मी बीडीओ, मुलगा वकील म्हणत राज्य मार्ग खटाव तालुक्यात ट्रॅक्टरने नांगरला

Tractor Plowed Road

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके मी रिटायर बीडीओ, मुलगा वकील त्यामुळे मी सगळा डांबरी रस्ता उकरू शकतो, असे म्हणत चक्क काही महिन्यापूर्वीच तयार केलेला राज्य मार्ग 143 ट्रॅक्टरने नांगरला आहे.  वंजारवाडी (लक्ष्मीनगर) येथील शामगांव खिंड, पारगाव, गोरेगांव, पुसेसावळी, वंजारवाडी (लक्ष्मीनगर), गणेशवाडी, औंध असा असलेला राज्य मार्ग पुसेसावळी येथील रस्त्यालगत नांगरण्यात आला आहे. तेव्हा रस्त्यांचे नुकसाना करणाऱ्यांवर … Read more

डोंगरी तालुक्यांना विकासासाठी विशेष पॅकेज : आ. शंभूुराज देसाई

Shambhuraj Desai

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील स्व. विलासराव पाटील- उंडाळकर काका यांच्या विचारांनी डोंगर दऱ्यात राहणाऱ्या भागात विकास कामांची झाली आहेत. सुपने- तांबवे भाग केवळ विकास कामांची पाठराखण करणारा असल्याने गावांची विकास कामांची भूक थांबताना दिसत नाही. परंतु मीही लोकप्रतिनिधी असल्याने काकांची दूरदृष्टी समोर ठेवून विकास कामांना प्राधान्य देत आलो आहे. शिंदे सरकारने जिल्ह्याच्या विकासासाठीचा निधी … Read more

फलटणला इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण

Phaltan Indian Medical Association

फलटण | आय. आम. ए (इंडियन मेडिकल असोसिएशन) च्या फलटण शाखेच्या नविन कार्यकारणी पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ फलटण येथे डाॅ. जोशी हॅास्पिटल सभागृहात पार पडला. यावेळी आय. एम. ए फलटण शाखेच्या अध्यक्षपदी सर्वानुमते डॉ. संजय राऊत तर उपाध्यक्षपदी डॉ. संपत वाघमारे व डॉ. संतोष गांधी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या कार्यक्रमाला आय. एम. ए महाराष्ट्र … Read more

सकल हिंदू समाजाचा फलटणला जनआक्रोश मोर्चा

Phaltan Hindu community

फलटण | लव्ह जिहाद, धर्मांतर बंदी, गोहत्या बंदी, लोकसंख्या नियंत्रण कायदा, वक्फ बोर्ड रद्द करणे, देशात समान नागरी कायदा लागू करणे यासारख्या विषयांवर फलटण तालुक्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चाचे आयोजन सर्व सकल हिंदू समाजाच्यावतीने केले होते. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती दाखवली होती. या मोर्च्याला विविध पक्ष व विविध … Read more

फलटण तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा : पोलिसांची 9 जणांवर कारवाई

फलटण | सस्तेवाडी (ता. फलटण) याठिकाणी चालू असलेल्या अवैध जुगार अड्ड्यावर फलटण ग्रामीण पोलीसांनी छापा टाकला. या छाप्यात 9 जणावर कारवाई करण्यात आली असून रोख रक्कमेसह 2 लाख 93 हजार रुपये किमतींचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी, सस्तेवाडी गावच्या हद्दीत सतीश जाधव यांच्या शेताजवळ असलेल्या झाडाच्या खाली … Read more

साताऱ्यात लग्नातून 4 महिलांचे सोन्याचे दागिने लंपास

सातारा | शहरातील संगमनगर परिसरातील एका मंगल कार्यालयातून चार महिलांचे सुमारे 1 लाख 83 हजार रुपयांचे दागिने चोरट्याने लंपास केले आहेत. संगमनगर परिसरात सातारा- कोरेगाव रस्त्यावर मंगल कार्यालय आहे. दुपारी तीन ते साडेपाच या कालावधीत मंगल कार्यालयातील कार्यक्रमात आलेल्या चार महिलांचे अनोळखी चोरट्याने दागिने लांबविले. एका लग्नास आलेल्या आशा रामचंद्र अनपट (रा. अनपटवाडी, ता. वाई), … Read more

BIG BOSS : सातारचा बच्चन किरण माने अंतिम फेरीत

Kiran Mane Big Boss

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके गेल्या तीन महिन्यापासून राज्यभर गाजत असलेल्या कलर मराठी (Color Marathi) वरील बिगबॉसमध्ये (Big Boss) सातारचा (Satara) बच्चन किरण माने (Kiran Mane) याने आपल्या अभिनयाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अंतिम फेरीत इंन्ट्री केली आहे. आता किरण मानेच बिगबॉची ट्रॉफी जिंकेल, अशी अपेक्षा देखील सर्व सातारकरांना असून त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून समर्थन ही वाढू … Read more

विहे घाटात संरक्षक कठड्यावर चढली चारचाकी

Vihe Ghat Accident

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कराड- पाटण मार्गावर विहे घाटात दैव बलवत्तर म्हणून चार जणांच्या जीवावर बेतलेले थोडक्यात निभावले. विहे घाटातील नहिंबे- चिंरबे गावच्या हद्दीत एक चारचाकी गाडी रस्ता सोडून चक्क संरक्षक कठड्यावर चढली. या कठड्याच्या दुसऱ्या बाजूला 25 ते 30 फूट खोल भाग होता. परंतु ही गाडी या कठड्यावर जावून थांबली. त्यामुळे सुदैवाने प्रवाशी वाचले. … Read more

सूनबाई जोरात : कालेच्या शीतल देसाईंना Olympic मध्ये नेमबाजीत गोल्डसह 2 सिल्वर मेडल

Sheetal Desai Sports

कराड | पुण्यात शिव छत्रपती स्टेडियम बालेवाडी येथे महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक क्रिडा स्पर्धेत काले गावच्या 34 वर्षीय सूनबाईने चक्क गोल्ड मेडलसह 2 सिल्वर मेडल जिंकले आहे. शूटींग क्रिडा प्रकारात काले येथील शीतल प्रीतम देसाई यांनी तीन पदके जिंकली आहेत. आता त्याचे लक्ष्य हे जागतिक ऑलिम्पिक स्पर्धा असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातून जवळपास 10 हजार 456 खेळाडूंनी … Read more

आ. जयकुमार गोरेंना पुन्हा पुण्याला हलविले

Jaykumar Gore

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके माण- खटावचे आमदार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांना दोन दिवसापूर्वी हाॅस्पीटलमधून घरी सोडण्यात आले होते. परंतु गेल्या दोन दिवसात दगदग झाल्याने आ. जयकुमार गोरे यांच्या छातीतील वेदना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. त्यामुळे रुबी हॉल क्लिनिकच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार श्री. गोरे यांना शुक्रवारी रात्री पुन्हा पुण्याला हलवण्यात आले. फलटण- पंढरपूर मार्गावर मलठण … Read more