आता दस्तऐवज जमा न करता काही मिनिटांत मिळवा पॅन, तेही विनामूल्य

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पॅनकार्डसाठी तुम्हाला आता कार्यालयांचे हेलपाटे मारण्याची गरज नाही. प्राप्तिकर विभागाने त्वरित पॅन मिळविण्यासाठी ई-पॅन सुविधा सुरू केली आहे. या सुविधेअंतर्गत अर्जदारांना पॅन पीडीएफ स्वरुपात दिले जाईल, जे अगदी विनामूल्य असेल. प्राप्तिकर विभागाच्या वेबसाइटनुसार, ई-पॅन किंवा इन्स्टंट पॅनसाठी अर्ज करणार्‍या व्यक्तीकडे वैध आधारकार्ड असायला हवं तसेच आपला मोबाइल नंबर आधारशी जोडलेला असावा. … Read more

आयकर नियमात नवीन बदल; ‘या’ २ गोष्टींची माहिती न दिल्यास कंपनी तुमचा पगार कापणार

तुम्ही जर आपल्या आधार आणि पॅनचा तपशील आपल्या कंपनीला दिला नसेल तर सावधान! नवीन आयकर नियमानुसार तुमच्या पगारात कपात केली जाऊ शकते. प्राप्तिकर विभागाच्या (कर विभाग) नियमानुसार जर एखादा कर्मचारी आपल्या कंपनीला पॅन आणि आधार क्रमांक देत नसेल तर 20% टीडीएस (कर वजावट स्त्रोत) त्याच्या पगारामधून वजा केला जाईल. आधीच लाख किंवा त्याहून अधिक वार्षिक उत्पन्न कमवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा नियम लागू होणार आहे.

आधारकार्ड आणि पॅनकार्ड लिंक करण्यासाठी 31 मार्च 2020 पर्यंत मुदतवाढ

नवी दिल्ली : 31 डिसेंबर पर्यंत आधार आणि पॅनकार्ड लिंक न केल्यास पॅनकार्ड निष्क्रिय होईल अशी माहिती पुढे येत असतानाच सरकारने अजूनही ज्यांनी आधार आणि पॅन लिंक केलेले नाही अशा नागरिकांना दिलासा दिला आहे. केंद्र सरकारने आधार आणि पॅन लिंक करण्याची मुदत 31 मार्च 2020 पर्यंत वाढवली आहे. सध्याची मुदत 31 डिसेंबर 2019 म्हणजेच उद्या … Read more