मच्छी मार्केट प्रकरण : स्वच्छता मुकादम सचिन मद्रासी यांची पदावरून हकालपट्टी

सांगली | सांगलीतल्या मच्छी मार्केटमध्ये सकाळी अकरानंतर व्यवसायिकांनी दुकाने सुरू ठेवली होती. कर्तत्वात कसूर केल्याप्रकरणी मनपाचे स्वच्छता मुकादम सचिन मद्रासी यांना पदावरून हटविण्याची कारवाई उपायुक्त राहुल रोकडे यांनी केली. तर या प्रभागाचे स्वच्छता निरीक्षक वैभव कुदळे यांनाही ताकीद देण्यात आली. महापालिका क्षेत्रात लॉकडाऊन सुरू आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा सकाळी अकरा पर्यंत सुरू ठेवण्याचे आदेश प्रशासनाचे … Read more

इच्छाशक्तीच्या जोरावर ९५ वर्षाच्या आजीबाई घरीच झाल्या कोरोनामुक्त

सांगली | कुपवाड शहरातील शिवशक्ती नगर मधील 95 वयोवर्ष असलेल्या श्रीमती मुक्ताबाई रामचंद्र कारंडे यांनी कोरोना या भयंकर रोगावर जिद्द व इच्छाशक्तीने गृह विलगीकरणात उपचार घेत यशस्वी मात केली आहे. आजींना धाप लागण्यासारखा त्रास सुरू झाला. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने आजीबाई कोरोनामुक्त झालेल्या आहेत. मुक्ताबाई कारंडे यांच्या नातेवईकांनी आरोग्य विस्तार अधिकारी प्रशांत सातपुते यांच्या सहाय्याने त्वरित … Read more

सांगलीत कर्नाटकातून येणारा ऑक्सिजन पुरवठा खंडीत, दुपारपर्यंत पुरेल ऐवढा ऑक्सिजन साठा शिल्लक

oxygen plant

सांगली | कोरोनाच्या युध्दजन्य परिस्थितीत कर्नाटकातून सांगली जिल्ह्यासाठी दररोज मिळणारा 10 टन ऑक्सिजन बंद करण्यात आला आहे. कर्नाटक राज्यात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने ऑक्सिजन पुरवठा थांबविण्यात आला. ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्याने तुटवडा निर्माण होण्याची भीती असून प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. सद्यस्थितीत शुक्रवारी दुपारपर्यंत पुरेल ऐवढा ऑक्सिजन साठा शिल्लक आहे. त्यामुळे शासकीय आणि खासगी … Read more

सांगली जिल्ह्यात कोरोनाचा महाविस्फोट ः नवे विक्रमी २ हजार ३२८ रुग्ण, तर ३८ जणांचा मृत्यू

Sanagli Corona

सांगली | जिल्ह्यात कोरोनाने उद्रेक झाला असताना गुरुवारी रुग्णांचा महाविस्फोट झाला. एक दिवसात विक्रमी 2 हजार 328 रुग्ण आढळून आले. तर 38 जणांचा मृत्यू झाला. याशिवाय 1 हजार 134 जणांनी कोरोनावर मात केली आहे. सद्यस्थितीत रुग्णांना वेळेत उपचार मिळणे जिकीरीचे बनले आहे. बेडपासून ऑक्सिजन मिळविण्यासाठी झगडावे लागत असल्याचे चित्र आहे. सांगली महानगरपालिका क्षेत्रात नवे 314 … Read more

लसीकरण आरोग्य केंद्रावर शिवीगाळ व धक्काबुक्कीचा प्रकार

सांगली | भिलवडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नियोजन शुन्य कारभारामुळे लसीकरण विभागाजवळ लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांची मोठी गर्दी केली होती. या केंद्रावर शिवीगाळ व धक्काबुक्कीचे प्रकार घडला. कोणत्याही प्रकारचे नियोजन नसल्याने भिलवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर दिसून येत होते. लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांची प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आवारात मोठी गर्दी झाली होती. लसीच्या तुटवड्यामुळे गेल्या काही दिवसांपासून लसीकरण … Read more

कृष्णा सहकारी साखर कारखान्यांची अंतिम यादी प्रसिध्द, 46 हजार 340 मतदारांचा समावेश

Krishna Karad Rethre

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची अंतिम मतदार यादी गुरुवारी (दि.6 ) प्रसिद्ध झाली. साखर संघ पुणे व कारखाना कार्यस्थळावर ही यादी एकाच वेळी प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती पुणे साखर संघाचे प्रादेशिक सहसंचालक धनंजय डोईफोडे यांनी दिली. या यादीत 46 हजार 340 मतदारांचा समावेश … Read more

देशातील पहिलीच घटना : खून करणा-या अल्पवयीन आरोपीस बारा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

crime 2

सांगली | मिरज तालुक्यातल्या तुंग येथे झालेल्या अल्पवयीन मुलीच्या बलात्कार आणि खून प्रकरणी नराधम अल्पवयीन 17 वर्षीय मुलास न्यायालयाने दोषी धरून भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३६३, ३७६, ३७६ (अ), ३७६ (अ,ब), ३७७ (अ) तसेच पोक्सो कायदयांतर्गत कलम ४ व ६ खाली दोषी धरून प्रत्येक कलमांसाठी वेगवेगळी बारा वर्षे व प्रत्येक कलमान्वये १ हजार रुपये … Read more

सांगली जिल्ह्यात लसी आल्या अन् त्या संपल्याही, ऑनलाईन नोंदणीही बंद

सांगली | जिल्ह्यातील 45 वर्षावरील नागरिकांसाठी सरकारकडून पाच दिवसाच्या खंडानंतर बुधवारी सकाळी 18 हजार चारशे लशी दाखल झाल्या. जिल्हा परिषदेच्या आरोग्य भांडारातून तातडीने महापालिकेसह, जिल्हा परिषदेच्या आरोग्य केंद्रांना तातडीने वाटप झाले. दुपारनंतर लसीकरणाला सुरुवात झाली. सायंकाळी सहा वाजेपर्यंत बहुतांश केंद्रावरील लस संपली. शिल्लक लसी गुरुवारी तासाभरात संपतील, अशी माहिती जिल्हा आरोग्य विभागातून देण्यात आली. त्यामुळे … Read more

लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर सांगली बाजारपेठेत खरेदीसाठी झुंबड

सांगली | कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी आज मध्यरात्रीपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. लाॅकडाऊन लागणार असल्याने मंगळवारी सांगली-मिरज-कुपवाड महापालिका क्षेत्रात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. अनावश्यक गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त केली जात होती. सांगली शहरात किराणामाल, भाजीपाला, चिकन, मटण, अंडी यासह बेकरी पदार्थ, फळे आदींच्या खरेदीसाठी … Read more

एक हजार रूपयांत कोविड निगेटिव्ह रिपोर्ट देणाऱ्यास अटक

सांगली | मिरज रोडवर असणारे सिनर्जी हॉस्पिटल कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. आता या रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला अँटीजेन चाचणीचे बनावट रिपोर्ट विकताना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून रंगेहात पकडले आहे. स्वप्निल सुरेश बनसोडे असे अटक करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. अँटीजेन टेस्ट न करता फक्त आधार कार्डच्या माहितीच्या आधारे एक हजार रुपये … Read more