पंतप्रधान मोदी अयोध्येत दाखल; हनुमानगढी मंदिरात केली पूजा, रामलल्लाचे घेतलं दर्शन

अयोध्या । आज अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हेलिकॉप्टरद्वारे अयोध्येत भूमिपूजनासाठी दाखल झाले असून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांचं स्वागत केलं. यांनतर पंतप्रधान मोदींनी अयोध्येतील हनुमानगढी मंदिरात केली पूजा, मंदिराची केली परिक्रमा. यांनतर पंतप्रधान मोदी यांनी रामलल्लाचे दर्शन घेतलं. त्यानंतर आता पुढील कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

दुपारी १२.३० वाजता राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडेल. या सोहळ्यादरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच या परिसरात जाण्यासाठी निमंत्रण पत्रिकांवर हाय सिक्युरिटी कोड देण्यात आला आहे. या द्वारेच त्या व्यक्तीला भूमिपूजनाच्या स्थळी प्रवेश देण्यात येत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भूमिपूजनाच्या कार्यक्रमासाठी अयोध्येत दाखल झाले असून सर्व निमंत्रितही या ठिकाणी पोहोचले आहेत.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

You might also like