सरपंचाना विमा संरक्षण देण्याची खासदार श्रीनिवास पाटील यांची मागणी

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना आपत्कालीन परिस्थितीत गावामध्ये जोखमीचे काम करणा-या सरपंचाना विमा संरक्षण द्यावे अशी मागणी खा. श्रीनिवास पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासह उप मुख्यमंत्री व ग्राम विकास मंत्र्यांकडे केली आहे. गावातील कोरोना परिस्थिती हाताळताना सरपंचाना कोरोनाची बाधा होऊन त्यांच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांना विमा कवच देण्यात यावे असे निवेदन … Read more

दुसऱ्या लाटेचा फटका : सातारा जिल्ह्यात 10 हजार 122 लहान मुले कोरोना बाधित तर 1 हजार 500 नागरिकांचा मृत्यू

Satara Civil Dr. Subhash Chavan

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्याला कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात दुसऱ्या लाटेच्या 4 महिन्याच्या कालावधीत 1 हजार 500 मृत्यू झाले आहेत. यामध्ये आतापर्यंत साताऱ्यात 0 ते 14 वयातील 10 हजार 122  लहान मुले बाधित झाले असून 3 मृत्यू झाले आहेत. तिसऱ्या लाटेचा धोका हा लहान मुलांना असल्याचा अंदाज तज्ञाकडून व्यक्त … Read more

सातारा जिल्हावासीयांचा अभिमान : चक्रीवादळात 186 मच्छिमारांना वाचवणारा लेफ्टनंट पायलट शिवम जाधव

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी तौक्ते चक्रीवादळात सापडलेल्या 186 मच्छिमारांना मुंबई येथे समुद्र किनारपट्टीवर नाैदलाच्या टीमने महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. मच्छिमारांना सहिसलामत बाहेर काढणाऱ्या महत्वपूर्ण कामगीरी करणाऱ्या टीममध्ये सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील सणबूर येथील शिवम विठ्ठल जाधव यांचाही समावेश होता. नाैदलाच्या रेस्क्यू आॅपरेशनमध्ये जीवांची तमा न बाळगता लेफ्टनंट पायलट शिवमने मदतकार्य केल्याने जिल्हावासीयांना अभिमान वाटत … Read more

कोयना वसाहतीचे विद्यमान सरपंच राजेंद्र पाटील यांचे कोरोनाने निधन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील कोयना वसाहत ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच तसेच सरपंच परिषदेचे कराड तालुकाध्यक्ष सुर्यकांत उर्फ राजेंद्र आप्पासो पाटील (वय 52) याचे कोरोनाने आजाराने निधन झाले. कोयना वसाहत गावचे दोनवेळा सरपंच पद भूषिवले आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून कोरोनाशी त्यांचा लढा चालू होता. सन 2005 ते 2010 व 2015 पासून आजअखेर त्यांनी सरपंच … Read more

एक बाधित, अख्ख कुटुंब बाधित करतो ; तेव्हा वेळेवर लक्षणे ओळखून रुग्णालयात जाण्याचे पालकमंत्र्यांचे भावनिक आवाहन

सातारा | कोरोनाचा संसर्गाची लक्षणे असूनही काही रुग्ण पुढे येऊन तपासणी करत नाही, एका व्यक्तीमुळे आख्खेच्या आख्खे कुटुंब बाधित होत आहे. ज्या कोणाला कोरोची लक्षणे आढळल्यास त्यांनी न घाबरता तात्काळ रुग्णालयात जाऊन आपली तपासणी करुन घ्यावी, असे भावनिक आवाहन पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले. खटाव तालुक्यातील गुरसाळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 ऑक्सिजन बेडचे कोविड … Read more

थोडासा दिलासा : सातारा जिल्ह्यात नवे 1 हजार 878 पाॅझिटीव्ह तर 31 बाधितांचा मृत्यू

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात शुक्रवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 1 हजार 878 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात कोरोना काळातील उंच्चाकी 3 हजार 124 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. शुक्रवारी दिवसभरात घरी सोडण्यात आलेल्या उंच्चाकी 3 हजार 124 कोरोनामुक्तमुळे काही … Read more

कोरोनासाठी 50 लाखांचे योगदान देण्याचा पाटण पंचायतीचा संकल्प : सभापती, उपसभापतींनी दिले मानधन

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कोरोना महामारीत तालुक्यातील प्रशासन काम करत आहे. पाटण पंचायत समितीही आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ५० लाख रूपये जमा करून योगदान देण्याचा संकल्प करण्यात आला आहे. यासाठी सभापती व उपसभापती एका महिन्याचे मानधन देणार आहेत. तर सदस्यांनीही एका महिन्याचे मानधन द्यावे, असे आवाहन सभापती राजाभाऊ शेलार यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पाटण पंचायत … Read more

तोक्ते चक्रीवादळात सातारा जिल्ह्यातील एकाचा जहाज बुडाल्याने मृत्यू : विनोद वाघ यांचा समावेश

सातारा | अरबी उत्खनन करणारे ‘पी-३०५’ ही बार्ज (नौका) तोक्ते चक्रीवादळाच्या तडाख्याने ओएनजीसीचे जहाज भरकटल्याने बळी गेलेल्यांमध्ये कोरेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील विनोद भाऊसाहेब वाघ (वय ४५) यांचाही समावेश आहे. जहाजावर काम करीत असताना ते समुद्रात बुडाले. शुक्रवारी विनोद वाघ यांचा मृतदेह नौदलाच्या हाती लागला. ओएनजीसी कंपनीच्या तेल उत्खनन प्रकल्पाचे काम एफकॉन इन्फ्रास्ट्रक्चर खासगी कंपनीकडे आहे. … Read more

वैद्यकीय क्षेत्रात खळबळ : कराड तालुक्यात दुसरा बोगस डाॅक्टर पोलिसांच्या ताब्यात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी नारायणवाडी येथील बोगस महिला डॉक्टरची तपासात चाैकशी सुरू असताना पोलिसांनी आणखी एका बोगस डॉक्टरचा पर्दाफाश केला आहे. सुदर्शन हर्षवर्धन जाधव (वय- २६, रा. रेठरे खुर्द) असे त्यांचे नाव आहे. सुदर्शन जाधव हा फार्मासिस्ट असून रेठरे परिसरात डाॅक्टर म्हणून काम करत होता. कराड तालुक्यात तपासात दुसरा डॉक्टर बोगस आढळल्याने वैद्यकीय क्षेत्रात … Read more

जिल्ह्यातील सर्व लसीकरण केंद्रावर 144 कलम लागू : जिल्हाधिकारी शेखरसिंह यांचा आदेश

सातारा | सर्व कोरोना लसीकरण केंद्रावर अनावश्यक गर्दी होवून परिणामी कोरोना विषाणूचा संसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच नागरिक-नागरिकांमध्ये आणि नागरिक व लसीकरण केंद्रावर सेवा देणारे कर्मचारी यांचेमध्ये वाद-विवाद होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. सातारा जिल्हयातील सर्व कोरोना लसीकरण केंद्राचे परिसरात व त्या सभोवतालच्या 100 मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 … Read more