सातारा प्रितिनिधी । शुभम बोडके
सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरातून मागील आठवड्यात पारधी समाजातील अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणाऱ्यास सातारा पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली. त्याबद्दल पोलिसांचा राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शाल, श्रीफळ आणि बुके देऊन सत्कार केला.
यावेळी पोलीस अधीक्षक अजय कुमार बसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे, सहा. पोलीस अधीक्षक आँचल दलाल, पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, विश्वजीत घोडके, भगवान निंबाळकर व पोलीस विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई म्हणाले, “अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद आहे. अशा अत्याचार करणाऱ्या आरोपीस सातारा पोलीस दलाने तात्काळ तपास करून गुन्हा दाखल केला आहे. समाजातील अपप्रवृत्तीना पायबंद घालण्यासाठी पोलीसदल नेहमीच आपले कर्तव्य बजावीत असतात. स्थानिक गुन्हे शास्खा, सातारा शहर पोलीस व सातारा तालुका पोलीस यांनी संयुक्त प्रयत्न करून आरोपीस तात्काळ अटक केलेली आहे. त्याबद्दल या तिन्ही टीमचे मी माझ्या निवासस्थानी बोलावून विशेष कौतुक करीत आहे.
सातारा येथे नुकत्याच अल्पवयीन मुलीचा शारीरिक अत्याचार करून सोनगाव ता. जि. सातारा येथील पॉलीटेकनीक कॉलेज जवळील निर्जन भागात सोडून आरोपी पळून गेला होता. गुन्हा लक्षात घेऊन गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा पोलीस दलाला तातडीने तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोहाडे, सहा पोलीस अधीक्षक अचल दलाल यांनीही घटनास्थळी तातडीने भेट दिली.
तसेच या प्रकरणाचा तपास करण्यास सुरुवात केली होती. या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक किशोर घुमाळ, सातास तालुका पोलीस ठाणे, पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सातारा शहर पोलीस ठाणे पोलीस निवेशक भगवाया संयुक्त पथकाने आडकीस आणला आहे.