साताऱ्यात विनाकारण फिरणाऱ्यांची होणार कोरोना टेस्ट

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा तालुक्यात काेराेनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. यामुळे संचारबंदीत विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांची आता कोरोना चाचणी करण्याची जबाबदारी पालिका आणि पंचायत समितीवर साेपिण्यात आली आहे. याबाबतचा आदेश सातारा तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तहसिलदार आशा हाेळकर यांनी काढला आहे. गेल्या काही दिवसांपासून विनाकारण फिरणा-यांवर दंडात्मक कारवाईसह वाहन जप्तीची कारवाई पोलिसांनी केली. … Read more

कोरोना बाधित वाढले ः सातारा जिल्ह्यात चोवीस तासात अडीच हजाराकडे पाॅझिटीव्ह

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये 2 हजार 494 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले असल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 21 हजार 432 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 3 हजार 282 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 80 … Read more

पट्टेरी वाघ दिसला ! वनविभागाच्या कॅमेऱ्यात वाघाने केलेल्या शिकारीसोबत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील संवर्धन राखीव वनक्षेत्रात बुधवारी (दि. 28) रात्री वन विभागाने लावलेल्या कॅमेऱ्यात वाघाने केलेल्या शिकारीसोबत आढळून आला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघाचे दर्शन झाले असून व्याघ्र भ्रमणमार्ग सुरक्षित झाल्याचेही दिसून येत आहे. बुधवारी रात्री  शिकार केल्यानंतर वाघ वन विभागाच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सह्याद्री व्याघ्रच्या कॉन्झर्वेशन रिझर्व्ह … Read more

गज्या मारणेच्या टोळीतील 14 जण पोलिसांच्या ताब्यात, पैशाच्या वसुलीसाठी चाैकशीत निष्पन्न

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात टाळेबंदी व जिल्हाबंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या 14 जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले.  वाई येथे हे सर्व जण पैशाच्या वसुलीसाठी आल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. यातील काही लोकांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्यांच्याकडे पोलिस कसून चौकशी करत आहेत. वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी … Read more

चोवीस तासात शेळ्या चोरट्यास अटक, दोघेजण पळून गेले

crime

कराड | कराड तालुक्यातील शहापूर येथील पाच शेळ्या चोरल्याचा गुन्ह्याचा उलगडा करण्यात मसूर पोलिसांना अवघ्या चोवीस तासात यश आले आहे. आरोपीला गुन्ह्यात वापरलेल्या कारसह अटक केली. सदरची घटना गुरुवार, दि. २९ रोजी घडली. नईम सलीम मुल्ला (रा. ओगलेवाडी) अटक केलेल्याचे नाव आहे. तर अन्य दोघे जण पळून गेले आहेत. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, … Read more

माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून कराड दक्षिणेस ६ कोटींचा निधी मंजूर

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड दक्षिण मतदारसंघातील गावांच्या विकासासाठी माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून २५१५ व स्थानिक विकास निधी मधून ६ कोटींचा निधी नुकताच मंजूर झाला आहे. माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रयत्नातून ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी २५१५ च्या कामासाठी निधी मंजूर केला आहे. आ. चव्हाण यांनी २५१५ निधीसाठी ग्रामविकासमंत्री हसन … Read more

सातारा जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीटाचा पाऊस

सातारा | सातारा शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी पाचच्या सुमारास सोसाट्याच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. दुपारीपर्यंत तापलेले वातावरण अवघ्या काही काळातच ढगाळ वातावरण होऊन झालेल्या पावसाने सातारा जिल्हावासियांना चिंब केले. गारपीटांच्या वळीव पावसाने रस्त्यांवर होती-नव्हती तीही वाहतूक बंद झाली. या सोसाट्याच्या वाऱ्यासह काही ठिकाणी हानी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सकाळी नऊपासून रकरकीत उन्हाने सातारा जिल्ह्यातील … Read more

माणुसकीचे दर्शन ः पोलिसांमुळे चार वर्षाच्या मुलांच्या सर्जरीचा मार्ग मोकळा

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी कराड तालुक्यातील म्होप्रे येथील गंभीर भाजलेल्या चार वर्षाच्या मुलांची सर्जरी करण्यासाठीचा सोशल मीडियावरील मेेसेज सातारा पोलीस दलातील 2014 च्या बॅच पोलिसांच्या असलेल्या व्हाट्सअप ग्रुपवर येऊन पोहचला. अन् क्षणांचाही विलंब न लावता पोलिस थेट मदतीसाठी हाॅस्पीटलला पोहचले. त्यामुळे आता पैशाविना खोळंबलेली सर्जरीचा मार्ग पोलिसांच्या माणुसकीने मोकळा होणार आहे. म्होप्रे येथे गतमहिन्यात … Read more

पुसेसावळी, काशिळ येथे कोरोना सेंटर सुरू करा, अन्यथा उपषोण करणार ः धैर्यशील कदम

Dhairyshil Kadam Satara

खटाव | कोरोनामुळे अवघे ग्रामीण तसेच शहरी भागातील जनजीवन ढवळून निघालेले आहे. यामध्ये खटाव तालुक्यातील पुसेसावळी व काशिळ याठिकाणी रुग्णांचे होणारे हाल रोखण्यासाठी तात्काळ कोरोना केअर सेंटरची निर्मिती करणे आवश्यक आहे. तरी पुसेसावळी व काशिळ येथे शासनाने तात्काळ कोरोना सेंटर सुरू करावे. अन्यथा काशीळ येथील ग्रामीण रुग्णालयाच्या बाहेर ५ मे रोजी आमरण उपोषणाला बसणार आहे, … Read more

पुणे बंगळूर महामार्गावरील फर्निचर दुकानाला आग; हायवेलगत आगीचा थरार पहाण्यासाठी लोकांची गर्दी

Fire

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी पुणे बंगळूर महामार्गावरील फर्निचर दुकानाला गुरुवारी आग लागली. कराड जवळील मलकापूर येथील लाॅटस फर्निचर दुकानाला आग लागून यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाने वेळेवर पोहोचत ही आग आटोक्यात आणली आहे. सदर आग कशी लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. या आगीचे रुप इतके भयंकर होते की हायवेलगतचा … Read more