आजवरच्या सगळ्याचं सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली केवळ फसवणूकच केली ; प्रकाश आंबेडकरांचा घणाघात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आजवर सगळ्याचं सत्ताधाऱ्यांनी धनगर समाजाची आरक्षणाच्या नावाखाली केवळ फसवणूकच केली असून त्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि सेना या सगळ्या पक्षांचा समावेश आहे.म्हणून पंढरपूर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने धनगर समाजातून येणाऱ्या बिरप्पा मोटे यांना संधी दिली त्यांना आपण भरघोस मताने निवडून द्या,असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज केले.

आंबेडकर आज पंढरपुरात प्रचारासाठी आले होते. राष्ट्रवादीचे नेते आमदार भारत भालके यांच्या अकस्मात मृत्यूमुळे झाल्यामुळे या जागी पोट – निवडणूक होते आहे.राष्ट्रवादीकडून भारत भालके यांचे सुपुत्र मैदानात आहेत तर भाजपकडून समाधान आवतडे यांना संधी देण्यात आली आहे.आणि आता वंचित बहुजन आघाडीने निवडणुकीत चुरस निर्माण करत एन्ट्री घेतली आहे. कारण पंढरपुरात धनगर समाजाचे मत निर्णायक मत आहे. त्यामुळे हे मत ज्याच्याकडे जाईल त्याचा विजय निश्चित मानला जातो आहे.

धनगर समाजातील काही प्रतिष्ठित मंडळी भाजपकडे तसेच राष्ट्रवादीकडे तिकीट मागायला गेले होते. मात्र दोन्ही पक्षांनी धनगर उमेदवाराला तिकीट नाकारले आणि हे तिकीट प्रस्थापितांना देण्यात आले. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्या पक्षापासून धनगर समाजाने वेळीच सावध व्हावे, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. फक्त आपला माणूस निवडून द्या पुढचं मी बघतो असही आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like