काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर; पहा कधी होणार मतदान

Rahul and sonia gandhi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसमध्ये अध्यक्षपद बदलाच्या चर्चा सुरु आहेत. यासाठीची निवडणूक कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार,17 ऑक्टोबरला काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीची (CWC) आज बैठक पार पडली. या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. त्यानुसार … Read more

गुलाम नबी आझाद यांचा राजीनामा; काँग्रेसला मोठा झटका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांनी आपल्या काँग्रेस सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस साठी हा मोठा धक्का मानला जात आहे. गुलाम नबी आझाद हे गेल्या काही दिवसांपासून पक्षावर नाराज असल्याच्या चर्चा होत्या. अखेर आज त्यांनी काँग्रेसला रामराम ठोकत आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी … Read more

अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्ष झाले तरी… ; नाना पटोलेंचं मोठं विधान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । काँग्रेस अध्यक्षपदासाठी काउंटडाउन सुरु झालं आहे. येत्या 20 सप्टेंबर पर्यंत नव्या अध्यक्षपदासाठी निवडणूक होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपद गांधी घराण्यातच राहणार की बिगर गांधी परिवारातील व्यक्तीच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे लवकरच स्पष्ट होईल. राहुल गांधी अजूनही अध्यक्ष होण्यास नकार देत आहेत. त्यातच अशोक गहलोत यांचे नाव अध्यक्षपदासाठी समोर येत आहे. याच … Read more

काँग्रेसचे You Tube चॅनेल डिलीट; नेमकं कारण काय?

congress

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । काँग्रेस पक्षाचे यु ट्यूब चॅनेल इंडियन नॅशनल काँग्रेस सोशल मीडिया साइट यूट्यूब वरून डिलीट करण्यात आले आहे. देशभरात ‘भारत जोडो यात्रा’ सुरू करण्यापूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. यामागे कोणत्या कटाचा भाग आहे की काही तांत्रिक कारण आहे याचा तपास सुरू असल्याचे पक्षाने म्हटले आहे. काँग्रेस पक्षानेच आपल्या ट्विटर हँडलवर याबाबत … Read more

मोदीजी, देशातील महिलांना काय संदेश देत आहात? बिल्किस प्रकरणातील दोषींच्या सुटकेनंतर राहुल गांधी संतापले

rahul gandhi modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुजरातमधील बिल्किस बानो प्रकरणातील बलात्कार आणि हत्या प्रकरणी ११ आरोपींच्या सुटकेनंतर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. मोदीजी, तुमच्या बोलण्यात आणि वागण्यातला फरक संपूर्ण देशाला दिसत आहे अशी टीका त्यांनी केली. तसेच नारी शक्तीबाबत खोट्या वलग्ना करणारे महिलांना नेमका काय संदेश देत आहेत असा सवालही राहुल … Read more

काँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; प्रियांका गांधींना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले, राहुल गांधीही ताब्यात

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशातील वाढती महागाई, बेरोजगारीआणि ईडीच्या कारवायांविरोधात काँग्रेसने देशभर आंदोलन छेडले आहे. आज दिल्लीत झालेल्या या आंदोलना दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी याना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी प्रियांका गांधी याना पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेण्यात आल्याचं समोर आलं आहे. लोकसभा आणि राज्यसभा खासदारांनी संसद भवन ते राष्ट्रपती भवनापर्यंत मोर्चा काढला … Read more

देशातील सर्व यंत्रणा RSS च्या ताब्यात, लोकशाहीची हत्या सुरू; राहुल गांधी बरसले

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात ईडीची दहशत आहे. लोकशाही संपत चालली असून देशातील सर्व यंत्रणा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ताब्यात आहेत असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. दिल्ली येथील आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना राहुल गांधी यांनी विविध मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी म्हणाले, काँग्रेसने 75 वर्षात जे कमावलं ते भाजपने … Read more

ED ची मोठी कारवाई : नॅशनल हेराल्डच्या कार्यालयावर छापा 

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या ईडीच्या वतीने देशभरात ठिकठिकाणी छापे टाकले जात आहेत. ईडीच्या पथकाने नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांचीही चौकशी केली आहे. आता ईडीच्या पथकाने नॅशनल हेराल्डच्या दिल्ली व ठिकाणी कार्यालयावर छापा टाकला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात हे छापे टाकण्यात आले आहेत. नॅशनल हेराल्ड केस प्रकरणात ईडीने टाकलेल्या … Read more

संतापजनक ! महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा जवानावर थुंकल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. यामुळे संपूर्ण काँग्रेसमधे (congress) मोठी खळबळ उडाली आहे. या चौकशीला ठिकठिकाणी काँग्रेसच्या (congress) नेत्यांकडून विरोध केला जात आहे. विरोध व्यक्त करण्यासाठी अनेक ठिकाणी काँग्रेस (congress) कार्यकर्त्यांनी आंदोलने केली. यादरम्यान एक अत्यंत घाणेरडा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधी यांच्या ईडी … Read more

मोदींना कृषी कायद्याप्रमाणेच ‘अग्निपथ’ परत घ्यावा लागेल- राहुल गांधी

rahul gandhi narendra modi

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रातील मोदी सरकारने अग्निपथ या योजने अंतर्गत लष्करात युवकांना भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या योजनेअंतर्गत तरुणांना केवळ चार वर्षांसाठीच सैन्यात भरती केली जाणार असल्याचे म्हटले आहे.त्यानंतर देशभरातील विरोधकांनी सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही याबाबत टीका करताना मोदींना ही योजना मागे घ्यावीच लागेल अस … Read more