व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

राहूल गांधीची “भारत जोडो नव्हे, भारत तोडो यात्रा” : रामदास आठवले

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी

नरेंद्र मोदींनी सगळा भारत जोडलेला आहे. राहूल गांधींना पक्ष जोडता येत नाही आणि ते भारत काय जोडणार आहेत. त्यांना पक्षाला संभाळता येत नाही. काॅंग्रेस पक्षाची अवस्था एकदम डाऊन झालेली आहे. राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा आहे, ही “भारत जोडो नव्हे, तर भारत तोडो यात्रा आहे”, असा हल्लाबोल केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केला.

कराड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी रामदास आठवले म्हणाले, मोंदीचा सामना करणं हे राहून गांधींच काम अजिबात नाही. विरोधातील सगळे नेते आवाचून पंतप्रधान पदाकडे बघत आहेत. परंतु ते पद त्यांना सहजासहजी मिळणे अवघड आहे. मोदीच 2024 मध्ये पंतप्रधान होतील. भारतामध्ये मोदींचा सामना करेल, असा नेता नाही. नरेंद्र मोदी जगातील नंबर 1 चे लाडके नेते आहेत. त्यांचा गेल्या 8 वर्षात एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही. तेव्हा आता 2024 मध्ये 404 लोकसभा जागा जिंकेल.

खरी शिवसेना एकनाथ शिदेंचीच ः- धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनेचे आहे. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून हे खऱ्या शिवसेना पक्षाचे आहे. त्यामुळे हे धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांचेच आहे. परंतु हे चिन्ह गोठवा ही मागणी योग्य नाही. तसेच हे चिन्ह एकनाथ शिंदे यांनाच मिळेल, अशी आपल्याला खात्री आहे. 16 आमदारांचा अपात्रतेचा विषय आहे, तो बरोबर नाही. कारण निवडणुकीत या आमदारांनी व्हिपचा आदेश पाळला होता. बाहेरच्या व्हिपला काही एक अर्थ नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडे दोन तृतीयांश बहुमत आहे, त्यामुळे खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच असल्याचे एकनाथ आठवले आहे.