राज्यात रक्ताचा तुटवडा, नेत्यांनीचं घेतला पुढाकार; राजेश टोपे अन् सुप्रिया सुळेंनी केलं रक्तदान

मुंबई । राज्यातील रुग्णालयांमध्ये कोरोना काळात रक्ताचा तुटवडा असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. गंभीर बाब म्हणजे, राज्यात पाच ते सहा दिवस पुरेल एवढाच रक्तसाठा असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. यानंतर राज्यात जाणवणाऱ्या रक्त तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर स्वत: राजेश टोपे आणि राष्ट्रवादीच्या नेत्या … Read more

‘कोरोनाची लस कधी येणार माहिती नाही, पण…’आरोग्यमंत्री राजेश टोपेंची मोठी माहिती

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस निर्मितीचा आढावा घेतला आहे. ती लस कधी येणार ते माहिती नाही. पण लस आली तर तिचं योग्य नियोजन सरकार करत आहे. कोल्ड स्टोरेज वाढवणं, त्याची साठवण क्षमता यावर सरकारची तयारी सुरु आहे, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात … Read more

कुणी कितीही मागणी केली तरी आधी लस कोरोना सेवकांनाच देणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे

मुंबई । कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत कोरोना सेवकांनाच लस देण्यात येणार असल्याचं स्पष्टीकरण आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलं आहे. प्रथम श्रेणीत लस देण्यात यावी अशी मागणी अनेक लोकप्रतिनिधींनी राज्य सरकारकडे केल्याची चर्चा आहे. मात्र, अशी कुणीही मागणी केलेली नसून कुणी कितीही मागणी केली तरी प्रथम श्रेणीत डॉक्टर्स, पोलीस आणि कोरोनावर काम … Read more

महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाउन होणार का ?? राजेश टोपेंनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | जगावर आलेलं कोरोना संकट अद्यापही पूर्णपणे टळलं नसून कोरोनाने पुन्हा एकदा डोक वर काढलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करोनाची लाट नव्हे, त्सुनामीची भीती असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात पुन्हा एकदा लॉकडाउन होणार का याकडे जनतेचे लक्ष लागले आहे. त्यातच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात पुन्हा निर्बंध … Read more

‘महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर महागात पडेल! तेव्हा..’ राजेश टोपेंचा जनतेला गंभीर इशारा

मुंबई । केरळ आणि दिल्लीमध्ये कोरोनाचा ग्रोथ रेट वाढत आहे. मास्कचा वापर टाळणं आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्यामुळे दिल्ली आणि केरळमध्ये ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली तर ती सर्वांना महागात पडेल, असा गंभीर इशाराच राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील जनतेला दिला आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत … Read more

महाराष्ट्र शासनाकडून सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून कोरोनाबाबत निर्णय ; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं कौतुक

Dr.harshwardhan

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोनासारख्या विषाणूला सगळ्या जगाला सामोरे जावे लागले. भारतातही कोरोनाचा मोठा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. त्यातही कोरोनाचा विळखा महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होता. महाराष्ट्रात अधिक गंभीर स्थिती होती. अशाही काळात महाराष्ट्र सरकारने सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले, अशा शब्दात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी राज्य सरकारचं कौतुक केलं. देशातील विविध राज्यांनी केलेल्या कोरोना … Read more

फटाकेमुक्त दिवाळीसाठी मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव ठेवणार, राजेश टोपेंचा मोठा निर्णय

मुंबई । फटाकेमुक्त दिवाळीसाठी राज्यात फटाक्यांवर बंदी आणण्याचा मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशासह राज्यावर कोरोनाचं महाभयंकर संकट घोंघावत आहे. त्याच पार्श्वभूमीवर फटाक्यांना बंदी घालण्याची भूमिका आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी मांडली आहे. (Rajesh Tope Propose Ban On Firecrackers Cabinet) “फटाकेमुक्त दिवाळी आपल्याला कशी साजरी करता येईल ही … Read more

राज्यात कोरोनाची दुसरी लाट येणार का ?? आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी वर्तवली ‘ही’ शक्यता

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ऑक्टोबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात राज्यातील करोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा किं चित वाढ दिसून येत आहे. त्यामुळे ही दुसऱ्या लाटेची सुरुवात आहे का याकडे तज्ज्ञ डॉक्टरांचे लक्ष आहे. मात्र राज्यामध्ये करोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमी असल्याचे मत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केलं आहे. तसेच दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असली तरी … Read more

कोरोना चाचणी झाली आणखी स्वस्त!! आरोग्यमंत्र्यांनी निश्चित केले नवे दर

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात खासगी प्रयोगशाळेत होणाऱ्या कोरोना चाचण्यांसाठीचे दर पुन्हा एकदा सुधारीत करण्यात आले असून प्रति तपासणी सुमारे 200 रुपये कमी करण्यात आले आहे. त्यामुळे आता नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार चाचण्यांसाठी 980, 1400 आणि 1800 रुपये असा कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार … Read more

धक्कादायक! राज्यात तब्बल साडे 12 लाख सदोष RTPCR किट्स वितरित, आरोग्यमंत्री राजेश टोपेंची कबुली

मुंबई । राज्यात कोरोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या 12 लाख 50 हजार किट्स सदोष आढळल्या असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिल्याचंही ते म्हणाले.दरम्यान या किट्सची खरेदी वैद्यकीय संचालनालयाकडून करण्यात येत असून GCC Biotech ltd या कंपनीच्या किट्सचा … Read more