‘त्या’ बेपत्ता युवकाचा खून करून विहिरीत टाकला मृतदेह; दोघांना अटक

Lonand Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या किरकोळ कारणांवरूनवादावादी होत आहे. मात्र, पुढे हीच वादावादी जीव घेण्यापर्यंत जात आहे. अशीच घटना सातारा जिल्ह्यात घडली असून या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. फलटण तालुक्यातील डोंबाळवाडी येथून बेपत्ता झालेल्या युवकाचा खून झाल्याचे उघड झाले असून संबंधित युवकाचा मृतदेह गावातीलच एका विहिरीत आढळला आहे. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी दोघांना अटक … Read more

साताऱ्यापासून लोणावळ्यापर्यंत पाठलाग; पुणे कस्टम विभागाकडून 5 कोटीचे अंमली पदार्थ जप्त

Crime News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधात कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा ते लोणावळा दरम्यान थरारकपणे पाठलाग करून अंमली पदार्थांची तस्करी करणार्‍या चार जणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून तब्बल 5 कोटी रूपये किंमतीचे 1 किलो वजनाचे मेथामाफेटामीन अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. याबाबत … Read more

4 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर सातारा-रहिमतपूर मार्गावरील उड्डाणपूल वाहतुकीस खुला

Rahimatpur Railway Station flyover

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा-रहिमतपूर मार्गावरील महत्वाचा असलेल्या व गेल्या चार वर्षांपासून प्रतीक्षे असलेला रहिमतपूर रेल्वे स्टेशनजवळील उड्डाणपूल वाहतुकीस खुला करण्यात आला. हा पूल खुला केल्यामुळे या मार्गावरील वाहनधारकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. गेल्या चार वर्षांपूर्वी रहिमतपूर रेल्वे गेटवर या पुलासाठी निधी मंजूर झाला होता. मात्र, दोन वर्षांहून अधिक काळ पुलाचे काम रखडले होते. … Read more

साताऱ्यात खासदार उदयनराजेंनी चालविली 007 बुलेट; नेमकं काय म्हणाले उदयनराजे?

Udayanraje Bhosale

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडून साताऱ्यातील सामाजिक, धार्मिक अशा कार्यक्रमांना आवर्जून हजेरी लावली जाते. त्यांना दुचाकी व चारचाकी गाडयांचे विशेष प्रेम असल्यामुळे ते अधूनमधून साताऱ्यातून फेरफटकाही मारतात. त्यांनी नुकतीच साताऱ्यात 007 ही बुलेट चालविली आहे. निमित्त होतं ते म्हणजे शिवराज्याभिषेकाच्या 350 व्या दिनानिमित्त साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या शोभायात्रेच्या रॅलीचे … Read more

साताऱ्यात 1 जून रोजी येणार आम आदमी पार्टीची स्वराज्य यात्रा

Satara News Aam Aadmi Party

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सामान्य माणसांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आम आदमी पार्टीच्या वतीने स्वराज्य यात्रेची संकल्पना राबविण्यात आली आहे. त्या अनुषंगाने आदमी पार्टीच्या वतीने पंढरपूर ते रायगड अशी स्वराज्य यात्रा काढण्यात आली आहे. ही यात्रा सातार्‍यात 1 जून रोजी येणार आहे, अशी माहिती आम आदमी पार्टीचे सरदार सागर भोगांवकर व सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी … Read more

जावलीतील 50 विधवा अंगणवाडी सेविका, मदतनीसांनी घातले मंगळसूत्र

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जावली तालुक्यातील सातारा बाल विकास प्रकल्प आणि स्वर्गीय रमेश बनकर चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने नुकताच एक अभिनव उपक्रम राबविण्यात आला. यावेळी तब्बल 50 विधवा अंगणवाडी सेविका, मदतनीस महिलांना मंगळसूत्र, हळदी कुंकाचा करंडा, साडी-चोळी, चुडा देऊन सन्मानित करण्यात आले. जावली येथे आयोजित उपक्रमास परिसरातील संख्येने उपस्थिती लावत चांगला प्रतिसाद … Read more

7 घरफोडीतील चोरीच्या दागिण्यासह 49 सिलेंडर चोरणाऱ्या टोळीस अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात घडत असलेल्या घरफोडीच्या चोरीच्या गुन्हेगारास अटक करून त्यांच्याकडून घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यात जिल्हा पोलीस प्रशासनास यश आले आहे. आज पोलीस अभिलेखावरील आरोपीकडून 7 घरफोडी चोरीचे गुन्हे उघड करुन गुन्हयात चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी 6 लाख 31 हजार 600 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिणे, तांब्या पितळेची भांडी, 49 सिलेंडर … Read more

सातारा जिल्ह्यात ‘इतक्या’ गाव अन् वाड्यात अद्याप पाणीटंचाई

Satara News

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातारा जिल्ह्यात काही भागात अधून मधून पाऊस पडत असला तरी कडक उन्हामुळे काही गावात अद्यापही पाणी टंचाई भासत आहे. सध्या जिल्ह्यातील 7 तालुक्यातील 16 गावे आणि 50 वाड्यांसाठी 15 टँकर सुरू असून सर्वाधिक टंचाई ही माण तालुक्यात आहे. माण तालुक्यातील 7 गावे आणि 43 वाड्या तहानलेल्या असल्यामुळे माणमधील सुमारे 10 हजार … Read more

अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतीचे तात्काळ पंचनामे करा : पालकमंत्री शंभूराज देसाई

_Satara News Shambhuraj Desai

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्ह्यात दोन दिवसात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसान झालेल्या शेतजमिनीचे तत्काळ पंचनामे करावेत, असे निर्देश राज्य उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. सातारा जिल्हा नियोजन समितीची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीस पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार शिवेंद्रराजे … Read more

साताऱ्यातील ‘या’ मोहिमेच्या स्वागताला मुख्यमंत्री शिंदेंसोबत उपमुख्यमंत्री फडणवीस येणार

Eknath Shinde Devendra Fadnavis (1)

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील राहणारे असल्यामुळे ते अधून मधून आपल्या गावी येत असतात. त्यांच्याकडून सातारा जिल्ह्यातील महत्वाच्या कार्यक्रमांना हजेरी लावली जाते. मात्र, सातारा जिल्ह्यातील एका मोहिमेच्या स्वागताला भाजप नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे एकत्रितपणे येणार आहेत. राजधानी सातार्‍यातून दुर्गदुर्गेश्वर रायगडावर येणार्‍या मानाच्या कलशाचे स्वागत यंदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more