एका पत्रकाराचं बाळासाहेबांना खुल पत्र…

Untitled design

आदरणीय बाळासाहेबजी… सप्रेम नमस्कार ………………….. मी अनेक वर्षांपासून आपलं राजकारण पाहतोय. ज्यांच्याबद्दल आदर वाटावा अशा आंबेडकरी चळवळीतील नावांपैकी आपलं एक ठळक नाव.शेतकरी संघटनेच्या पाठिंब्यावर नांदेड लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवली होती,तेव्हा पत्रकार म्हणून मी आपल्या प्रचारात होतो.हे सांगण्याचा हेतू एवढाच आहे की, मी आपला विरोधक नाही. काल शिवाजी पार्कवर झालेली आपली आणि खा.ओवेसी यांची भाषणं … Read more

आम्हाला चार जागा देणारे तुम्ही कोण? प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसवर हल्लाबोल

Untitled design

औरंगाबाद प्रतिनिधी | काँग्रेस आम्हाला चार जागा देणारे कोण? आम्ही दिलेल्या चार जागा तुम्ही घ्या अन्यथा फजिती करून घ्याल. आम्ही तुमचे सालगडी म्हणून राहणार नाही, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. मराठवाड्यात वंचित बहुजन आघाडीची जाहीर सभा शनिवारी पार पडली. यावेळी आंबेडकर यांनी मोदी सरकार तसेच काँग्रेस व राष्ट्रवादी … Read more

प्रकाश आंबेडकरांनी केली ‘या’ पाच उमेदावारांची घोषणा 

Prakash Ambedkar

कोल्हापूर प्रतिनिधी | ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी बहुजन वंचित विकास आघाडीतर्फे लोकसभेच्या पाच जागांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यानुसार, पुणे मतदारसंघातून विठ्ठल सातव, बारामती येथून नवनाथ पडळकर, सातारा मतदारसंघातून सहदेव ऐवळे, माढा येथून विजयराव हणमंत मोटे, सांगली येथून जयसिंग उर्फ तात्या शेंडगे यांच्या नावांची त्यांनी घोषणा केली. मंळवारी कोल्हापूरमध्ये प्रकाश आंबेडकर यांची सभा पार पडली. … Read more

तर प्रकाश आंबेडकर मुख्यमंत्री होतील, पाटील यांचा दावा

लातूर प्रतिनिधी | एआयएमआयएमचे प्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांना वंचित बहुजन आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्ह्णून जाहीर करा अशी मागणी महाराष्ट्र लोकशाही आघाडीचे अध्यक्ष अण्णाराव पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्याकडे केली. लातूर येथे संपन्न झालेल्या बहुजन आघाडीच्या सत्ता संपासदन सभेत ते बोलत होते. यावेळी पाटील म्हणाले की, आम्ही प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात … Read more

डाॅ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापना केलेले हे मासिक झाले ९९ वर्षांचें, पहा कोण आहे संपादक

Dr Babasaheb Ambedkar

प्रबुद्ध भारत स्थापना दिवस | सुनिल शेवरे साल १९२०. परिषद माणगाव. अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर. छत्रपती शाहू महाराज यांनी याच परिषदेत डॉ बाबासाहेबांचं भविष्य ओळ्खल होतं म्हणून त्यांनी अस्पृशांचा एकमेव पुढारी म्हणून त्यांच्या नावाची घोषणा केली आणि आपल्या डोक्यावरील फेटा बाबासाहेबांच्या डोक्यावर घातला. आपणच खऱ्या अर्थाने अस्पृश्यतेचे प्रश्न सोडवू शकतो असा विश्वास मनात बिंबवणाऱ्या लोकराजा … Read more

निवडणुकांनंतर काँग्रेसच्या बॅगा उचलणारे व्हायचे नाही – प्रकाश आंबेडकर

प्रकाश आंबेडकर

अकोला प्रतिनिधी | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या कक्षात आणण्यासाठी काँग्रेसला दिलेल्या प्रस्तावानुसार आराखडा सादर होत नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडीतर्फे लोकसभेच्या आघाडीसाठी तडजोड करणार नाही, असा इशार बहुजन वंचित आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला दिला. आज शहरातील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आघाडीतील कळीचा मुद्दा आरएसएस हा असून तो मान्य … Read more

देशाला  चौकीदाराची नाही; मर्द पहारेकरीची गरज -असदुद्दीन ओवेसी

owesi

मुंबई प्रतिनिधी । ‘देशाला  चौकीदाराची नाही मर्द पहारेकरीची गरज आहे, जो संविधानाचे रक्षण करेल आणि  बाबासाहेब आंबेडकर  यांचे स्वप्न पूर्ण करेल’  अशी जोरदार टीका खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी  कल्याण येथे आयोजित  बहुजन वंचित आघाडीच्या महाअधिवेशनात  काँग्रेस व भाजपावर  केली. राहुल गांधी सध्याच्या चौकीदाराला चोर म्हणतात मात्र ते सुद्धा त्यातीलच एक आहेत.आतापर्यंत बनलेले सर्व चौकीदार चोर आहेत. भिमा-कोरेगाव हा दलितांचा विजय आहे, … Read more

साताऱ्याच्या पुरोगामी गादीवर प्रतिगामी बसलेत, आबेंडकरांचा उदयनराजेंवर घरातघुसून हल्लाबोल

Untitled design

सातारा प्रतिनिधी | ‘साताऱ्याची गादी पुरोगामी आहे मात्र सध्या त्या गादीवर प्रतिगामी बसले आहेत. पाणी बरंच गढुळ झालं आहे आता ते फेकुण द्यावं लागणार आहे’ असं म्हणुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख डाॅ. प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांना टोला लगावला. साताऱ्यातील गांधी मैदानावर आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या सभेत आंबेडकर बोलत होते. सातारच्या … Read more

प्रकाश आंबेडकरांचे RSS ला आव्हान, हिम्मत असेल तर आमचं हे चेलेंज स्वीकारा

Prakash Ambedkar vs Mohan Bhagwat

नांदेड प्रतिनिधी | बहुजन वंचित आघाडीचे नेते आणि भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज नांदेड येथील सभेत सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या मुद्द्यावरून राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली. तुमचा  सांस्कृतिक राष्ट्रवाद नक्की काय आहे ते पहिल्यांदा सांगा. आम्ही तुमच्या सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाद घालायला तयार आहोत’ असे म्हणून आंबेडकर यांनी आर.एस.एस. ला आव्हान दिले. हिम्मत असेल … Read more

धनगरांमुळे भाजपाचे तर मुस्लिमांमुळे काँग्रेसचे गणित बिघडले – प्रकाश आंबेडकर

Prakash Ambedkar

नांदेड | महाराष्ट्रात तिसरी आघाडी म्हणून उदयास  येत असलेली बहुजन वंचित आघाडी आणि त्यांच्या होणाऱ्या रेकॉर्ड ब्रेक सभा पाहून मुख्य पक्ष म्हणून ओळखले जाणारे काँग्रेस आणि भाजपा जोमाने हलायला लागल्याचे दिसत आहे. त्यातच आज ‘धनगर समाजामुळे भाजपाचे तर मुस्लिम समाजामुळे काँग्रेसचे गणित बिघडले आहे.’ असा टोला बहुजन वंचित आघाडीचे नेते व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष … Read more