पुण्यात संततधार! खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाणी सोडण्याची शक्यता

पुणे प्रतिनिधी | पुणे शहर आणि परिसराला पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीतील चार प्रमुख धरणांच्या परिसरात बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर अधिक आहे. संततधार अशीच राहिल्यास खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या रहिवाशांना सावधानता बाळगण्याचा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे. Pune: Water … Read more

भोसले राजघराण्याच्या 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला, सोलापुरात खळबळ

सोलापूर प्रतिनिधी | परतीच्या पावसाने राज्यात धुमशान घातले आहे. सोलापूर शहरासह जिल्ह्याभरात पावसाचा हाहाकार उडाला आहे. या पावसाचा फटका भोसले राजघराण्यातील अक्कलकोट संस्थानच्या जुन्या राजवाड्याला बसला आहे. 373 वर्ष जुन्या राजवाड्याचा बुरुज ढासळला आहे. सोलापूरमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. परतीच्या पावसाच्या तडाख्यामुळे 373 वर्ष जुना असलेल्या … Read more

पावसाळ्यात घ्या ‘या’ गोष्टींची काळजी आणि रहा पूर्णपणे निरोगी

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । या वर्षीच्या पावसाळा सोबत कोरोनाचे सुद्धा संकट आले आहे. त्यामुळे एकासोबत अधिक काळजी घ्यावी लागणार आहे. पावसाळ्याच्या दिवसात सर्दी , खोकला, ताप असे आजार सभोवताली आहेतच. कोव्हिड- १९ अर्थात करोना हा नवा विषाणू आपल्या अवती भवती आहे. कोरोनाचे औषध हे सापडण्यासाठी सर्व स्तरावर विशेष प्रयत्न सुरु आहेत.मुळे यंदाच्या पावसाळ्यात प्रत्येकाने अधिक … Read more

रात्रीपासून मुंबईला मुसळधार पावसाने झोडपले; रेड अलर्ट जारी

मुंबई । कोकणसह मुंबईत रात्रीपासून जोरदाप पाऊस कोसळत आहे. पावसाने (Rain) मुंबईचे (Mumbai) हाल केले आहेत. मुसळधार पावसामुळे मुंबई शहरातील सखल भागात पाणी साचले आहे. काल रात्रीपासून शहरात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हिंदमाता, दादर टी.टी. किंग्ज सर्कल, सायन, चेंबूर, अंधेरी, सांताक्रूझ आणि इतर सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम … Read more

लय भारी !! तब्बल ४०० झाडे लावून बाल्कनीत बनवली शेती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतात जवळपास ७५% लोक शेती करतात. म्हणूनच भारताला कृषिप्रधान देश म्हंटले जाते. भारतात खूप कमी शेतीच्या आधुनिक पद्धती वापरल्या जातात . त्यामुळे उत्पन्न कमी मिळते. अनेक ठिकाणी पावसाच्या पाण्याचा प्रश्न हा असतोच कधी जास्त पडतो तर कधी कमी प्रमाणात पाऊस पडतो . त्यामुळे कधी पिकातून पैसे मिळतात तर कधी नाही अशी … Read more

रेल्वेने लाँच केले ‘हे’ खास अ‍ॅप, आता घरबसल्या तुम्हाला मिळेल रेल्वेची तिकिटे, वेळ आणि इतर सवलतींशी संबंधित माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने एक नवीन अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आता प्रवाशांना ट्रेनशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या पूर्व मध्य रेल्वेने हे समग्र अ‍ॅप तयार केले आहे. हे आपल्या Android फोनमध्ये विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला रेल्वे, ट्रेन, स्थानकातिल सुविधा, रेल्वे पॉलिसी, तिकिटे, … Read more

VIDEO: चक्क लहान मुलाप्रमाणे पावसात भिजण्याचा सचिनने लुटला मनमुराद आनंद

मुंबई । पाऊस म्हटलं, की अनेक आठवणी ओघाओघानं आल्याच. खुद्द मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याला अपवाद नाही. सध्याच्या काळात लॉकडाऊन, कोरोनाचं थैमान सुरु असताना हा सचिनही आपल्या कुटुंबासमवेत आपल्याच घरी काही क्षण व्यतीत करत आहे. अशाच क्षणांमध्ये त्यानं वरुणराजाचंही स्वागत केलं आहे. सचिननं इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केलेला व्हिडिओ पाहून याचाच अंदाज येत आहे. ज्यामध्ये एखाद्या … Read more

जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस; तापी नदीवरील हतनूर धरणाचे 12 दरवाजे अर्धा मीटरने उघडले

जळगाव । गेल्या पंधरवड्यापासून दडी मारलेल्या पावसाने जळगाव जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले आहे. आज पहाटेपासून जिल्ह्यात सर्वदूर पावसाला सुरुवात झाली आहे. जळगावमध्ये गेल्या 24 तासात हतनूर धरण क्षेत्रात 43.8 मिमी पाऊस झाल्याने आज सकाळी ९ वाजता धरणाचे १२ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले. सध्या धरणातून 9748 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. खबरदारी म्हणून धरणातून … Read more

राज्यात रेड अलर्ट! आज आणि उद्या अति  मुसळधार पावसाचा  इशारा 

मुंबई |  गेल्या अनेक दिवसांपासून दडी  घेतलेल्या पावसाने जुलै  महिन्याच्या सुरवातीपासूनच हजेरी लावली आहे. परंतु काही दिवसाच्या विश्रांतीनंतर आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान  खात्याने वर्तवली आहे. मुंबई, ,पालघर, ठाणे याभागांमध्ये रेड अलर्ट जारी  केला आहे. तर मराठवाड्यासह राज्याच्या इतर भागात जोरदार सरींची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्र ते केरळ चा किनारपट्यापर्यंत कमी दाबाचा  पट्टा  … Read more

ढालेगाव बंधारा तुडुंब, पाण्याचा विसर्ग सुरू; अशी आहे जिल्ह्यातील तालूकानिहाय पर्जन्यमान आकडेवारी

परभणी प्रतिनिधी | गजानन घुंबरे यावर्षी परभणी जिल्ह्यात वरुणराजाची चांगली कृपादृष्टी झाली असून सतत पडणाऱ्या पावसाने जिल्ह्यातील जलाशयातही पाणीसाठ्याची चांगलीच वाढ होत आहे. रात्री जिल्ह्यात सर्वदूर झालेल्या जोरदार पावसाने नदी नाल्यांना पूर आला असून गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या उच्च पातळीबंधाऱ्यां पैकी जिल्ह्याच्या सीमेवर सुरुवातीला असलेला ढालेगाव उच्च पातळी बंधारा तुडुंब भरलाय. सकाळपासूनच या बंधाऱ्यातून आता … Read more