बुडते ; गडकरींचा शिवसेनेला घरचा आहेर

मुंबई प्रतिनिधी | जे काही बोलायचे ते रोख ठोक बोलायचे यासाठी प्रसिद्ध असणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज शिवसेनेला चांगलाच टोला लगावला आहे. ५८ हजार कोटी रुपयांच्या फिक्स ठेवी मुंबई महानगरपालिकेच्या बँकेत आहेत तरी देखील दर वर्षी मुंबई पाण्यात बुडते असा टोला नितीन गडकरी यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुंबई मनपामध्ये शिवसेना सत्ताधारी पक्ष आहे. … Read more

सुजय विखे पाटलांनी शिर्डीचा ‘तो’ रखडलेला प्रश्न लोकसभेत मांडला

नवी दिल्ली |निर्मला सीतारामन यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पाच्या समर्थनार्थ भाषण देण्यासाठी भाषण करत असलेल्या सुजय विखे पाटील यांनी शिर्डीचा रखडलेला प्रश्न आज लोकसभेत मांडून त्या प्रश्नाकडे सर्वांचे तसेच दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांचे देखील लक्ष आकर्षित केले आहे. पुणे शिर्डी आठ पदरी रस्त्याचे रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे अशी मागणी सुजय विखे पाटील यांनी आज … Read more

गडकरी,मुंडेनी कारखान्यात इथेनॉल निर्मिती केली का?: रघुनाथदादा पाटील

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे  साखर कारखानदारांना इथेनॉलऐवजी अल्कोहोलमध्ये अधिक रस आहे. मोदींचे सरकारला पाच वर्षे होऊनही इथेनॉलचे धोरण पक्के करता आले नाही. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यातील मंत्री सुभाष देशमुख, पंकजा मुंडे यांच्याकडे अनेक कारखाने असतानाही इथेनॉल निर्मितीसाठी दबाव न टाकता केवळ चर्चाच केली जाते. कॉंग्रेस सरकार जाऊन भाजप सरकार आले तरी धोरणात कानामात्राचा … Read more