पंतप्रधान मोदींनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यावर उद्धव ठाकरे म्हणाले…

मुंबई । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मुख्यमंत्री झाल्यावर उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ट्विटरच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावर उद्धव ठाकरे यांनीही … Read more

चीननं घुसखोरी केली नाहीचं, असं म्हणणारे लोक देशभक्त असूच नाहीत- राहुल गांधी

नवी दिल्ली । पूर्व लडाखमधील भारत-चीन सीमावाद अजूनही संपुष्टात आलेला नाही आहे. दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत. मात्र, तरीही सीमावादाचा तिढा सुटताना दिसत नाही आहे. दुसरीकडे मागील काही दिवसांपासून काँग्रेस नेते राहुल गांधी व्हिडीओ ट्विट करून चीनच्या भारतीय सीमेतील घुसखोरीच्या मुद्यावर आपली भूमिका मांडत आहेत. राहुल गांधी यांनी नवीन व्हिडीओ … Read more

”दम असेल तर रोजगार वाढवून दाखवा, दाढी-मिशी तर कोणीही वाढवतो”- काँग्रेस

मुंबई । देशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रित कारण्यासाठी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा निर्णय घेतला होता. तब्बल दोन ते अडीच महिने देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आला होता. या काळात अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा वगळता सर्वच व्यवहार ठप्प झाले होते. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर आणि सेवा व उद्योग क्षेत्रांवर झाला. याचा मोठा आर्थिक फटका बसला असून, रोजगाराच्या संधीही प्रचंड … Read more

पंतप्रधान मोदींची प्रतिमा हा काही राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही- राहुल गांधी

नवी दिल्ली । ”पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १०० टक्के लक्ष हे केवळ स्वत:च्या प्रतिमा निर्मितीवर केंद्रित आहे. सरकारच्या ताब्यात असलेल्या संस्था याच कामात जुंपल्या गेल्या आहेत. मात्र, एखाद्या माणसाची प्रतिमा हा राष्ट्रीय धोरणासाठी पर्याय असू शकत नाही,” असे मत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केले. राहुल गांधी यांनी गुरुवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवर एक व्हीडिओ … Read more

ठरलं! राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्याचं हस्ते होणार

पुणे । अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणार असून या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान कार्यालयाला आगस्ट महिन्यातील २ तारखा पाठवल्या होत्या.मात्र, या दोन्ही तारखांबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अजून उत्तर आलं नव्हतं. दरम्यान, येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार असल्याचे निश्चित … Read more

राम मंदिर भुमिपूजनाच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय- काँग्रेस

मुंबई । अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या बचावासाठी काँग्रेस धावून आली आहे. उद्धव ठाकरेंचा अपमान केला जात असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरेंना राम … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्यत जाणार का? संजय राऊत म्हणाले..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. दरम्यान या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार की नाही याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे. “अयोध्येला उद्धव … Read more

पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? निलेश राणेंचा सवाल

मुंबई । अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर केलेल्या वक्तव्याने भाजप नेते आक्रमक झाले आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. माजी खासदार निलेश राणे यांनी देखील पवारांच्या या विधानावरून त्यांच्यावर टीका केली आहे. पवारसाहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? मंदिर हा हिंदूंचा श्रध्देचा विषय आहे त्यात … Read more

आता विना Guarantee मिळणार 1.80 लाख रुपयांचे Loan, हवीत फक्त ‘ही’ तीन कागदपत्रे

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरियाणा सरकारने पशु किसन क्रेडिट कार्ड योजना हरियाणा किसान क्रेडिट कार्ड सारखी सुरू केली आहे. हे कार्ड राज्यातील सुमारे 6 लाख पशुपालकांना देण्यात येणार आहे. या कार्डवर पात्र व्यक्तींना कोणत्याही हमीभावाशिवाय 1 लाख 80 हजार रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जाईल. राज्याचे कृषिमंत्री जे पी दलाल यांनी ही माहिती दिली आहे. त्याअंतर्गत … Read more

तुम्ही मोदींना नव्हे श्रीरामाला विरोध करताय; उमा भारतींची शरद पवारांवर टीका

नवी दिल्ली । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी मोदी सरकारकडून सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी टिप्पणी केल्यानं आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ‘मंदिर बांधून कोरोना जाईल असं काहींना वाटतंय’ या शरद पवारांच्या विधानावर भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी सोमवारी संताप व्यक्त केला. शरद पवार यांनी राम मंदिरासंदर्भात केलेले वक्तव्य हे मोदी विरोधी … Read more