‘दिल्ली दरबारी छत्रपतींच्या वंशजांचा अपमान, तरी भाजप आणि संभाजी भिडे शांत का?- संजय राऊत

मुंबई । भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (udayanraje bhosale) यांनी बुधवारी राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली होती. त्यावेळी त्यांनी ‘जय भवानी जय शिवाजी’ अशी घोषणा केली होती. त्यास राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu) यांनी आक्षेप घेतला होता. त्यावरून शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं आहे. राऊत यांनी ट्विट करुन म्हटले आहे की, … Read more

संभाजी भिडे यांच्यावर लॉकडाऊनचे नियम मोडल्याप्रकरणी FIR दाखल 

सांगली प्रतिनिधी । देश कोरोनासारख्या संकटाशी झुंज देत आहे. त्यामुळे सर्वत्र संचारबंदीच्या नियमांचे पाल केले जात आहे. संक्रमण साखळी तोडून लवकरात लवकर सामान्य माणसाला त्यांचं दैनंदिन जीवन जगता यावं म्हणून सरकार काटेकोरपणे काही गोष्टी पाळत आहे. मात्र शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे संस्थापक संभाजी भिडे यांनी या संचारबंदीचे उल्लंघन केल्याची घटना घडली आहे. जिल्ह्यातून बाहेर जात असताना … Read more

टिकटॉकवरुन भिडे गुरुजींचा आक्षेपार्ह व्हिडीओ, अश्र्लील चित्रफीत व्हायरल करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या विरोधात टिकटॉक या सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडीओ पोस्ट करून जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांच्याकडे केली आहे. याबाबतचे निवेदन शिवप्रतिष्ठानचे कार्यवाहक नितीन चौगुले यांच्यासह कारकर्त्यांनी दिले आहे. जर या विकृत मनोवृत्तीच्या लोकांवर कठोर कायदेशीर … Read more

अखेर संभाजी भिडे गुरुजींनीच शोधला कोरोनावर इलाज; ऐकून तुम्हीही म्हणाल…

सांगली प्रतिनिधी । जगभरात जीवघेण्या कोरोना व्हारसरवर उपचार लस शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरु आहे. मात्र, अजूनही जगभरातील शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांना यश आलेलं नाही आहे. हा रोग जगभर फैलावातच असून हजारोंचे बळी आतापर्यन्त या कोरोनाने घेतले आहेत. अनेक देश उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहेत. अशा संकट काळात आपल्या बेताल वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेले श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे संभाजी भिडे गुरुजींनी आपलं … Read more

‘सांगली बंद’ला सुप्रिया सुळेंनी दर्शविला विरोध; राजकीय षडयंत्र असल्याचा केला आरोप

‘आज के शिवाजी: नरेंद्र मोदी’ पुस्तकाबद्दल भाजपमध्ये असलेल्या शिवरायांच्या वंशजांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली होती. त्यावर पक्षाचं नाव शिवसेना ठेवताना वंशजांना विचारलं होतं का, असं उदयनराजे यांनी म्हटलं होतं. त्याला उत्तर देताना राऊत यांनी उदयनराजेंकडून वंशज असल्याचे पुरावे मागितले. त्यांच्या या वक्तव्यामुळं राजकारण तापलं आहे.

संजय राऊत यांना पदावरून हाकला! संभाजी भिडेंची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मागणी

संजय राऊत यांनी एका कार्यक्रमात उदयनराजेंना शिवरायांचे वंशज असल्याचा पुरावा द्या म्हणून विचारणा केली होती. संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं राजकारण चांगलंच तापलं असतांना या वादात आता शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष संभाजी भिडे यांनी उडी घेत राऊत यांना पदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. ‘छत्रपती परंपरा ही हिंदुस्थानची प्राणभूत परंपरा आहे. या परंपरेचा वा वंशजांचा अवमान म्हणजे देशाचा अवमान आहे. त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना पदावरून हाकला,’ अशी मागणी भिडे यांनी केली आहे.

एनआरसी,सीएए कायद्याला विरोध करणारे देशद्रोही – संभाजी भिडे

नागरी सुधारणा कायदा आणि एनआरसीच्या समर्थनार्थ शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानच्यावतीने भव्य मोर्चा काढण्यात आला होता. शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे नियोजन करण्यात आले होते. यावेळी नागरी सुधारणा कायद्याला विरोध करणारे हे देशद्रोही आहेत अशी टीका संभाजी भिडे यांनी यावेळी बोलताना केली.

संभाजी भिडेंच्या प्रतिमेला शेणाचा प्रसाद ; बुद्धांवरील वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी आरपीआय आक्रमक

भिडे गुरुजी यांनी एका कार्यक्रमात भगवान गौतम बुद्ध यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गट) वतीने औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भिडे गुरुजींच्या प्रतिमेला शेण लावून आंदोलन करण्यात आलं.

एकादशीला यान सोडल्यानेच अमेरिकेची मोहीम यशस्वी – संभाजी भिडे

सोलापूर प्रतिनिधि | अमेरिकेने एकादशीच्या दिवशी अंतराळात यान सोडलं म्हणून अमेरिकेची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली, असा अजब दावा शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी केला आहे. त्यामुळे भिडे यांच्या या विधानावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. नवरात्रीमध्ये शिवप्रतिष्ठानच्या वतीने दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याच्या तयारीसाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला संबोधित करताना संभाजी भिडे यांनी हा अजब … Read more

पूराने केलेला विध्वंस बघून भिडे गुरुजींना आले रडू

सांगली प्रतिनिधी | भिडे गुरुजी आणि त्यांचे हिंदुस्थान प्रतिष्ठान पूराचे पाणी ओसरलेल्या भागात स्वच्छतेचे काम करत आहेत. कामात व्यस्थ असलेल्या भिडे गुरुजीसोबत माध्यमांच्या प्रतिनिधीने संवाद साधला असता भिडे गुरुजींना पूराने केलेला विध्वंस बघून अश्रू अनावर झाले. गोर गरिबांच्या घराची झालेली नासधूस बघून मला अत्यंत दुःख होत आहे अशी भावना भिडे गुरुजींनी यावेळी व्यक्त केली. सांगली आणि … Read more