“तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. !!” महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आंतरजातीय लग्नाची रंजक गोष्ट

“मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”

प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगांत घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही – आडम मास्तर

सोलापूर प्रतिनिधी | राज्याभर आता विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे नारळ फुटले असून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरु झाल्या आहेत. असाच एका प्रचार सभेत कामगार नेते आडम मास्तर यांची जीभ घसरली आहे. प्रणिती, तुझ्या बापाला तुरुंगात घातल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली आहे.

सर्व राजकारण्यांची संपत्ती वाढली मात्र आडम मास्तरवर गुन्हे वाढले असं वर्तमान पत्रात आलं होतं. माझ्यावर आत्तापर्यंत १६५ गुन्हे दाखल आहेत. आणि गुन्ह्यांची डबल सेंच्यूरी मारल्याशिवाय मी शांत बसणार नाही असं म्हणत आडम यांनी आपल्यावरील गुन्हे हे आपल्यासाठी अलंकार असल्याचं म्हटलं आहे.

माझ्यावर इतके गुन्हे नोंद असून मी भित नाही. मी परवानगी नसताना सत्याग्रह केले, आंदोलनं कली, मोर्चे काढले. हे सगळं लोकांसाठी केलं असं सागत काही जणांवर नुसते पाच गुन्हे नोंद काय झाले तर ते थरथर कापायला लागतात असं म्हणत आडम यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्यावर निशाणा साधला.

 

आघाडीतील बिघाडी टळली, राष्ट्रवादी युवक अध्यक्षाने घेतली प्रणिती शिंदेंविरुद्ध माघार

दरम्यान जुबेर बागवान यांच्या माघार घेण्याने काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रणिती शिंदे यांचे ‘रुपाभवानी’च्या चरणी विजयासाठी साकडे

सोलापूर प्रतिनिधी । राज्यात सध्या नवरात्रीचा उत्सव सुरु आहे. प्रत्येकजण आपापल्या परीने देवीची उपासना करत आहे. काँग्रेसच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांनी तब्बल ५ किलोमीटर चालत जाऊन रुपभावानी मातेचे दर्शन घेतलं. रविवारी पहाटे पाच वाजताच आमदार प्रणिती शिंदे आपल्या सातरस्ता येथील निवासस्थानापासून तुळजापूर रस्त्यावरील रुपभवानी मंदिरात जाण्यासाठी कार्यकर्त्यांसह बाहेर पडल्या. … Read more

‘सोलापूर मध्य’साठी शिवसेनेकडून ‘काँग्रेसच्या निष्ठावंताला’ उमेदवारी

सोलापूर प्रतिनिधी। अखेर ‘सोलापूर शहर मध्य’चा शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रश्न निकाली लागला आहे. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी कोणाला मिळणार या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे.  निवडणुकीच्या तोंडावर ‘सोलापूर शहर उत्तर’चे माजी काँग्रेस आमदार दिलीप माने यांना शिवसेनेकडून ‘सोलापूर शहर मध्य’साठी उमेदवारी जाहीर झाली आहे. दिलीप माने यांना शिवसेना पक्षाध्यक्ष उद्धव ठाकरेंनी ‘एबी फॉर्म’ही दिला आहे. आता काँग्रेसच्या … Read more

प्रणिती शिंदेंकडून आचारसंहिता भंग? नरसय्या आडम यांची तक्रार

कोल्हापूर प्रतिनिधी। राज्यभरात शनिवारी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. आचारसंहिता लागू झालेली असताना सोलापुरात पहिल्याच दिवशी माजी आमदार नरसय्या आडम यांनी शहर मध्य मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारांना मेकअप बॉक्स वाटप करून आचारसंहिता भंग केल्याची तक्रार निवडणूक निर्णयाधिकारी तथा जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे केली आहे. आमदार प्रणिती शिंदे यांनी मतदारसंघात मतदारांना आकर्षित करण्यासाठी … Read more

विधानसभेत अधिवेशन काळात सोलापूर जिल्ह्यातून भारत भालके, प्रणिती शिंदेचा आवाज

सोलापूर प्रतिनिधी |सोलापूर जिल्ह्यातील अधिवेशन काळातील प्रश्न आणि उपस्थितीची आकडेवारी समोर आली आहे. त्यानुसार सोलापूर जिल्यातील 11 विधानसभांमधून विधिमंडळात अधिवेशनाच्या काळात एकूण 256 प्रश्न विचारले गेले होते. त्यामध्ये पंढरपूर-मंगळवेढ्याचे काँग्रेसचे आमदार भारत भालके सर्वाधिक 66 प्रश्नांनासह आघाडीवर आहेत तर प्रणिती शिंदे यांनी 61 वेळा प्रश्न विचारले आहेत. विशेष म्हणजे नुकतेच राष्ट्रवादीमधून सेनेत गेलेले बार्शीचे माजी … Read more