महाविकास आघाडीचे स्टेरींग शिवसेनेच्याच हातात : शंभूराज देसाई

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून अजूनही महाविकास आघाडीचे स्टेरींग शिवसेनेच्याच हातात असल्याची कोपरखळी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी मारली. पोलिस दलाला गाड्या सूपूर्द प्रसंगी शहरात फेरफटका मारण्यात आला. यावेळी गाडीचे स्टेरींगवर स्वतः शिवसेनेचे आ. शंभूराज देसाई यांनी ताबा घेतला होता. तर शेजारी राष्ट्रवादीचे आमदार व सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील बसले … Read more

अत्याचार प्रकरणातील आरोपीला पकडणाऱ्या पोलिसांचा गृहराज्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार

सातारा प्रितिनिधी । शुभम बोडके सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून मागील आठवड्यात पारधी समाजातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्यास सातारा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्याबद्दल पोलिसांचा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शाल, श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार केला. यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल, … Read more

पोलिसांच्या रजा वाढल्या : शंभूराज देसाई यांचे पोलिस विभागाकडून आभार

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके गृह विभागातील पोलीस कर्मचाऱ्यांना वर्षभरात 12 किरकोळ रजा मिळत होत्या. आता त्या 20 दिवसांच्या केल्या आहेत. त्याबद्दल पोलीस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे पुष्पगुच्छ देऊन आभार मानले. सातारा येथील शासकीय विश्रामगृहात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधिक्षक अजित बोऱ्हाडे व पोलीस विभागातील … Read more

किरीट सोमय्यांच्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही – शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कोव्हीडच्या घोटाळ्यावरून आरोप केले जात आहेत. दरम्यान सोमय्यांच्या आरोपांबाबत शिवसेना नेते तथा गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “किरीट सोमय्या हे दररोज नवनवीन आरोप करत असतात. त्यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसल्याचा निर्वाळा मंत्री … Read more

पाटण तालुक्यातील 22 गावातील पाणंद रस्ते मंजूर; गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांचे प्रयत्न

पाटण प्रतिनिधी। सकलेन मुलाणी पाटण मतदार संघातील पाणंद रस्त्यांची कामे अनेक दिवसांपासून प्रलंबित होती. ती मार्गी लागण्याकरीता गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी प्रयत्न केले. त्यानंतर यातून 22 गावातील सुमारे 27 किमी लांबीच्या कामांना 2021- 22 वर्षाच्या वार्षिक आराखडयात समावेश करत मंजुरी देण्यात आली. शासनाने नव्याने सुरु केलेल्या मातोश्री ग्रामसमृध्दी शेत/पाणंद रस्ते, योजनेतून मंजूर होण्यासाठी रोजगार हमी … Read more

“पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना पाटणची जनता बळी पडली नाही”; सत्यजित पाटणकरांचा शंभूराज देसाईंवर हल्लाबोल

पाटण प्रतिनिधी । सकलेन मुलाणी सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी पाटण नगर पंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पाटणकर गटाने सत्ता अबाधित ठेवली. या ठिकाणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांना धक्का सहन करावा लागला. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस नेते सत्यजित पाटणकर यांनीविजय उमेदवारांचे अभिनंदन केले. त्यानंतर “पारंपारिक विरोधकांच्या भुलथापांना पाटणची जनता बळी पडली नाही,” अशी टीका करीत … Read more

शासनाने लावलेल्या निर्बंधांची राज्यात कडक अंमलबजावणी करा – गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी राज्य सरकारने नवी नियमावली जाहीर केली आहे. त्या नियमावलीनुसार आता राज्यात रात्रीची संचारबंदी लागू असणार आहे. राज्यात वाढता कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध लावले आहेत. त्या निर्बंधांची राज्यासह जिल्ह्यात कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस विभागाला केल्या. तसेच पोलिसांना कारवाईची हौस नाही. मात्र, … Read more

बिबट्या सापडला असता तर 100 टक्के शिवबंधनच : ना. शंभूराज देसाई

Shivsena

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके राज्याचे गृहराज्यमंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाई यांच्या पाटण तालुक्यातील मरळी- दौलतनगर येथील कारखाना स्थळावरील निवासस्थानी बिबट्याचे शुक्रवारी दर्शन झाले. घराच्या बागेतून बिबट्या फेरफटका मारुन गेल्याचा सीसीटीव्हीतील व्हिडिअो व्हायरल झाला होता. सुरक्षा रक्षकाने बिबट्याचा पाठलागही केला. जर बिबट्या सापडला असता तर त्याला 100 टक्के शिवबंधन बांधले असते, अशी मिश्किल प्रतिक्रिया … Read more

2024 ला तुम्हाला सुपरहिट शोले पिक्चर दाखवतो; शंभूराज देसाईंचे पाटणकरांना खुलं आव्हान

सातारा प्रतिनिधी | सकलेन मुलाणी  सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक निकालानंतर पाटण मतदारसंघात पुन्हा एकदा राजकीय आरोप प्रत्यारोपाना सुरुवात झाली आहे. दरम्यान, आगामी 2024 विधानसभा निवडणुकीत तुम्हाला सुपरहिट शोले पिक्चर दाखवतो असे म्हणत गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांना खुलं आव्हान दिले आहे. ते नाटोशी ते कुसरुंड रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रमात बोलत … Read more

ही परिवर्तनाची नांदी; सत्तेची गुर्मी अन् पैशांची मस्ती मतदारांनी मोडून काढली – पाटणकर

कराड : राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांचा आज सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकित पराभव झाला. राष्ट्रवादीच्या सत्यजितसिंह पाटणकरांनी या निवडणुकित विजय मिळवला आहे. निकाल जाहिर होताच सत्यजितसिंह पाटणकर यांनी हॅलो महाराष्ट्र सोबत खास बातचीत केली. यावेळी बोलताना ही परिवर्तनाची नांदी आहे. सत्तेची गुर्मी अन् पैशांची मस्ती मतदारांनी मोडून काढली अशी प्रतिक्रिया पाटणकर यांनी दिली आहे. … Read more