कोरोनाच्या अपयशावरुन लक्ष विचलित करण्यासाठी राम मंदिराचं भूमिपूजन- बाळासाहेब थोरात

मुंबई । देशात कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात आलेल्या अपयशावरुन जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी मोदी सरकारकडून राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याची घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली. येत्या ५ ऑगस्टला अयोध्येत अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. कोरोनाच्या संकटकाळात राम मंदिराचे भूमिपूजन इतके महत्त्वाचे आहे का, असा मुद्दा … Read more

तुम्ही मोदींना नव्हे श्रीरामाला विरोध करताय; उमा भारतींची शरद पवारांवर टीका

नवी दिल्ली । अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी मोदी सरकारकडून सुरु असलेल्या लगबगीच्या मुद्द्यावरुन शरद पवार यांनी टिप्पणी केल्यानं आता भाजप नेते आक्रमक झाले आहेत. ‘मंदिर बांधून कोरोना जाईल असं काहींना वाटतंय’ या शरद पवारांच्या विधानावर भाजपच्या फायरब्रँड नेत्या उमा भारती यांनी सोमवारी संताप व्यक्त केला. शरद पवार यांनी राम मंदिरासंदर्भात केलेले वक्तव्य हे मोदी विरोधी … Read more

अयोध्या दौऱ्यासाठी उद्धव ठाकरेंना पवारांची NOC लागू नये हीचं अपेक्षा; प्रवीण दरेकरांची टीका

मुंबई । राम मंदिराबाबत शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यामुळं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आता विरोधकांच्या निशाण्यावर आले आहेत. अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शरद पवारांचे ना-हरकत प्रमाणपत्र (NOC) लागणार नाही अशी अपेक्षा आहे,’ असा खोचक टोला विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी हाणला आहे. ‘पहले मंदिर फिर सरकार अशी … Read more

उद्धव ठाकरेंना अयोध्येला जायला निमंत्रणाचा गरज नाही; संजय राऊतांचा भाजपाला टोला

मुंबई । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येतील राम मंदिराचा भूमिपूजन सोहळा पार पडणार आहे. त्यासाठी निवडक १०० मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, राम मंदिर भूमिपूजनाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निमंत्रण नसल्याच्या मुद्द्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांना छेडले असता, ” … Read more

एकाच वर्षात राम मंदिराचा निकाल, मुख्यमंत्रीपद ही शिवनेरीच्या मातीची कमाल आहे- उद्धव ठाकरे

मुंबई । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त शिवसैनिकांशी संवाद साधला. नेते, उपनेते, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व शिवसैनिकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. शिवनेरीवरची माती घेऊन राम जन्मभूमीला गेलो आणि एका वर्षात राम मंदिराचा निकाल आला. आपल्याकडे मुख्यमंत्रीपद आलं. शिवनेरीच्या मातीचीही कमाल असल्याची भावना यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांशी … Read more

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर उभारणीला ट्रस्टकडून स्थगिती

अयोध्या । सोमवारी रात्री लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या जवानांच्या हिंसक संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाले होते. भारत-चीन सीमेवरील या तणावाच्या पार्श्वभूमीवर राम मंदिर ट्रस्टनंही मोठा निर्णय घेतला आहे. राम मंदिर उभारणीचं काम तुर्तास थांबवण्यात येणार असल्याची माहिती राम मंदिर ट्रस्टकडून देण्यात आली आहे. भारत-चीन सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे आणि देशाचे संरक्षण करणे … Read more

पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार राम मंदिर शिलान्यास; ‘या’ तारखेवर होऊ शकतो शिक्कामोर्तब

नवी दिल्ली । श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या सदस्यांनी पंतप्रधानांना भेटून अयोध्येत निर्माण होणाऱ्या राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधानांनीही हे आमंत्रण स्वीकारले आहे. ट्रस्टच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २ जुलै रोजी म्हणजेच देव शयनी एकादशीच्या दिवशी पायाभरणी करण्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाने अद्याप ही तारीख … Read more

राम मंदिरासाठी लॉकडाऊनमध्येही दानाचा प्रचंड ओघ सुरुच; जमा झाली ‘इतक्या’ कोटींची देणगी

अयोध्या । देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे राज्य, जिल्हा व ब्लॉक स्तरावर सील करण्यात आल्या आहेत. सर्व मंदिरे आणि धार्मिक स्थळे अद्याप बंद आहेत. परंतु या लॉकडाऊन दरम्यानही राम मंदिर बांधण्यासाठी बनवण्यात आलेल्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या खात्यात मोठी देणगी जमा झाली आहे. राम मंदिर बांधकामासाठी … Read more

रामजन्मभूमी परिसरात सापडले मंदिराचे अवशेष; पहा फोटो

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राम जन्मभूमी अयोध्या येथे सध्या पूर्वीच्या गर्भगृह स्थळाचे सपाटीकरण करून नवे भव्य राममंदिर बांधण्याची पूर्वतयारी सुरु करण्यात आली आहे. या दरम्यान कपड्याचे मंदिर हटवून, हळूहळू पूर्वतयारी २० एप्रिल पासून जिल्हाधिकाऱ्यांच्या संमतीने करण्यात येत आहे. दिनांक ११ मे पासून सर्व शासकीय परवानगीसह खोदकामाला सुरुवात करण्यात आली होती. या खोदकामात जमिनीमध्ये काही पुरातन दगड … Read more

केंद्राची घोषणा! राम मंदिरासाठी दान देणाऱ्यांना आयकरात सूट

नवी दिल्ली । अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिराच्या निर्माणासाठी दान देणाऱ्यांना यापुढे आयकरात विशेष सूट मिळू शकणार आहे. केंद्र सरकारनं एक नोटिफिकेशन काढून तशी घोषणाच केली. देशात चर्चेचा विषय ठरलेल्या अयोध्येतील राम मंदिराच्या निर्माणा दरम्यान अर्थ मंत्रालायाकडून हा एक नवा आदेश जारी करण्यात आला आहे. या नव्या आदेशानुसार, राम मंदिर उभारणीसाठी आर्थिक मदत करणाऱ्यांना … Read more