‘या’ कारणामुळं राम मंदिर भूमीपूजनाविरोधात अलाहाबाद हायकोर्टात याचिका दाखल

प्रयागराज । अयोध्येतील राम मंदिर बांधकामाचं भूमीपूजन येत्या 5 ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. मात्र या प्रस्तावित भूमीपूजनाला विरोध करत एक याचिका अलाहाबाद हायकोर्टात दाखल केली आहे. यात राममंदिराचं भूमीपूजन म्हणजे अनलॉक 2 च्या गाईडलाईन्सचं उल्लंघन असल्याचं म्हटलं आहे. याचिकाकर्ता दिल्लीचे पत्रकार साकेत गोखले यांनी हायकोर्टात चीफ जस्टिस यांना लेटर पीआयएलच्या … Read more

भाजपच्या ‘जय श्रीराम’ला राष्ट्रवादीचे ‘जय भवानी, जय शिवाजी’ म्हणतं उत्तर..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.  देशावर करोनाचे संकट असताना हे भूमिपूजन होत असल्यानं शरद पवार यांनी केंद्र सरकारच्या प्राधान्य क्रमावर टिप्पणी केली होती. शरद पवारांच्या या टिप्पणीचा भाजपकडून निषेध करण्यात आला. त्यानंतर भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पत्र पाठवण्याचं ठरवलं आहे. भाजपच्या … Read more

बकरी ईदचं का? अयोध्येतील राम मंदिराचं भूमिपूजनही प्रतिकात्मक करा- खा. इम्तियाज जलील

औरंगाबाद । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने बकरी ईद साध्या पद्धतीने आणि प्रतिकात्मक साजरी करण्याचं आवाहन केलं आहे. बकरी ईद प्रतिकात्मक साजरी करायची आहे तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ५ ऑगस्ट रोजी होणारं राम मंदिराचं भूमिपूजन प्रतिकात्मकरित्या साजरं करावं, सर्व नियम आम्हालाच का? असा सवाल खासदार इम्तियाज जलील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना  केला आहे. जलील यांच्या या … Read more

ठरलं! राम मंदिराचे भूमिपूजन ५ ऑगस्टला पंतप्रधान मोदी यांच्याचं हस्ते होणार

पुणे । अयोध्येत राम मंदिर उभारलं जाणार असून या मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. यासाठी राम मंदिर ट्रस्टच्या वतीनं पंतप्रधान कार्यालयाला आगस्ट महिन्यातील २ तारखा पाठवल्या होत्या.मात्र, या दोन्ही तारखांबाबत पंतप्रधान कार्यालयाकडून अजून उत्तर आलं नव्हतं. दरम्यान, येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं जाणार असल्याचे निश्चित … Read more

बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस भाजप का दाखवत नाही?- संजय राऊत

वृत्तसंस्था । बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ‘द इकॉनामिक टाईम्स’ला दिलेल्या मुलाखतीत एक मोठं विधान केलं आहे. “भाजपा एक पक्ष म्हणून आणि त्यांचे वरिष्ठ नेते आतातरी बाबरी मशीद विध्वंस प्रकरणी कारसेवकांच्या समूहाला दोष देण्यापेक्षा आतातरी बाबरी मशीद आम्हीच पाडली हे सांगण्याचं धाडस का दाखवत नाही?,” असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित … Read more

उद्धव ठाकरेंना राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं आमंत्रण दिलंच पाहिजे- गोविंदगिरी महाराज

पुणे । अयोध्येत राम मंदिर उभारणीला सुरुवात होणार असून येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भूमिपूजन केले जाणार आहे. या कार्यक्रमासाठी देशभरातील १५० जणांना निमंत्रण दिलं जाणार आहे. त्यासाठी कोणाला निमंत्रण द्यायचं याची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण दिले पाहिजे, अशी भूमिका राम मंदिर ट्रस्टचे … Read more

उद्धवजींचे वर्तन पहले सरकार फिर मंदिर असं झालंय! रावसाहेब दानवेंचा टोला

औरंगाबाद । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. दरम्यान अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. अशा वेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या भूमिपूजन सोहळ्यासाठी अयोध्येला जाणार का? याकडे साऱ्यांचं लक्ष … Read more

राम मंदिर भुमिपूजनाच्या निमंत्रणावरून उद्धव ठाकरेंचा अपमान केला जातोय- काँग्रेस

मुंबई । अयोध्या राम मंदिर भुमिपूजनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण न पाठवण्यावरून वाद सुरू झालाय. शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मंदिर कमिटीला पत्र देखील लिहिले. दरम्यान आता उद्धव ठाकरे यांच्या बचावासाठी काँग्रेस धावून आली आहे. उद्धव ठाकरेंचा अपमान केला जात असल्याचं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसैन दलवाई यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरेंना राम … Read more

उद्धव ठाकरेंनी धार्मिक कार्यक्रमांना प्रसिद्धी देण्यापासून दूर राहावं; राष्ट्रवादीच्या माजी खासदाराचं आवाहन

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन पार पडणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येतील या भूमिपूजन सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे नक्की जातील असं सांगितलं आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार माजिद मेमन यांनी ट्विट करत धर्मनिरपेक्ष सरकारच्या प्रमुखांनी धार्मिक सोहळ्याला जाणं … Read more

राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी उद्धव ठाकरे अयोध्यत जाणार का? संजय राऊत म्हणाले..

मुंबई । अयोध्येतील राम मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. दरम्यान या भूमिपूजन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार की नाही याबाबत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला नक्की जातील अशी माहिती संजय राऊत यांनी एबीपी माझा या वृत्तवाहीनीशी बोलताना दिली आहे. “अयोध्येला उद्धव … Read more