युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी 3 आरोपींना पोलिसांच्या बेड्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
सातारा येथील एका युवकाचे अपहरण करून खून केल्याप्रकरणी ३ आरोपीना पोलिसांनी रत्नागिरी येथून ताब्यात घेतलं आहे. अवघ्या ३६ तासांत पोलिसांनी सदर घटनेचा छडा लावत आरोपीना जेरबंद केलं आहे. ३६ तासाचे आतमध्ये तपासाची चक्रे जलद गतीने फिरवून कठोर परिश्रम करून एका संवेदनशील गुन्हयातील आरोपींना ताब्यात घेण्याची उल्लेखनीय कामगिरी केल्याबददल पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, २ फेब्रुवारी २०२३ ला सायंकाळी ५.०० वा.चे. सुमारास मौजे चांदक, ता. चाई गावचे हददीतून अभिषेक रमेश जाधव, रा. खानापुर ता. वाई याचे ३ इसमांनी अपहरण केले होते. त्याबाबत तो ज्यांच्याकडे वेल्डिंगचे काम करत होता त्यांनी त्याला किडनॅप केल्याबाबत भुईंज पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादी नुसार, ५५/२०२३ कलम ३६३५०६.२४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान सदर किडनॅप झालेल्या मुलाचा तसेच संशईत आरोपांचा भुईज तसेच वै पोलीस स्टेशनच्या अधिकारी व अमलदार यांनी त्यांचे हददीत शोध घेत असताना 3 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री ०९.३० वा. च्या सुमारास तो शेंदुरजणे ता. वाई गावचे हददीत जखमी अवस्थेत मिळुन आला. त्यास उपजिल्हा रुग्नालय वाई येथे औषधोपचारकामी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास पुढील उपचारसाठी साताऱ्याला पाठवले. मात्र उपचारादरम्यान पहाटे ०५.०० च्या दरम्यान अभिषेक जाधवचा मृत्यू झाला.

सदरचा प्रकार हा अतिशय गंभीर असल्याने पोलीस अधिक्षक सातारा श्री. समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक सातारा श्री. बापू बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी चाई श्रीमती शितल जानचे खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव श्री. गणेश किंद्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, बाई पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बाळासाहे भरणे, पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, तसेच भुईंज पोलीस स्टेशन व जिल्हयातील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी गुन्हयाचे घटनास्थळी भेट दिली. पोलीस अधीक्षक सातारा तसेच अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी सर्व तपास पथकास गुन्हा उघडकीस आणणेच्या सुचना दिल्या.

याच दरम्यान स्थानिक गुन्हे शाखा सातारा तसेच भुईंज पोलीस स्टेशनच्या संयुक्त पथकाने गुन्हयाचा जलदगतीने तपास करताना घटनास्थळाकडे येणारे जाणारे सर्व रस्ते /आरोपींच्या जाण्या येण्याच्या मार्गावरील सीसीटीटी फुटेसपासून सर्वप्रथम गुन्हयातील अज्ञात आरोपी निष्पन्न केले. आरोपीच्या ठावठिकाण्याबाबत माहिती प्राप्त केली असता संशयीत आरोपी है पोलादपुर मार्गे कोकणात गेल्याची विश्वसनीय माहिती प्राप्त झाली. याप्रमाणे तपास पथकाने गुन्हा घडलेल्या रात्रीपासून रायगड तसेच रत्नागिरी जिल्हयात आरोपीचा शोध घेतला असता दिनांक 3 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री सदर आरोपी हे दापोली परिसरात असल्याची गोपनीय माहिती माहिती प्राप्त झाली.

स्थानिक गुन्हे शाखा तसेच पोलीस स्टेशनच्या संयुक्त तपास टीमने दापोली परिसरात संपूर्ण रात्रभर कसोशीने शोध घेतल्यांनंतर अखेर आज दिनांक 1 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी गुन्हयातील २ आरोपी तसेच १ विधीसंघर्षग्रस्त बालक हे दापोली पोलीस स्टेशन हददीतील कर्वे बीच परिसरात दिसुन आल्याने त्यांना पकडण्यात सदर तपास पथकास यश आले आहे. या गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे हे करीत आहेत.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक, सातारा, श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती शितल जानचे खराडे, उपविभागीय पोलीस अधिकारी बाई विभाग श्री. गणेश कि, उपविभागीय पोलीस अधिकारी, कोरेगाव, श्री. अरुण देवकर, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, श्री. बाळासाहेब भरणे, पोलीस निरीक्षक वाई पोलीस स्टेशन, रमेश गर्जे, सपोनि भुईज पोलीस स्टेशन, पोलीस उप निरीक्षक विश्वास शिंगाडे, पोलीस उप-निरीक्षक रामदीप भंडारे, नूईड पोलीस ठाण्याकडील पोलीस अंमलदार विकास गंगावणे, शंकर घाडगे, आनंदा भोसले, जितेंद्र इंगुळकर, प्रशांत शिंदे, सचिन नलावडे, अतुल आयदे, रविराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, संजय गायकवाड स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार तानाजी माने, शरद बेगले साधार मुल्ला, प्रविण फडतरे, गणेश कापरे, अमोल माने, अजित कर्ण प्रविण स्वप्नील दौड, स्वप्नील माने, रोहित निकम, सचिन ससाणे, धीरज महाडीक यांनी सदरची कारवाई केली आहे.