शरद पवारांबद्दल प्रचंड आदर, पण..; यूपीए अध्यक्ष पदाबाबत आणखी एका काँग्रेस नेत्याची ठाम भूमिका

sharad pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना युपीएचे अध्यक्ष करावी अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. परंतु राऊतांच्या या मागणीमुळे महाविकास आघाडी मध्ये ठिणगी पडल्याचे चित्र दिसत आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नंतर आता प्रणिती शिंदे यांनी देखील सोनिया गांधी याच आमच्या नेत्या असल्याचे म्हंटल आहे. … Read more

अखेर काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र नाना पटोलेंच्या हाती; प्रणिती शिंदेंसह ‘या’ नेत्यांना नवी जबाबदारी

मुंबई । विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आत नाना पटोले यांची महाराष्ट्र काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत काँग्रेसच्या हायकमांडकडून अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्षसोबतच काँग्रेसचे ६ कार्यकारी अध्यक्षपदाचीही नियुक्ती करण्यात आली आहे. नाना पटोले यांनी गुरुवारीच विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर आज ही घोषणा करण्यात आली आहे. नव्या प्रदेश … Read more

जेथे शेतकऱ्याचं ऐकलं जातं नाही तो देश खरंच प्रजासत्ताक आहे का ? प्रणिती शिंदेंचा सवाल

सोलापूर । सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर मधील काँग्रेस भवन येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. यावेळी सोलापूर शहर काँग्रेस कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, गेल्या ६२ दिवसांहून अधिक काळापासून दिल्लीच्या सिंघू सीमेवर हजारो शेतकरी मोदी सरकाराच्या दडपशाहीला विरोध करत ठाण मांडून बसले आहेत. यावर प्रणिती शिंदे यांनी भाष्य करताना, … Read more

भाजपच्या नेत्यांना समोरासमोर बोलता येत नाही म्हणून पाठीवर खंजीर खुपसतात – प्रणिती शिंदे

सोलापूर : “भाजपकडून फोन टॅपिंग करुन खालच्या थराचं राजकारण केलं गेलं. समोरासमोर उभं राहुन त्यांना सामना करता येत नाही म्हणून ते पाठीवर खंजीर खुपसतात”, अशी घणघस्ती टीका काँग्रेसच्या नेत्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केली आहे. फडणवीस सरकारच्या काळात भाजपकडून विरोधी पक्षातील नेत्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला आहे. राज्यात सुरु … Read more

प्रणिती शिंदेंच्या मंत्रिपदासाठी युवक काँग्रेसचे धरणे आंदोलन

महाविकासआघाडीच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात सोलापूर जिल्ह्याच्या पदरी निराशाच पडली आहे. सोलापूर जिल्ह्यातून काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे यांना मंत्रिमंडळातून जाणीवपूर्वक जातीपातीच राजकारण करून डावलण्यात आलं असा आरोप प्रणिती शिंदे समर्थकांकडून केला जात आहे. सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असूनही याची दखल प्रदेश पातळीवरून घेण्यात आली नाही.

ज्येष्ठांना डावलून ‘या’ तरुण चेहर्‍यांना मिळणार मंत्रीपद, पहा संभाव्य मंत्र्यांची यादी

मुंबई | उद्या 30 डिसेंबर रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात आमदार प्रणिती शिंदे आणि आमदार बच्चू कडू यांचा समावेश निश्चित मानला जात आहे. शिवसेनेच्या खात्यातून बच्चू कडू यांना मंत्रिपद दिले जाईल. अचलपूर विधानसभा मतदारसंघातून बच्चू कडू सलग चौथ्यांदा विजयी झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदाच विधानसभेवर निवडून आलेल्या अदिती तटकरे यांची राज्यमंत्रीपदी वर्णी निश्चित समजली जाते. … Read more

हैदराबाद पोलिसांना शाब्बासकी देत सरकारने क्लीन चिट दिली पाहिजे- आमदार प्रणिती शिंदे

आज सकाळी हैद्राबाद बलात्कार प्रकरणातील ४ आरोपींचा तेलंगणा पोलिसांनी एन्काउंटर केला. त्याबद्दल आमदार प्रणिती शिंदे यांनी पोलिसांच अभिनंदन केलं आहे. विविध क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींनी या कारवाईचे समर्थन केलं असताना सरकारने त्या पोलिसांच्या पाठीशी उभ राहून पोलिसांना क्लीन चिट दिली पाहिजे. असं मत प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केलं आहे. ”या पुढे बलात्काऱ्यांचा थर्ड डिग्री टॉर्चर करून एन्काउंटर करायला पाहिजे आणि या केस मधील फाईल लवकरात लवकर क्लोज करुन पोलिसांना शाब्बासकी दिली पाहिजे” असंही प्रणिती शिंदे यांनी म्हटलं.

‘सोलापूर मध्य’च्या प्रणिती शिंदे पिछाडीवर

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सकाळी आठ वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. सोलापूर शहर मध्य मतदारसंघामधून राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या कन्या आणि विद्यमान आमदार प्रणिती शिंदे या मतदारसंघातून पिछाडीवर असल्याचे चित्र दिसत आहे. वेगवेगळ्या मतदारसंघांमधून प्राथमिक कल हाती येऊ लागले आहेत.

मी सिंधिया नाही तर ‘शिंदे’च आहे तेव्हा बहीण प्रणितीला विजयी करा – ज्योतिरादित्य सिंधिया

भारताच्या राजकारणात जरी मी सिंधिया असलो तरी महाराष्ट्राच्या राजकारणात मी शिंदेच आहे. असं मत मध्यप्रदेशचे उपमुख्यमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी व्यक्त केलं. आज सोलापूरमध्ये प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी त्यांची सभा आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी बहीण प्रणिती शिंदे यांना भरघोस मतांनी विजयी करा असं आवाहन केलं.
 

चलती का नाम गाडी; प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात गाडीचं स्टेरिंग खुद्द प्रणिती शिंदेंकडेच

विधानसभा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे तसा आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारात जोर लावला आहे. जास्तीत जास्त लोकांशी संपर्क साधतांना त्या दिसत आहेत. असेच सकाळी शहरातील पार्क स्टेडियम भागात कार्यकर्त्यांसोबत फिरत असतांना, तुम्ही एकट्याच महिला का फिरता असा सवाल एका जेष्ठ व्यक्तीने केला. त्यावर ‘एक नारी सबको भारी’ असे चटकन उत्तर देत प्रणिती मिश्कीलपणे हसल्या.