कृष्णा-वेण्णा महोत्सवास प्रारंभ : कृष्णा नदी संगमावर रथाची विशेष पूजा
सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके
महाराष्ट्र-आंध्र आणि कर्नाटक राज्यातील जनतेसाठी वरदायी ठरलेल्या कृष्णा नदीचा महोत्सवास सुरुवात झाली आहे. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सातारा येथील संगममाहूली येथील कृष्णा-वेण्णा नदी संगमावर रथाची आज विशेष पूजा करण्यात आली. पूजेनंतर भाविकांच्या वतीने नदीपात्रातून रथ बाहेर काढत वाजत-गाजत त्याची प्रदक्षिणा करण्यात आली.
सुमारे 350 वर्षाची पारंपरिक असलेला थोत्सव धार्मिक, सांस्कृतिक पध्दतीने भाविकांकडून साजरा केला जातो. दरम्यान आजपासून सुरु झालेल्या या रथोत्सवाच्या पहिल्या दिवशी रथाला कृष्णा वेण्णा नदीपात्रात नेहून स्नान घालण्यात आले.
संगम माहुली येथे कृष्णा नदी महोत्सवास प्रारंभ : कृष्णा-वेण्णा नदी संगमावर रथाची विशेष पूजा pic.twitter.com/MHG4TfViNw
— santosh gurav (@santosh29590931) February 5, 2023
पौर्णिमेपासून सुरु होत असलेल्या या रथोत्सवामध्ये गावकरी तसेच युवक वर्गाने मोठ्या संख्येने उपस्थित राहत सहभाग नोंदवला. विशेष म्हणजे या रथोत्सवात सर्व जातीधर्माचे लोक सहभागी ओतून रथाला ओढण्याचे काम करतात.