कृष्णा कारखान्यांच्या मनोमिलनाचे शिवधनुष्य विश्वजित कदम याच्या खांद्यावर; इंद्रजीत मोहिते अन् अविनाश मोहितेंचे मनोमिलन होणार?

Avinash Mohite Indrajeet Mohite

हॅलो महाराष्ट्र आॅनलाईन | रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणुक डॉ. इंद्रजित मोहिते व माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या मनोमिलनाचे शिवधनुष्य सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी उचलले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे विश्वजित कदम यांना मदत करत असल्याचे दिसून येत आहे. मनोमिलनासाठी कराडमध्ये खलबते होवू लागले आहेत. … Read more

औषध कंपन्यांकडून सरकारची खंडणी न ठरल्याने जनता मृत्यूच्या दाढेत ः सदाभाऊ खोत 

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्य सरकारने रेमडेसीवीर इंजेक्शन खरेदी केले नाहीत आणि ना प्रायव्हेट मेडिकल यांना ती इंजेक्शन खरेदी करून दिली. याचं कारण स्पष्ट आहे, औषध निर्माण मंत्रालयाला यातून खंडणी गोळा करायची होती. देशामध्ये कुठेही मेडिकलवाल्यांनी हे इंजेक्शन खरेदी करू नये, हा आदेश नसताना महाराष्ट्रातच हा आदेश निघतो कसा. कारण औषध निर्माण मंत्रालयाचं कमिशन … Read more

शहिद जवान सोमनाथ तांगडे यांच्यावर शासकीय इतमात अंत्यसंस्कार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील ओझर्डे गावाचे शहिद जवान सोमनाथ अरविंद तांगडे (वय-38) यांचे पार्थिव रात्री उशिरा गावी आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने बंदोबस्त ठेवला तरी लोकांनी उपस्थित राहून जवान सोमनाथ यांना अखेरचा निरोप दिला. सोमनाथ यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती त्यांना शासकीय इतमात अंत्यसंस्कार करण्यात आले. सिक्कीम येथे बर्फाळ भागात … Read more

सातारा जिल्ह्यातील “हे” गाव कोरोनाचा हॉटस्पॉट, गावातील प्रत्येक घरात पेशंट

Ekambe

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके महाराष्ट्रात करोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. सातारा जिल्ह्यात सुद्धा गेल्या काही दिवसापासून कोरोनाने कहर माजवला आहे. जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एकंबे या गावात कोरोनाचा हॉटस्पॉट तयार झाला आहे. दिवसभरात केल्या जाणाऱ्या टेस्टिंगच्या ५० टक्के रूग्ण गावात सापडत असल्याने प्रशासनासह लोकांच्या डोकेदुखीत वाढ झालेली आहे. सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील एकंबे या … Read more

वाळू चोरी प्रकरणी गुन्हा दाखल ः चार लाख चार हजारांचा मुद्देमाल जप्त

Falthan

फलटण प्रतिनिधी | प्रभाकर करचे अनधिकृतरित्या गौण खनिजाचे उत्खनन व वाहतूक( वाळू चोरी) केल्याप्रकरणी फलटण तालुक्यातील कुरवली बुद्रुक येथील दोघांविरुद्ध फलटण ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी एक ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू असा सुमारे चार लाख चार हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, … Read more

सातारा जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह 81 हजार 827 ः नवे 1 हजार 434 वाढले

Satara corona patient

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांची दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर आढळून येण्याचे रेकाॅर्ड चालूच आहे. गेल्या दोन दिवसात मृत्यूचा आकडा वाढला असल्याने स्मशानभूमी अंत्यसंस्कारासाठी कमी पडू लागली आहेत. कोरोना बाधित बरे होण्याच्या प्रमाणापेक्षा पाॅझिटीव्हचा दर वाढला आहे. गेल्या चोवीस तासांत 1 हजार 434 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची … Read more

बेकायदा देशी दारू विक्री प्रकरणी एकावर गुन्हा

Policeraid

कराड | शहागाव (ता. कराड) येथील आदित्य परमिट रूम बिअरबार नजीक बेकायदा देशी दारू विक्री होत असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकला. त्यामध्ये 33 हजार 696 रुपयांची देशी दारू पोलिसांनी जप्त केली आहे. याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. नागेश शिवाप्पा जालवादी (वय 49, रा. मसूर, ता. कराड) असे गुन्हा … Read more

महाबळेश्वर पालिकेकडून पर्यंटकांना करवाढीचा झटका

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी महाबळेश्वर येथे पर्यटकांना लागु असलेला प्रवेशकर, प्रदुषणकर व नौकाविहाराच्या दरात वाढ करण्याचा निर्णय पालिकेकडून घेण्यात आला आहे. लॉकडाउन नंतर येणाऱ्या पर्यटकांना वाढलेला प्रवेशकर देवुनच शहरात यावे लागणार आहे. या दरवाढीमुळे पालिकेच्या तिजोरीत वर्षाला साधारण दिड कोटींची भर पडणार आहे. टोल मुक्त महाबळेश्वरचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांना पालिकेने केलेल्या दरवाढीला सामोरे जावे … Read more

सातारा जिल्ह्यातील जवानाला सिक्किममध्ये वीरमरण

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके वाई तालुक्यातील ओझर्डे गावाच्या जवानाला सिक्किममध्ये वीरमरण आले आहे. सोमनाथ अरविंद तांगडे (वय-38) असे जवानाचे नाव असून आज संध्याकाळ पर्यंत मृतदेह ओझर्डे गावी पोहचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सिक्कीम येथे बर्फाळ भागात सेवा बजावत असताना वादळी वाऱ्यात सापडून जवान सोमनाथ जखमी झाले होते. त्यानंतर मिलिट्री हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू … Read more

घाबरू नका, कोरोना व्हायरस नाही ः बंडातात्या कराडकरांचे प्रसिध्दीपत्रकांने खळबळ

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी गेले वर्षभर कोरोनाचा खेळ खेळणारे सरकार आता कोरोना लस घेण्यासाठी परत एकदा कोरोनाची लाट आल्याचे नाटक करून भारतीयांची फसवणूक करून लुटत आहे. कोरोनाची कल्पना बिल गेट्सच्या डोक्यातून निर्माण झाली असून भारतासह अनेक देश बिल गेट्सची खेळणी आहेत. जगातील अनेक तज्ञ ओरडून सांगत आहेत. तरीही लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्याचा चालू आहे. … Read more