विश्वचषक २०१९ आजच्याच दिवशी भारताने पाकिस्तानवर मिळवला होता शानदार विजय

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खेळविला जाणारा कोणताही क्रिकेट सामना म्हणजे त्यांच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. आणि अशातच तो सामना जर विश्वचषकातील असेल, तर मग सामन्यातील रोमांच अगदी शिगेला पोहोचतो. गेल्या वर्षीच इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडच्या ओल्ड ट्रफर्ड या मैदानावर भारतीय संघाने साखळी सामन्यात पाकिस्तानच्या संघाला पराभूत केले होते. टीम इंडियाची दमदार … Read more

युवराज सिंग अडचणीत; चहलबाबत जातीवाचक वक्तव्य केल्याप्रकरणी तक्रार दाखल

हिसार । रोहित शर्मासोबत लाईव्ह चॅटदरम्यान केलेल्या वक्तव्यामुळे युवराज सिंग चांगलाच अडचणीत आला आहे. या चॅटमध्ये युवराज सिंगने युझवेंद्र चहलबाबत जातीवाचक वक्तव्य केलं होतं. यावरून आता युवराजविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. हिसारच्या हांसीमध्ये दलित अधिकार कार्यकर्ते आणि वकिल रजत कलसन यांनी युवराजविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. रजत कलसन यांनी युवराज सिंगला अटक करण्याची … Read more

BCCI ने केली रोहित शर्माच्या नावाची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस

मुंबई । भारतीय क्रीडा क्षेत्रात मानाचं स्थान असलेल्या खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. प्रत्येक वर्षी खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांसाठी बीसीसीआय चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंची नावं क्रीडा मंत्रालयाकडे पाठवत असते. २०१९ विश्वचषकात ५ शतकांसह केलेली धडाकेबाज कामगिरी आणि याचसोबत कसोटी क्रिकेटमध्ये केलेलं दमदार पुनरागमन यामुळे बीसीसीआयने खेलरत्न पुरस्कारासाठी रोहित शर्माच्या नावावर शिक्कामोर्तब … Read more

रोहित शर्माचे संघातील पुनरागमन होणार कठीण ! सराव सुरू करण्यापूर्वी द्यावी लागेल फिटनेस टेस्ट

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसमुळे जगभरात खळबळ उडाली असतानाच क्रिकेट विश्वासही त्याची झळ बसलेली आहे. या धोकादायक साथीमुळे क्रिकेट पूर्णपणे ठप्प झाले आहे आणि यामुळे क्रिकेटर्स घरातच दोन महिने बसून आहेत. जरी आता खेळाडूंनी आउटडोर ट्रेनिंग घ्यायला सुरुवात केली आहे. मात्र भारतीय संघात पुन्हा परतण्यासाठी भारताचा सलामीवीर रोहित शर्माला फिटनेस टेस्ट पास करावी लागेल. वास्तविक, … Read more

सचिनने डोळ्यांवर पट्टी बांधून केलं युवराजचं हे चॅलेंज ब्रेक; पहा व्हिडीओ

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोना विषाणूच्या संसर्गाला रोखण्यासाठी सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येकजण आपापल्या घरी कैद झाला आहे. यामध्ये वेळ घालवण्यासाठी लोक ऑनलाईन सोशल मीडियावर बऱ्याच ऍक्टिव्हिटी करताना दिसतात. यावेळी अनेक सिनेस्टार्स तसेच क्रिकेटपटूही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत आहेत. यावेळेस काही क्रिकेटर्स हे एकमेकांना मोटिव्हेट करण्यासाठी चॅलेंज देत आहेत. असेच एक चॅलेंज युवराज सिंगने … Read more

रोहित शर्माने केलं मोठं विधान; म्हणाला धोनीने टीम मध्ये खेळायला हवं

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या टीम मध्ये पुन्हा येण्याच्या बातमी वर अनेक कयास सध्या लावले जात आहेत. धोनीने आपला शेवटचा सामना हा इंग्लड मध्ये झालेल्या २०१९च्या विश्वचषकामध्ये खेळला होता. वर्ल्ड कप मध्ये न्यूझीलंड बरोबर झालेल्या उपांत्य सामन्यानंतर धोनी टीम मध्ये पुन्हा दिसलेला नाहीये. मात्र २९ मार्च पासून सुरु होणार असलेल्या … Read more

बर्थ डे स्पेशल :सचिनच्या आयुष्यातील ५ संस्मरणीय खेळी,ज्यामुळे भारतीय क्रिकेटचा चेहरामोहराच बदलला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एक काळ असा होता की भारतीय क्रिकेटला सचिन तेंडुलकरच्या नावाने ओळखले जात असे.टीम इंडियाच्या सामन्यादरम्यान मैदानात अक्षरशः सचिन सचिन अशा घोषणा ऐकू येत असे…. असे वाटायचे की तर,टीम इंडिया नाही केवळ सचिनच खेळत आहे.तो आऊट झाल्यानंतर तर भारतीय प्रेक्षक मैदान सोडत असत आणि मग घरातच सामना पाहणारे चाहते दूरदर्शन टीव्ही बंद … Read more

धोनी आणि रोहित बनले गेल्या १२ वर्षांतले आयपीएलचे सर्वोत्तम कर्णधार, तर कोहलीला मिळाले हे स्थान

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । इंडियन प्रीमियर लीगने शनिवारी १२ वर्षे पूर्ण केली आहे आणि यानिमित्ताने चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यांची संयुक्तपणे या लीगचे सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून निवड झाली आहे. याशिवाय स्टार स्पोर्ट्सच्या तज्ज्ञ मंडळानेही आयपीएलमधील सर्वोत्कृष्ट खेळाडूंची निवड केली आहे. निर्णायक मंडळाला धोनी आणि रोहित दोघांनाही निवडता … Read more

दिग्गज खेळाडू रॉजर फेडररचे विराट कोहलीला खुले आव्हान म्हणाला,”जर हिम्मत असेल तर… “

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । यावेळी, संपूर्ण जग कोरोनाव्हायरस विरूद्ध लढा देत आहे.या धोकादायक साथीमुळे, जगभरात एकही क्रीडा स्पर्धा होत नाहीये, ज्यामुळे खेळाडूंना घरातच रहावे लागत आहे.जगातील दिग्गज खेळाडू रॉजर फेडररही त्यापैकी एक आहे. घरी असल्याने तो सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव्ह असतो.अलीकडेच या दिग्गज खेळाडूने सोलो ट्रेनिंगचा एक उत्तम व्हिडिओ शेअर केला आहे आणि त्याबरोबरच त्याने … Read more

या दिवशी:टी-२० वर्ल्ड कपमधील पराभवानंतर जेव्हा धोनीने ऑस्ट्रेलियन पत्रकाराला केले होते ट्रोल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या दिवशी, अगदी ४ वर्षांपूर्वी वेस्ट इंडीज संघाने टी -२०विश्वचषक २०१६ मधील उपांत्य सामन्यात भारताला ७ गडी राखून पराभूत केले होते. या सामन्यात वेस्ट इंडिजसमोर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारताने १९३ धावांचे लक्ष्य दिले होते. या सामन्यानंतर तत्कालीन भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने निवृत्तीच्या प्रश्नावर एका ऑस्ट्रेलियन पत्रकाराला ट्रोल केले होते. खरं … Read more