…तर 54 गावातील शेतकऱ्यांसोबत पाण्यासाठी मंत्रालयावर पदयात्रा काढू; डॉ. भारत पाटणकरांचा इशारा

Dr. Bharat Patankar

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके पाण्याअभावी जावळी तालुक्यातील गावे ओस पडू लागली आहेत. हे चित्र भयावह असून तालुक्यातील ५४ गावांसाठी बोंडारवाडी धरण महत्वाचे आहे. शासन या प्रश्नी लक्ष घालत नसून येत्या १५ दिवसात या धरणासंदर्भात राज्य शासनाने बैठक आयोजित केली नाही तर ५४ गावातील ग्रामस्थ शेतकरी पाण्यासाठी मंत्रालयावर पदयात्रा काढतील. आणि तरीही शासनाने प्रतिसाद दिला … Read more

युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी 3 आरोपींना पोलिसांच्या बेड्या

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा येथील एका युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी ३ आरोपीना पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतलं आहे. अवघ्या ३६ तासांत पोलिसांनी सदर घटनेचा छडा लावत आरोपीना जेरबंद केलं आहे. ३६ तासाचे आतमध्ये तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून कठोर परिश्रम करून एका संवेदनशील गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल पोलीस अधीक्षक … Read more

पाटण मतदार संघातून निवडणूक लढवून दाखवावी : शंभूराज देसाईंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

aditya thakre and shambhuraj desai

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके आदित्य ठाकरे गेले 6 महिने काहीच बोलत नव्हते. मात्र, आदित्य ठाकरे हे मुख्यमंत्री यांच्यावर बोलायला लागले आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान देत वरळीतुन उभं राहण्याचं आव्हान दिल आहे. मात्र, माझं आदित्य ठाकरे यांनी माझ्या पाटण मतदारसंघात उभं राहुन दाखवावं, असं आव्हान शंभुराज देसाई यांनी आदित्य ठाकरे यांना दिल आहे. … Read more

रेशनिंग धान्य दुकानदारांचा 3 दिवस देशव्यापी संप

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर फेडरेशन नवी दिल्ली यांच्यामार्फत पुकारलेल्या देशभरातील आंदोलनात सातारा जिल्हा रास्तभाव धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक संघटना सहभागी होणार आहेत. रेशनिंग दुकानदारांच्या विविध मागण्यांसाठी दि. 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला रेशनिंग धान्य दुकाने बंद राहणार आहेत. आगामी 3 दिवसाच्या आंदोलनाची शासनाने याची दखल न घेतल्यास पुढील … Read more

महामार्गावर आयशर ट्रक लोखंडी बॅरिगेट तोडून पुलाला धडकला

Karad Accident Truck

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पुणे- बेंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर मलकापुर शहराच्या हद्दीमध्ये आज पहाटे चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. कोल्हापूरहून पुण्याच्या दिशेला निघालेला ट्रक हायवेवरील लोखंडी बॅरिगेट तोडून पादचारी पुलाच्या पिलरला जावून धडकला. कराड शहराजवळ हायवेवरून पादचाऱ्यांना ये- जा करण्यासाठी असलेल्या पुलाल ट्रकने जोरदार धडक दिली. धडकेच्या आवाजाने आजूबाजूचे रहिवाश्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. ट्रकमध्ये अडकलेल्या … Read more

कोळेच्या बैलगाडी मैदानात काशी- भारत बैलजोडी अव्वल : बकासूर दुसऱ्या स्थानावर

Kole Village Bullock Race

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी कोळे (ता. कराड) येथील घाडगेनाथ महाराज वार्षिक यात्रेनिमीत्त झालेल्या बैलगाडी शर्यतीत आगाशिवनगर (ता. कराड) येथील अक्षय पोळ यांची काशी अणि भारत बैलजोडी अव्वल ठरली. प्रथम क्रमांकाचे 51 हजार रूपयाचे रोख बक्षिस पटकावले. तर मैदानावर प्रेक्षकांचे आकर्षण ठरलेला हिंदकेसरी बकासूर बैल दुसऱ्या स्थानावर राहिला आहे. मात्र, प्रेक्षकांनी बकासूला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली … Read more

शिक्षकांनी अद्ययावत अध्यापनकौशल्ये आत्मसात करावीत : डॉ. अनिल पाटील

Bapuji Salunke Collage Karad

कराड | शैक्षणिक क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत. त्यामुळेच नॅकच्या धर्तीवर आता उच्च माध्यमिक स्तरावर शाळासिद्धी मूल्यांकन सुरू असून, त्या पद्धतीने महावि़द्यालयांचे मूल्यमापन केले जात आहे. त्यामुळे भविष्याचा वेध घेत शिक्षकांनी अद्ययावत अध्यापनकौशल्ये आत्मसात करावीत, असे प्रतिपादन इचलकरंजी येथील डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी केले. कराड येथील शिक्षणमहर्षी बापूजी … Read more

शाब्बास : हाॅटेल मालकाने 7 लाखांचे सोन्याचे दागिने केले परत

Gold Jewellery Hotel Apala Gaona

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके पुणे- बंगलोर महामार्गावर गोव्याहून मुंबईला निघालेल्या ग्राहकांची 14 तोळे सोने असलेली पिशवी उंब्रज जवळील एका हाॅटेलात विसरली होती. परंतु या हाॅटेल मालकाच्या प्रामाणिकपणामुळे 7 लाखांचे दागिने मूळ मालकांना परत मिळाले. आपलं गाव या हाॅटेलमधील ही घटना आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उंब्रज येथील हॉटेल आपलं गाव या ठिकाणी सुमारे 7 लाख … Read more

पाटण तालुक्यातील 11 शेळ्या कोल्हापूरात सापडल्या : साडे एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त

Patan Crime

कराड प्रतिनिधी| सकलेन मुलाणी पाटण तालुक्यातील दिवशी खुर्द गावचे हद्दीत तावळदारे नावचे शिवारातून पाणी आणण्यास  सांगून इनोव्हा गाडीतून 11 शेळ्या चोरीला गेल्याची घटना घडली होती. या शेळ्यासह चारचाकी गाडी असा पाटण पोलिसांनी 21 लाख 46 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पाटण तालुक्यातून चोरलेल्या शेळ्या व दोन आरोपींना कोल्हापूर जिल्ह्यातून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याबाबतची माहिती अशी, … Read more

संघर्षातून आलेला प्रत्येकजण सकारात्मक व विकासात्मक असतो : बी. आर. पाटील

कराड प्रतिनिधी| विशाल वामनराव पाटील मुलांच्या जीवनात संघर्ष असल्याशिवाय तो यशस्वी होत नाही. परिस्थिती ही प्रत्येक गोष्टीचे मोल काय आहे, याची जाणीव करून देते. आपल्या मुलांना सर्व गोष्टी, वस्तू संघर्ष न करता मिळाल्यास त्याची किमंत त्यांना कळत नाही. त्यामुळे संघर्षातून घडलेला प्रत्येकजण यशस्वी होतोच. परंतु तो विकासात्मक व सकारात्मक असतो, असे मार्गदर्शन कराड शहर पोलिस … Read more