… म्हणून केंद्र सरकारने देशातील जनतेची माफी मागितली पाहिजे : सचिन पायलट यांचा सरकारवर निशाणा

sachin pilot

नवी दिल्ली वृत्तसंस्था : भाजप पक्षाला केंद्रामध्ये सत्ता स्थापन करून ७ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र विरोधी पक्ष काँग्रेसने केंद्रातील भाजप सरकारला अपयशी सरकार म्हंटले आहे. देशात महागाई ,बेरोजगारी अशा अनेक मुद्द्यांवरून काँग्रेसने भाजपाला धारेवर धरले आहे. काँग्रेसनेते सचिन पायलट यांनी देखील ७ वर्षे पूर्ण केलेल्या भाजप सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकारने देशातील जनतेची … Read more

नवी मुंबईत भाजपाला धक्का ‘या’ बड्या नेत्याचा ‘मनसे’त प्रवेश

mns

हॅलो महाराष्ट्र ओनलाईन : नवी मुंबई भाजपमध्ये गेल्या काही दिवसांपासून पडझड पाहावयास मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. अशातच राजकीय हालचालींना वेग आल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र नवी मुंबई भाजपाला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कळंबोली उपशहर अध्यक्ष नितीन काळे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला आहे. आगामी नवीमुंबई निवडणुकीत नितीन काळे यांच्यावर … Read more

महाबळेश्वर सभापती संजूबाबा गायकवाड पदाचा कार्यभार स्विकारताच फिल्डवर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर पंचायत समिती सभापती संजूबाबा गायकवाड यांनी आपल्या सभापती पदाचा कार्यभार स्वीकारताच तालुक्यात पायाला भिंगरी बांधून काम सुरु केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील जनतेला आरोग्याच्या सुविधा पुरविण्यासह कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजना आणि घ्यावयाची काळजी, याकरिता संपूर्ण तालुक्यातील प्रत्येक गावात भेट देऊन जनजागृती करताना दिसत आहेत. कोरोना प्रतिबंधक लस … Read more

फेसबुक पोस्ट ः मलकापूरच्या मनोहर भाऊंच्या कामाचा बोलबाला, कार्यकर्त्यांसाठी तत्परता

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यातील लाेणंद या गावात एका रुग्णास रेमडेसिव्हीर इंजेक्शनची आवश्यकता हाेती. खंडाळा तालुक्यातील काॅंग्रेसच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांना अडचण सांगितली. अन् केवळ काही काळातच कार्यकर्त्यांच्या हाकेला मनोहर भाऊंनी धाव घेत अडचण सोडवली. त्यामुळे सातारा जिल्हा काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांच्यात सध्या मनोहर भाऊंच्या कामाच्या बोलबाला सुरू आहे. खंडाळा तालुक्यातील रुग्णासाठी … Read more

शरद पवारांना “लबाड” म्हणत सदाभाऊ खोतांचा राज्य सरकारवर हल्लाबोल

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना जम्बो कोविड सेंटर उभे करायला सूचना केल्या होत्या. कोणीही कोविड सेंटर उभे केले नाही. आता साखर कारखान्यांना ऑक्सिजन फ्लॅन्ट उभे करायला सांगितले आहेत. लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नसतं, म्हणजे राज्यात तहान लागल्यावर आड काढण्याचा उद्योग चालू आहे. आता तुम्ही प्लॅन्ट केव्हा उभा करणार, कारखानदार ते उभे करणार … Read more

कुंभमेळाव्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येला मोदी, योगी जबाबदार – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कुंभमेळाव्यात वाढत असलेल्या रूग्णसंख्येला सर्वस्वी केंद्रसरकार व योगी सरकार जबाबदार आहे. कुंभामेळाव्याला धार्मिक उत्सावाला जी खुल्या प्रमाणात परवानगी दिली, ते निषेधार्ह आहे. तसेच देशातील कोरोनाच्या परिस्थितीला केवळ केंद्र सरकारच जबाबदार असल्याची टीका माजी मुख्यमंत्री, आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी केली. माजी मुख्यमंत्री आ. चव्हाण म्हणाले, देशातील निवडणूका हाताळलेल्य आहेत. तसेच कुंभामेळाव्याला … Read more

आजवरच्या सगळ्याचं सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली केवळ फसवणूकच केली ; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजवर सगळ्याचं सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली केवळ फसवणूकच केली असून त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेना या सगळ्या पक्षांचा समावेश आहे.म्हणून पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजातून येणाऱ्या बिरप्पा मोटे यांना संधी दिली त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्या,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज … Read more

केंद्रीय अर्थसंकल्प म्हणजे संचितमत्ता विकून मोदींची आत्मनिर्भरता – पृथ्वीराज चव्हाण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी देशाचा अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी मांडताना देशातील सर्व समाजघटकांना समोर ठेवून त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी मांडलेला एक आराखडा असतो. आतापर्यंतच्या जवळपास सर्वच अर्थमंत्र्यांनी त्यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात सामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेवून विविध योजना, आराखडे सादर केले आहेत परंतु आज देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी कोरोना महामारीने त्रस्त असलेल्या सामान्य नागरिकांऐवजी काही मूठभर उद्योगपतींना केंद्रस्थानी … Read more

पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून पाचवडच्या प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहण

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी माजी मुख्यमंत्री तथा कराड दक्षिणचे आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नाने ४५ कोटींचा निधी मंजूर झालेल्या कराड तालुक्यातील पाचवडेश्वर येथील कृष्णा नदीवरील प्रस्तावित पूलाच्या कामाची पाहणी आ. चव्हाण यांनी गुरुवारी केली. हा पूल दोन खोऱ्यांना जोडणारा दुवा ठरेल. यामुळे पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्ग आणि कराड-तासगाव महामार्गाही एकमेकांना जोडला जावून या परिसराच्या विकासाला … Read more

अकलूजच्या डाॅ. धवलसिंह मोहिते पाटलांचा उद्या काॅग्रेसमध्ये प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

Dhavalsinh Mohite Patil

सोलापूर प्रतिनिधी | अकलूज येथील डाॅ. धवलसिंह मोहिते पाटील उद्या आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह काॅग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. राज्य कुस्तीगिर संघटनेचे उपाध्यक्ष असलेले डाॅ. धवलसिंह हे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जात होते. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशा नंतर धवलसिंह आणि राष्ट्रवादीचे … Read more