लाॅकडाउनमुळे घरात आहात अन् इंटरनेट स्लो आहे? हा जुगाड करुन पहा

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । देशात लॉकडाउननंतर वर्क फ्रॉम होममुळे इंटरनेटवर बराच परिणाम होत आहे. सर्व कंपन्यांनी आपल्या कर्मचार्‍यांना आणि सरकारी कार्यालयांच्या अधिकाऱ्यांना घरून काम करण्याची सुविधा दिली आहे. परंतु घरातुन काम करणाऱ्या लोकांना इंटरनेटची समस्या जाणवत आहे. बँडविड्थ समस्या काय आहे? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नेटफ्लिक्स, यूट्यूब, झूम आणि इतर प्रवाहित सेवा हाताळण्याची उत्तम क्षमता … Read more

भारतीय सैन्य दलाच्या केंद्रीय राखीव दलात सोलापूरची कन्या भरती- गावकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव

सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथील काळे वस्तीवरील सोनल राजेंद्र तळेकर ही भारतीय सैन्य दलात भरती झाली आहे. सोनल तळेकर हिची केंद्रीय राखीव दलात निवड झाली असून सोनल ही केम गावामधून सैन्यात भरती होणारी पहिली मुलगी आहे. त्यामुळे तिचे गावामधून विशेष कौतुक होत आहे.#Hello Maharashtra

दीपिकाचा ‘छपाक’ मध्यप्रदेशमध्ये टॅक्स फ्री

इंदौर : अभिनेत्री दीपिका पदुकोणचा बहुचर्चित ‘छपाक’ चित्रपट मध्यप्रदेश राज्यामध्ये टॅक्स फ्री करण्यात आला आहे. मध्यप्रदेशच्या सरकारने हा निर्णय घेतला आहे. छपाक हा चित्रपट उद्या १० जानेवारी रोजी देशभर प्रदर्शित होणार आहे. मध्यप्रदेशमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार असून मुख्यमंत्री कमलनाथ यांनी हा निर्णय घेतला आहे. छपाक हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून तरुणीवर झालेल्या ऍसिड हल्ल्याविषयी … Read more

 महिलांसाठी कौशल्य विकास कार्यशाळा; पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासनाचा पुढाकार

स्त्री शिक्षणाचा पाय रचणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव असलेल्या नायगाव येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व सातारा जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी महिलांसाठी उद्योजगता प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास कार्यशाळा पार पडली.

पाय घसरल्याने डोंगरावरून पडून तरुणीचा दुर्दैवी मृत्यू;पोलीस होण्याचे स्वप्न राहिले अर्धवटच…

पोलीस खात्यात भरती होण्यासाठी मैदानी सराव करण्यासाठी गेलेल्या 21 वर्षीय तरुणीचा पाय घसरून ती 100 फूट खोली पडली.

वाचनानं आम्हाला काय दिलं? – भाग ५

अथांग ज्ञानाचा पसारा उघडणारी एक अमूल्य चावी म्हणजे वाचन. एक अशी मैत्री पुस्तकांसोबत जी सदासर्वकाळ सोबत करते. सत्संगती, विवेक, संस्कार यांचे पैलू मनाला पाडते. आयुष्यातील सगळ्यात कठीण प्रसंगी सगळं काही गमावूनही खंबीरपणे उभ राहण्याचं बळ वाचनाच्या संचितामुळे मिळतं.

बाप झाला उशाचा साप ; वह्या पुस्तकाला पैसे मागितले म्हणून पाचले विष

नाशिक प्रतिनिधी |  जन्मदेता बापच मुलांचा वैरी झाल्याची दुर्दैवी घटना नाशिकमध्ये घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील शिंदे पळसे गावात हि घटना घडली असून मुलांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर विषाचा बराचसा अंश पोटात गेल्याने मुलांची परिस्थिती गंभीर असल्याचे त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले आहे. शाळा सुरु होऊन जवळपास महिना उलटला तरी शाळेत जाणाऱ्या … Read more

पावसामुळे महाविद्यालयीन परीक्षा पुढे ढकलल्या

मुंबई | रात्रभरापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. रेल्वे वाहतुकीवर पावसामुळे परिणाम झाला आहे तर शाळा, महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठ संलग्न सर्व महाविद्यालयाना सुट्टी जाहीर करण्यात आल्यामुळे ज्या महाविद्यालयांच्या परीक्षा आज होणार आहेत, त्या सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत, त्या परीक्षेचे नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर … Read more

संभाजीराजे म्हणतात… आरक्षण गेलं खड्ड्यात

मुंबई प्रतिनिधी | आरक्षण गेलं खड्ड्यात असे म्हणून संभाजी राजे भोसले यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण मोफत करण्याची मागणी केली आहे. उस्मानाबाद येथील देवळाली गावातील मराठा समाजातील युवक अक्षय शहाजी देवकर याने चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही म्हणून आत्महत्या केली आहे. त्याला दहावीला ९४ टक्के एवढे गुण मिळाले आहेत. या घटनेनंतर संभाजीराजे भोसले यांनी ट्विटर वरून संताप … Read more

राज्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदाच्या ५७१६ जागा

पोटापाण्याची गोष्ट|महाराष्ट्र आरोग्य समितीमार्फत राबविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा ६ किंवा ८ महिन्यांकरिता कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. समुदाय आरोग्य अधिकारी पदांच्या ५७१६ जागा अमरावती ४५५ जागा, यवतमाळ ४०२ जागा, सिंधुदुर्ग २०१ जागा, ठाणे १४५ जागा, रायगड २०२ जागा, सातारा … Read more