काँग्रेसने ‘या’ २ नेत्यांवर सचिन पायलट यांची समजूत काढण्याची सोपवली कामगिरी

नवी दिल्ली । बंडखोरी करून राजस्थानातील गहलोत सरकार अडचणीत आणणारे काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांना काँग्रेस पक्ष गमावू इच्छित नाही. त्यासाठी प्रियंका गांधी यांनी पक्षाचे जेष्ठ नेते अहमद पटेल आणि वेणुगोपाल यांना सचिन पायलट यांची समजूत काढण्याची कामगिरी सोपवली आहे. पायलट यांना पक्षात पुन्हा आणण्याचा हे नेते प्रयत्न करतील. या अगोदरही प्रियंका गांधी वाड्रा … Read more

… म्हणून सचिन पायलट समर्थक गटाने ठोठावला आता हायकोर्टाचा दरवाजा

जयपूर । राजस्थानमधील राजकीय नाट्य अजून संपलेले नसून काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट याच्या गटाने आता हायकोर्टाचा दरवाजा ठोठावला आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्षांनी सचिन पायलट गटाला व्हिपचे पालन न केल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. मात्र ही नोटीस अवैध असल्याने ती लागू होत नाही असा दावा करत या नोटिशीला सचिन पायलट गटाने राजस्थान हायकोर्टात आव्हान दिले … Read more

पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत; पायलट यांच्या बंडखोरीवर राहुल गांधींची आक्रमक भूमिका

नवी दिल्ली । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी राजस्थानमधील सत्तासंघर्षावर आज मोठं वक्तव्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजस्थानमधील राजकीय बंडखोरीवर त्यांनी बोट ठेवलं आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांचा थेट उल्लेख टाळत राहुल गांधींनी परखड भाष्य केलं आहे. पक्ष सोडणाऱ्यांसाठी दारं खुली आहेत, त्यांना घाबरण्याची गरज नसल्याचे असं राहुल गांधी म्हणाले … Read more

पक्षात परतण्यासाठी काँग्रेसने सचिन पायलट यांच्यासमोर ठेवली ‘ही’ अट

नवी दिल्ली । सचिन पायलट यांचे बंड मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि काँग्रेसने मोडून काढल्यानंतर पक्षानं पुन्हा एकदा परत येण्याची त्यांना विनंती केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषद घेऊन सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचं आवाहन केलं आहे. सुरजेवाला म्हणाले की, “आमचे युवा सहकारी सचिन पायलट यांची भूमिका आम्ही माध्यमांतून … Read more

सचिन पायलट यांच्या बंडानंतर काँग्रेसने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

जयपूर । सचिन पायलट यांच्या बंडानंतर राजस्थानमधील काँग्रेस सरकारसमोर अस्थिरतेचं संकट उभं राहिलं होतं. दरम्यान, राजस्थानमध्ये अचानक उफाळलेल्या या बंडाळीमुळे काँग्रेस सर्तक झाली असून, राज्यभरातील सर्व जिल्हा व गट समित्या बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राजस्थानचे प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी ही माहिती दिली. काँग्रेसचे राजस्थानमधील प्रभारी प्रदेशाध्यक्ष अविनाश पांडे यांनी यासंदर्भात महत्त्वाचं ट्विट केलं … Read more

भाजपमध्ये प्रवेश करणार का? सचिन पायलट म्हणाले…

नवी दिल्ली । बंडखोर सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करतील अशी चर्चा सुरु आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांनी भाजपासोबत मिळून सरकार पाडण्यासाठी षडयंत्र रचल्याचा गंभीर आरोप केला आहे. अशा वेळी सचिन पायलट भाजपमध्ये प्रवेश असल्याची शक्यता वर्तवली जात असताना खुद्द पायलट यांनी … Read more

राहुल गांधी यांची मर्जी राखण्यासाठीच आपण उपमुख्यमंत्रिपद स्वीकारले- सचिन पायलट

जयपूर । आपल्याला राजस्थानचे उपमुख्यमंत्रिपद नकोच होते असा गौप्यस्फोट राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून हटवले गेलेले काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट यांनी सांगितले. राहुल गांधी यांनी आपल्याला गळ घातल्यामुळेच आपण या पदासाठी तयार झालो, मात्र आपली ते पद स्वीकारण्याची इच्छाच नव्हती, असे पायलट म्हणाले. इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत प्रथमच आपल्या नाराजीवर पायलट यांनी जाहीर भाष्य केलं आहे. “आपण … Read more

काँग्रेसची सचिन पायलट यांना नोटीस; दोन दिवसांत उत्तर द्या! अन्यथा..

जयपूर । बंडखोर सचिन पायलट यांची राजस्थानच्या उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदावरुन उचलबांगडी केल्यानंतर काँग्रेसकडून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाकडून बोलावण्यात आलेल्या विधिमंडळ पक्ष बैठकांना गैरहजर राहिल्याने सचिन पायलट यांना ही नोटीस पाठवण्यात आली आहे. याशिवाय सचिन पायलट यांच्यासह बैठकीला अनुपस्थित राहिलेल्या अन्य १८ जणांना नोटीस पाठवण्यात आली आहे. या नोटिसीचे दोन दिवसात उत्तर … Read more

सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार!’ अशोक गेहलोत यांची जहरी टीका

जयपूर । सचिन पायलट यांचं धोरण म्हणजे ‘आ बैल मुझे मार’ सारखं आहे. अशी टीका आता राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पायलट यांच्यावर केली आहे. बंडाचा झेंडा हाती घेतलेल्या सचिन पायलट यांच्यावर काँग्रेस पक्षाकडून अखेर कारवाई करण्यात आलेली असून उपमुख्यमंत्री पदावरुन त्यांना हटवण्यात आलं आहे. दरम्यान पायलट यांची भाजपासोबत डील झाली आहे. त्यामुळे आता ते … Read more

सचिन पायलट यांच्या हातात काही नाही, भाजपा सर्व खेळ खेळत आहे- मुख्यमंत्री गहलोत

जयपूर । “सचिन पायलट यांच्या हातात काहीच नाही. भाजपा सर्व खेळ खेळत आहे. भाजपाने रिसॉर्टची व्यवस्था केली असून ते सर्व काही हाताळत आहेत. मध्य प्रदेशात काम करणारी टीम येथे काम करत आहे,” असा आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्री पदावरुन हटवण्याचीकारवाई करण्यात आल्यानंतर अशोक गेहलोत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद … Read more