रेल्वेने लाँच केले ‘हे’ खास अ‍ॅप, आता घरबसल्या तुम्हाला मिळेल रेल्वेची तिकिटे, वेळ आणि इतर सवलतींशी संबंधित माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेने एक नवीन अ‍ॅप तयार केले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून आता प्रवाशांना ट्रेनशी संबंधित सर्व माहिती मिळणार आहे. भारतीय रेल्वेच्या पूर्व मध्य रेल्वेने हे समग्र अ‍ॅप तयार केले आहे. हे आपल्या Android फोनमध्ये विनामूल्य डाउनलोड केले जाऊ शकते. या अ‍ॅपद्वारे तुम्हाला रेल्वे, ट्रेन, स्थानकातिल सुविधा, रेल्वे पॉलिसी, तिकिटे, सूट यासंबंधीची संपूर्ण माहिती मिळेल.

गाड्यांच्या हालचाल आणि आरक्षणाची माहिती घरात बसून मिळेल
जनरल मॅनेजर एलसी त्रिवेदी यांनी पूर्व मध्य रेल्वेच्या मुख्य कार्यालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हे लॉन्च केले. ते म्हणाले की या अ‍ॅपच्या माध्यमातून प्रवाशांना बर्‍याच सुविधांची माहिती मिळेल. गाड्यांची हालचाल आणि आरक्षणासारकाही सर्व माहिती घरीच उपलब्ध होईल. हे अ‍ॅप फक्त समस्तीपूर झोनमध्ये तयार केले गेले आहे. ज्यामध्ये डीसीएम प्रसून कुमार आणि टीआरएफ तंत्रज्ञ यांचे खूप सहकार्य लाभले आहे.

या गोष्टींसाठी मदत मिळेल
या अ‍ॅपद्वारे आता कोणताही प्रवासी झोनमधील कोणत्याही स्थानकातील उपस्थित प्रवासी सुविधांसह अन्य महत्वाची माहिती घेऊ शकतो. या अ‍ॅपचा फायदा प्रवाशांना तसेच रेल्वेच्या व्यावसायिक विभागच्या कर्मचार्‍यांनाही मिळणार आहे. तसेच तिकिट तपासणी, बुकिंग, आरक्षण इत्यादी विभागदेखील आपली रिपोर्ट बनवण्यासाठी या अ‍ॅपची मदत घेऊ शकतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment