जुनी वाहने निघणार भंगारात : 1 एप्रिलपासून निर्णयाची अंमलबजावणी

Old vehicles scrapped

सातारा | जुन्या होणाऱ्या वाहनांमुळे दिवसेंन दिवस वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी 15 वर्षाहून अधिक काळ झालेली वाहने भंगारात निघणार आहेत. सदरचा निर्णय येणाऱ्या 1 एप्रिलपासून लागू होणार आहे. केंद्र शासनाच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्या अंतर्गत 15 वर्षांहून अधिक जुन्या सर्व शासकीय वाहनांची नोंदणी रद्द करण्यात … Read more

राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत कोल्हापूर विभागाला विजेतेपद

basketball tournament

सातारा प्रतिनिधी| शुभम बोडके क्रीडाप्रेमी, खेळाडूंचे, प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढविणाऱ्या राज्यस्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धेत 17 वर्षांखालील मुलांच्या गटात कोल्हापूर विभागाने अजिंक्यपद पटकावले. अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यात मुंबई संघावर तीन गुणांनी मात केली. तर 17 वर्षाखालील मुलींच्या गटात पुणे विभागाने प्रथम क्रमांक पटकावत. पुणे संघाने कोल्हापूर संघावर 13 गुणांनी हरविले. क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र … Read more

तुळसण घाटातील दरोडा 72 तासात उघडकीस : बारामतीतून 5 जणांना अटक

Karad Court

कराड | तुळसण घाटात दरोडा घालून 2 लाख रुपयांची रक्कम लंपास करणाऱ्या पाच आरोपींना 72 तासात अटक करण्यात आली. कराड तालुका गुन्हा अन्वेषण शाखेतील पोलिसांनी संशयित 5 आरोपींना बारामती तालुक्यातून ताब्यात घेतले आहे. आरोपींना कराड कोर्टाने 5 फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात सिताराम धोत्रे (वय- 27), दिनेश रामचंद्र धायगुडे (वय- 29, दोघेही रा. … Read more

पंढरपूरातून अपहरण, आंबोली घाटात दोघांचा मृतदेह : कराडात दहा दिवस मुक्काम

Amboli Ghat Murder

कराड | आर्थिक देवघेवीच्या वादातून पंढरपूरातून अपहरण केलेल्या एकाला कराडात एका घरात दहा दिवस ठेवले. नंतर दारूच्या नशेत मारहाणीत एकाचा मृत्यू झाला अन् त्याचा मृतदेह टाकताना आरोपीचाही पाय घसरून दरीत पडल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात तिसऱ्या साथीदाराने हा सर्व प्रकार सांगितला आहे. दोन्ही मृतदेह आंबोली घाटातून बाहेर काढण्यात आले असून अधिक तपास … Read more

Satara News : 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यास अटक

Satara Crime News

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके सातारा आणि कोरेगाव तालुक्यातील 17 ठिकाणी घरफोड्या टाकत सोन्या-चांदीचे दागिने लुटणाऱ्या चोरट्यास सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने नुकतीच अटक केली आहे. संजय मदने असे दरोडा टाकणाऱ्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून तब्बल 17 घरफोडी करत 34 लाख 72 हजारांचे सोने- चांदीचे दागिने पोलिसांनी ताब्यात घेतले. याबाबत अधिक माहिती अशी की, सातारा … Read more

कराड पालिकेच्या पाणी बिलावर पक्ष, संघटना आक्रमक, सर्व निर्णयांना स्थगिती : आता 6 फेब्रुवारीला बैठक

Karad Water ISSUE

कराड प्रतिनिधी सकलेन मुलाणी कराड शहरात पालिकेने मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने कराडच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. त्यावर मुख्याधिकारी यांनी 15 टक्के सूट जाहीर केली. याबाबतची हॅलो महाराष्ट्रची बातमी समजताच सामाजिक संघटना व राजकीय पक्ष आक्रमक झाले. त्यामुळे अखेर … Read more

कराड नगरपालिकेकडून पाणी बिलात 15 टक्के सूट : लोकशाही आघाडीच्या मागणीला यश

Karad Municipal

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड शहरात पालिकेने गेल्या वर्षभरात शुध्द पाणीपुरवठा करण्यासाठी मीटर प्रमाणे पाणी बिल आकारणी सुरू केली. यामध्ये बिलाची रक्कम मोठी आल्याने अनेक राजकीय पक्ष व संघटना यांनी निवेदन देवून तसेच आंदोलन केली. यामध्ये राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या लोकशाही आघाडीने पाणी बिलात नागरिकांना 20 टक्के सूट द्यावी, अशी मागणी केली होती. यावर आज … Read more

सुषमा अंधारे राष्ट्रवादीचं पार्सल, राजकारणातील फिरता चषक; गजानन काळेंची टीका

Gajanan Kale Sushma Andhare

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सुषमा अंधारे यांच्याबद्दल नवीन शब्द वापरत आहे तो म्हणजे स्टूलवाली बाई होय. कधीकाळी मुंबईत मोर्चे निघायचे तेव्हा अहिल्याताई रांगडेकर, मृणालताई यांना खास पाणीवाली बाई म्हंटल जायचं. त्या महागाई व पाण्याच्या प्रश्नांवर रस्त्यावर उतरल्या. मात्र, कुठलंही कर्तृत्व नसताना, कुठल्याही प्रश्नाला कधीही हात घातलेला नसताना आणि कोणताही प्रश्न सुषमा  अंधारेंनी सोडवलेला नाही. … Read more

Satara News : खंबाटकी बोगद्याजवळ इनोव्हा कारचा भीषण अपघात ; 2 जण ठार तर 6 जण जखमी

सातारा प्रतिनिधी । शुभम बोडके साताऱ्यातील खंबाटकी बोगद्याजवळ गोकर्ण महाबळेश्वरवरून पुण्याच्या दिशेने निघालेल्या इनोव्हा कारवरील चालकाचे नियंत्रण सूटल्याने अपघात झाला. यावेळी कारमधील 2 महिलांचा जागीच मृत्यू झाला तर 6 जण जखमी झाले. रंजना सराफ आणि शांताबाई जाधव अशी मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, आज पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास साताऱ्यातील खंबाटकी … Read more

रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत मुकादम तात्यांचे योगदान अतिशय महत्वाचे

R. S. Salunkhe Mukadam Tatya

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । रयत शिक्षण संस्थेच्या उभारणीत दानशूर बंडो गोपाळा मुकदाम तात्यांचे योगदान अतिशय महत्वाचे आहे. संस्थेचे अध्यक्षपद, चेअरमनपद भुषवून तात्यांनी रयत शिक्षण संस्थेसाठी भरीव काम केल्याचे, मत संस्थेचे सहसचिव आर.एस. साळुंखे यांनी व्यक्त केले. कराड तालुक्यातील कुसूर येथे आयोजित मुकादम तात्या यांच्या 122 व्या जयंती सोहळ्यामध्ये ते बोलत होते. यावेळी साळुंखे पुढे म्हणाले की, … Read more