लग्नानंतर प्रेम संबंधास नकार देणाऱ्या विवाहितेचा प्रियकराने केला निर्घृण खून

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जिल्हातील रामपुरी शिवारातील उसाच्या फडामध्ये घडलेल्या खूनाचा उलगडा झाला असून, विवाहानंतर प्रेमसंबंधात नकार देणाऱ्या महिलेचा तिच्याच पूर्व प्रियकराने अत्यंत शांत डोक्याने खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. जिल्ह्यातील मानवत तालुक्यामध्ये उसाच्या फडामध्ये विवाहित महिलेच्या खूनाची घटना दि. ८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. अवघ्या आठ दिवसांमध्ये तिसऱ्या खुनाच्या घटनेने … Read more

मराठवाड्याला हक्काचे पाणी दिलं नाही तर आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू! देवेंद्र फडणवीस

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मराठवाड्याला हक्काचे पाणी द्या! तसे न केल्यास आम्ही रस्त्यावर उतरून संघर्ष करू, पण मराठवाड्याला त्यांच्या हक्काचे पाणी मिळवून देऊ. असा इशारा परभणीतील एका कार्यक्रमात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे. परभणीमध्ये शुक्रवार दिनांक ७ जानेवारी रोजी संजीवनी कृषी महोत्सव राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. … Read more

परभणी कृषी विद्यापीठातील आंदोलक विद्यार्थ्यांची देवेंद्र फडणवीसांनी घेतली धावती भेट

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे मागील दोन दिवसापासून परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी धावती भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांकडून आपल्या मागण्यांचे निवेदन विरोधी पक्षनेत्यांना देण्यात आले. या प्रश्नी वैयक्तिक लक्ष देईल असे आश्वासन विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना दिले आहे. आज परभणी … Read more

परभणी जिल्हा कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलं काळ्या फिती लावून कामकाज

नियमबाह्य काम आणि आपली मनमानी करण्यासाठी, स्वाभिमानी शेतकरी संघटना दादागिरी करत असल्याचा आरोप करत, परभणी कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आज निषेध आंदोलन केल आहे. काळ्या फिती बांधून कामकाज चालू ठेवल असल तरी स्वाभिमानीच्या काल झालेल्या आंदोलनाच्या विरोधात. आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन, कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

परभणी मनपाच्या रिक्त जागेसाठी मतदानाला सुरुवात

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने रिकाम्या झालेल्या परभणी मनपाच्या एका जागेसाठी आज मतदानाला सुरुवात झाली आहे. यावेळी सकाळपासून मतदानाला येणाऱ्यां नागरिकांचा अत्यल्प प्रतिसाद दिसत असून दुपारनंतर मतदार मोठ्या संख्येने मतदान करण्यासाठी येतील अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. परभणी महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक १४ अ मधील नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने, या ठिकाणी … Read more

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात विद्यार्थ्यांचे बेमुदत कॉलेज बंद आंदोलन सुरु

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील चारही कृषी विद्यापीठाचे विद्यार्थी आक्रमक झाले असून, आज पासून बेमुदत कॉलेज बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. त्या अंतर्गत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील विद्यार्थी ही धरणे आंदोलनाला बसले असून, आपल्या मागण्या मान्य झाल्याशिवाय, आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका मांडली आहे. राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांनी … Read more

राष्ट्रीय स्वयंसेवकसंघावर कायदेशीर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्या!- राजरत्न आंबेडकर

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे संविधान वाचवण्यासाठी मागील ६ वर्षापासून मी देशात व विदेशात लढत आहे. जर देशाचे संविधान वाचले तरच हा देश शांततेत राहिल, त्यासाठी केंद्राच्या सत्तेतुन फक्त नरेंद्र मोदी व अमित शाहांना हटवून चालणार नाही तर या पाठीमागे असणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कायदेशीर बंदी घालण्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी संविधान प्रिय सर्व जाती, … Read more

परभणी जिल्ह्यात अवकाळी पावसाचा पिकांना फटका; गहू, ज्वारीसोबत फळबागांचे लाखोंचे नुकसान

परभणी प्रतिनिधी । गजानन घुंबरे परभणी जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला असून रविवारी संध्याकाळी झालेल्या पावसाने रब्बी पिकांसह व फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.शनिवार दि. १ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील हवामानामध्ये अचानक बदल होत ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. त्यातच रविवारी दिवसभर ऊन-सावल्यांचा खेळ राहिल्यानंतर सायंकाळच्या वेळी काळेकुट्ट ढग जमा होत संध्याकाळी ७ वाजेनंतर जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी … Read more

परभणीमधील सेलूत सूर्यनमस्कार शिबिर संपन्न

जागतिक सूर्यनमस्कार दिनाचे औचित्य साधून, आज परभणी जिल्ह्यातील सेलू येथे, सूर्यनमस्कार शिबिर आयोजित करण्यात आले. सेलू शहरातील श्रीराम कॉलनी मैदानावर शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग नोंदवला.

परभणी जि.प.च्या विषय समिती सभापतीपदावरही महाविकास आघाडीचा ताबा

राज्यातील सत्तेमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वीरित्या राबविल्यानंतर, परभणी जिल्हा परिषदेमध्ये ही घटक पक्षांनी सत्ता ताब्यात घेत, काही दिवसांपूर्वी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पद राष्ट्रवादीने काँग्रेसने बिनविरोध मिळवले. त्यानंतर आता शुक्रवार दि. ३१ जानेवारी रोजी झालेल्या विषय समितीच्या सभापतीपद निवडीतही महाविकास आघाडीने ताबा मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसने जिल्हा परिषदेचे बांधकाम, अर्थ आणि पशुसंवर्धन असे तीन सभापती पदे मिळवली. तर घटक पक्ष असलेल्या काँग्रेसला महिला आणि बालविकास सभापती पद देण्यात आल आहे.