ट्विस्ट! राजस्थान विधानसभा अध्यक्षांकडून सचिन पायलटांविरोधातील याचिका मागे

जयपूर  । राजस्थानच्या सत्तासंघर्षाने कमालीची कलाटणी घेतली आहे. राजस्थान विधानसभेचे अध्यक्ष सी.पी. जोशी यांनी सोमवारी सचिन पायलट यांच्यासह १८ बंडखोर आमदारांविरोधात केलेली याचिका मागे घेतली. सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर विधानसभा अध्यक्षांनी बंडखोरांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा प्रयत्न केला. मात्र, राजस्थान उच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिली होती. या निर्णयाविरोधात काँग्रेस सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, … Read more

भाजपने संविधानाला सर्कस, लोकशाहीला द्रौपदी तर जनमताला बंधक बनवलं आहे- काँग्रेस

नवी दिल्ली । राजस्थानमधील सत्तासंघर्ष अजूनही कायम आहे. मुख्यमंत्री अशोक गेहलोत विरुद्ध सचिन पायलट असा संघर्ष मागील आठवडाभरापासून बघायला मिळत आहे. दरम्यान, भाजप पुरस्कृत काँग्रेस आमदारांच्या घोडेबाजाराच्या मुद्द्यावरून हा संघर्ष विकोपाला जात आहे. या सत्तानाट्यावरून काँग्रेसचे नेते रणदीप सिग सुरजेवाला यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपानं संविधानाची सर्कस केल्याचा आरोप सुरजेवाला यांनी केला आहे. सुरजेवाला … Read more

.. तर मी त्यांचे स्वागत करेन; मुख्यमंत्री गेहलोतांनी दिले पायलट यांना परतण्याचे संकेत

जयपूर । राजस्थानातील सत्तासंघर्ष अजूनही संपला नाही आहे. काँग्रेसचे बंडखोर नेते सचिन पायलट आणि अशोक गेहलोत यांच्यातील मतभेद उफाळून आल्यानंतर मोठ राजकीय नाट्य उभं राहिलं. सध्या हा राजकीय संघर्ष न्यायालयात पोहोचला असून, काँग्रेसला अद्यापही दिलासा मिळालेला नाही. गेहलोत-पायलट यांच्यातील संघर्ष मिटण्याची शक्यता कमी असतानाच मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सचिन पायलट यांना सरकारमध्ये संधी देण्यास संमती … Read more

राजस्थानमधील सत्तासंघर्ष आता सुप्रीम कोर्टात

नवी दिल्ली । राजस्थामधील बंडखोर सचिन पायलट आणि मुख्यमनातरी अशोक गेहलोत यांच्यातील सत्तासंघर्ष आता सुप्रीम कोर्टाच्या दारातपर्यंत जाऊन पोहोचला आहे. सचिन पायलट यांच्या बंडखोरीननंतर राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी जोशी यांनी त्यांना अपात्रतेची कारवाईसंदर्भातील नोटिस पाठवली होती. या नोटिशीसनुसार शक्रवारपर्यंत कारवाई करू नये असा आदेश राजस्थान हायकोर्टाने दिला होता. या आदेशाला राजस्थान विधानसभा अध्यक्ष सी.पी जोशी … Read more

हायकोर्टाचा सचिन पायलट यांना दिलासा; २४ तारखेपर्यंत कारवाई न करण्याचे आदेश

जयपूर । राजस्थानमध्ये सुरू असलेल्या राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री सचिन पायलट यांना उच्च न्यायालयानं दिलासा दिला आहे. सचिन पायलट यांच्या गटाला उच्च न्यायालयानं २४ जुलैपर्यंत दिलासा देत सभापती सी.पी.जोशी यांना कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, उच्च न्यायालयानं आपला निर्णय २४ जुलैपर्यंत राखून ठेवला आहे. राजस्थान विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी … Read more

पायलट ६ महिन्यांपासून भाजपसोबत सरकार पाडण्याच्या तयारीत होते- मुख्यमंत्री गेहलोत

जयपूर । राजस्थानात मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरकारवरील अस्थिरतेचं संकट अजूनही कायम आहे. सध्या न्यायालयात हा वाद असून, माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्याविषयी बोलताना अशोक गेहलोत यांना संताप अनावर झाला. सचिन पायलट हे मागील ६ महिन्यांपासून भाजपासोबत मिळून कट रचत होते. जेव्हा मी याबद्दल बोलायचो, तेव्हा कुणीही माझ्यावर विश्वास ठेवला नाही,” अशी टीका मुख्यमनातरी गेहलोत … Read more

राजस्थानतल्या सत्तासंघर्षावर वसुंधरा राजेंनी सोडलं मौन; म्हणाल्या..

जयपूर । राजस्थानतल्या सत्तासंघर्षावर भाजप नेत्या आणि राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंनी मौन सोडत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली. राजस्थानात काँग्रेसमध्ये झालेलं बंड जनतेसाठी दुर्दैवी आहे. काँग्रेस त्यांच्या घरातल्या भांडणाचा दोष भाजपाच्या माथी मारु पाहतंय हे असले प्रकार करणं त्यांनी सोडावं. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत राजस्थानच्या जनतेला मोजावी लागते आहे ही बाब दुर्दैवी असल्याचं वसुंधरा राजे यांनी … Read more

सचिन पायलट परत आले, तर मी त्यांना मिठी मारेन,पण.. – अशोक गेहलोत

जयपूर । काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्या बंडखोरीनंतर राजस्थानातील अशोक गेहलोत सरकारवर राजकीय संकट अजून कायम आहे. एकीकडे पायलट यांच्यावर अन्याय झाल्याचे सूत्रांच्या हवाल्याने बातम्या येत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत प्रसारमाध्यांसमोर येऊन आपलं सरकार पडण्यामागे पायलट कसे सक्रिय होते याबाबत सांगत आहेत. दरम्यान, एका वृत्तवाहिनीशी बोलताना मागच्या दीड वर्षांपासून आमच्यात कुठलाही संवाद नाहीय” असे मुख्यमंत्री … Read more

सचिन पायलटांना हायकोर्टाचा मोठा दिलासा; अपात्रतेचीच कारवाई २१जुलैपर्यंत टळली

जयपूर । राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटात सचिन पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी सचिन पायलट यांच्यासह त्यांच्या समर्थक आमदारांचं सदस्यत्व रद्द करण्यासंदर्भात नोटीस बजावली होती. या नोटीसीला सचिन पायलट समर्थक आमदारांनी राजस्थान उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं. दरम्यान, सचिन पायलट व इतर सदस्यत्व रद्द करण्याची नोटीस बजावलेल्या … Read more

‘त्या’ ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ

जयपूर । राजस्थानमध्ये राज्य सरकारवरील अस्थिरतेचं संकट अद्यापही कायम असून रोज नाट्यमय घडामोडी घडत आहेत. याचदरम्यान एका ऑडिओ क्लिपमुळे राजस्थानमधील राजकारणात खळबळ माजली आहे.गुरुवारी एक धक्कादायक ऑडिओ क्लिप प्रसारमाध्यमांमधून समोर आली. यामध्ये केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत, भाजपा नेते संजय जैन आणि काँग्रेस आमदार भवरलाल शर्मा राजस्थान सरकारमधील आमदारांसंबंधी बोलत आहेत. आमदार भवरलाल शर्मा आणि … Read more