अवघ्या चार वर्षाचा ‘वंडरबॉय’, तीन जागतिक विक्रम केले नावावर

सोलापूरच्या तणविर पात्रो या चार वर्षीय बालकाने तीन जागतिक कीर्तीचे विक्रम केले आहेत. इंग्रजी, मराठी, ओडिया, हिंदी भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या तणविरला २७ डिसेंबर २०१८ ला ‘वंडर बुक ऑफ रेकॉर्डसचा “इंटरनॅशनल अमेझिंग वंडर कीड’ हा किताब मिळालाय तर, २८ डिसेंबर २०१८ रोजी त्याने इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्डस मध्ये जागतिक विक्रम केला.

राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात, रणजितसिंह निंबाळकरांचा दावा

राज्यात सत्तास्थापनेचा पेच अजूनही कायम असतानाच राष्ट्रवादीचे ९ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा खळबळजनक दावा माढ्याचे भाजपचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केला आहे.

करमाळ्यात मतदानाला गालबोट, संजय शिंदेंच्या कार्यकर्त्यांकडून मारहाणीचा प्रकार

सोलापूर प्रतिनिधी । अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांना जबर मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सकाळी घडली आहे. या मारहाणीत नारायण पाटलांचा कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. डोक्याला जबर मार बसल्याने कार्यकर्ता रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. त्याला उपचारासाठी तात्काळ नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. माढ्यातील दहिवली भागात … Read more

सोलापुरात मतदान केंद्रात शिरले पाणी; मतदानावर परिणाम

या विधानसभा निवडणुकीमध्ये निसर्गाने उमेद्वारांचीच नाही तर मतदारांनचीही परीक्षा घेण्याचे ठरवले आहे. यंदा महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाने कहर केला आहे. अद्यापदेखील राज्यात पावसाच्या संततधारेने जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रचारादरम्यान देखील पावसाने अनेक सभा, रॅलीचे नियोजन फिस्कटवले. काही सभा आणि रॅली भर पावसात देखील पार पडल्या.

“तुझी इच्छा असेल तर माझी तुझ्याशी लग्न करायची तयारी आहे.. !!” महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या आंतरजातीय लग्नाची रंजक गोष्ट

“मी तिच्याजवळ लग्नाचा विषय काढला त्यावेळी ती हलकेच हसली. तिला त्या वेळी मी लॅक्मे पावडरची डबी भेट दिली होती. त्यावेळी तिला मी दिलेली ही पहिली भेटवस्तू. तिचं वागणं, तिचं बोलणं, तिचा स्वभाव मला आवडायचा. ती कमी बोलायची. हातचं राखून बोलायची. पण तिला चांगल्या फुलांची, चांगल्या गाण्यांची आवड होती. तिच्या आणि माझी आवडीनिवडी सारख्याच होत्या. तिच्या भावाला मात्र आमचं असं एकत्र असणं पटत नव्हतं.”

बंडखोरांवर सुटला शिवसेनेचा बाण; १४ बंडखोरांची एकाच दिवशी हकालपट्टी

शिवसेनेने सोमवारी तब्बल १४ लोकांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. सोलापूर दौऱ्यावर असणाऱ्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली आहे.

मोहोळमध्ये रस्ता दुरुस्तीच्या कारणास्तव ४ गावांचा मतदानावर बहिष्कार

पंढरपूरकडे येण्यासाठी सदरच्या चार गावांना एकच रस्ता आहे. गावातील १५०० विद्यार्थ्यांना माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी सुस्ते व पंढरपूरला जाव लागतं. मात्र हा रस्ता खराब असल्याने एसटी वेळेत येत नाही. तसेच घरी परत येण्यास वेळ होत असल्याने या भागातील तरुणांना उच्च शिक्षणापासून वंचित रहाव लागतं.

येरवडयाची हवा खाऊन या, कसं वाटतंय बघा – ईडी प्रकरणावरून सदाभाऊ खोतांचा शरद पवारांना टोला

पंढरपूर विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार सुधाकर परिचारक यांच्या प्रचारसभेत खोत बोलत होते. मंगळवेढा येथे बोलत असताना त्यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्यावर टीकास्त्र सोडले.

कुस्ती पैलवानांशी होते, ‘अशां’शी नाही; बार्शीच्या बालेकिल्ल्यातून पवारांचे फडणवीसांवर टीकास्त्र

अमित शाह कलम ३७० वर मला जवाब दो म्हणतायत, तर मी त्यांना ठासून सांगू इच्छितो, “आमचा कलम ३७० हटवण्याला पाठिंबा आहे, तुम्ही ते कलम रद्द केलं त्याबद्दल तुमचं अभिनंदन, मात्र भाजपने आता अनुच्छेद ३७१ बद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी. देशाचा सर्वांगीण विकास व्हावा असं भाजपला वाटत असेल तर ३७० आणि ३७१ वर भाजपा वेगळी भूमिका का घेत आहे?

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्याचा शिवसेनेला पाठिंबा; शेकाप अडचणीत

राष्ट्रवादीचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी शिवसेनेचे उमेदवार शहाजीबापू पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.