घटनेतील देशाचे नाव ‘इंडिया’ बदलून ‘भारत’ करण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

नवी दिल्ली । इंडिया हे देशाचे नाव बदलून भारत असे ठेवण्यात यावे अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली. या याचिकेची प्रत संबंधित मंत्रालयाला पाठवावी, संबंधित मंत्रालय त्यावर निर्णय घेईल, असे कोर्टाने म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये नमूद असलेले देशाचे ‘इंडिया’ हे नाव बदलून फक्त ‘भारत’ इतकेच ठेवण्याबाबत या याचिकेत याचिकाकर्त्यांनं म्हटलं … Read more

काही दिवसातच मल्ल्या जाणार गजाआड, भारतात आणण्यासाठीची कायदेशीर कारवाई झाली पूर्ण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फरारी मद्य व्यावसायिक आणि किंगफिशर एअरलाइन्सचा संस्थापक विजय मल्ल्या याचे पुढील काही दिवसांत कधीही भारतात प्रत्यार्पण केले जाऊ शकते. इंग्लिश बिझिनेस इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, मल्ल्याच्या प्रत्यार्पणाशी संबंधित सर्व औपचारिकता पूर्ण झाल्या आहेत. माजी खासदार आणि देशातील सर्वात मोठी दारू कंपनी असलेल्या युनायटेड ब्रुव्हरीजचा मालक मल्ल्या याने किंगफिशर एअरलाइन्स सुरू … Read more

डीजीसीएने विमानातील मधल्या सीटसंदर्भातील नियम बदलले,३ जूनपासून लागू होणार नवीन नियम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतातील सर्व एअरलाइन्स कंपन्यांना आता आपल्या विमानातील मधली सीट प्रवासावेळी रिकामी ठेवावी लागणार आहे. प्रवाशांच्या सुरक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या टीकेनंतर सिविल एविएशन रेगुलेटरी डीजीसीएने हा निर्णय घेतला आहे. मात्र, यात काही प्रमाणात सूटही देण्यात आली आहे. नव्या गाइडलाइन्समध्ये एअरलाईन्सला आता आपल्या विमानातील मधली सीट रिकामी ठेवण्याचा प्रयत्न करण्यास सांगितले आहे. जर हे … Read more

फडणवीसांचा ‘तो’ दावा आव्हाडांनी ठरवला खोटा, म्हणाले ‘हा’ घ्या पुरावा

मुंबई । महाराष्ट्रात स्थलांतरित मजुरांच्या प्रश्नावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी स्थलांतरित मजुरांचा खर्च केंद्र सरकारनं उचलला असल्याचा दावा पत्रकार परिषदेतून केला होता. त्यानंतर राज्य सरकारनं पत्रकार परिषद घेऊन सर्व खर्च राज्यानं केल्याचं म्हटलं होतं. हा सगळा वाद सुरू असताना स्थलांतरित मजुरांचा प्रश्न गंभीर झाल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून स्यू मोटू … Read more

मजुरांच्या जेवण्याचा आणि त्यांच्या तिकीटांचा खर्च राज्यांनी करावा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश

नवी दिल्ली । कोरोना संकटात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. हातच काम गेल्यानं अनेकांनी घरची वाट धरली आहे. मात्र, घरी जाण्यासाठी पैशाअभावी आणि सरकारी प्रक्रियांमध्ये अडचणीत सापडलेल्या मजुरांचे हाल होत आहे. याची दखल सुप्रीम कोर्टाने घेतली असून या प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी झाली. स्थलांतरीत मजुरांच्या जेवण्याचा आणि त्यांच्या तिकीटांचा खर्च राज्यांनी करावा, असे … Read more

स्थलांतरीत मजुरांच्या प्रश्नावरून मेधा पाटकरांनी ठोठावले सुप्रीम कोर्टाचे दरवाजे

नवी दिल्ली । कोरोना संकटात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न ज्वलंत बनला आहे. हातच काम गेल्यानं अनेकांनी घरची वाट धरली आहे. मात्र, घरी जाण्यासाठी पैशाअभावी आणि सरकारी प्रक्रियांमध्ये अडचणीत सापडलेल्या मजुरांचे हाल होत आहे. स्थलांतरीत मजुरांची सद्य परिस्थिती पाहून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. मेधा पाटकर यांनी सर्वोच्च न्यायालयात स्थलांतरीत मजुरांच्या … Read more

केंद्र सरकारचा घुमजाव! लॉकडाऊन काळात कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार देण्याचा आदेश मागे

नवी दिल्ली । देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योग कंपन्यांनी कामगारांना पूर्ण वेतन देण्याचं आवाहन केलं होतं. पण अवघ्या २ महिन्यांच्या आत केंद्र सरकारवर आपला आदेश मागे घेण्याची वेळ आली आहे. मोदींनी दिलेला शब्द त्यांच्याच सरकारच्या एका नोटिफिकेशनमध्ये ३६० अंशाच्या कोनात फिरवला गेला आहे. त्यानुसार लॉकडाऊनच्या काळात युनिट बंद असलं तरी कर्मचाऱ्यांना त्यांचा … Read more

सर्व राज्यांनी दारू विक्रीसाठी ‘होम डिलिव्हरी’ चा विचार करावा – सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली | सर्व राज्यांनी सोशल डिस्टसिंगचे नियम पाळत कोणताही संपर्क न वाढवता दारूची ‘होम डिलिव्हरी’ करण्याचा विचार करावा,” अशा सूचना सर्वोच्च न्यायालयाने आज सर्व राज्यांना केल्या आहेत. सरकारने लॉकडाउनच्या निर्णयाला मुदतवाढ दिली. तसेच दारू विक्रीला परवानगी दिली. मात्र, दारुविक्रीच्या आदेशात स्पष्टता नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर आज न्यायमूर्ती … Read more

पालघर हत्या प्रकरण सुप्रीम कोर्टात; राज्याला दिले ‘हे’ आदेश

नवी दिल्ली । महाराष्ट्राच्या पालघर जिल्ह्यातील गडचिंचले गावात गेल्या महिन्यात १६ एप्रिल रोजी दोन साधूंची आणि त्यांच्या ड्रायव्हरची जमाकडून मारहाण व हत्या करण्यात आली होती. आता हे प्रकरण सुप्रीम कोर्टाच्या दारात पोहचलं आहे. एका याचिकेद्वारे या प्रकरणाची सुनावणी महाराष्ट्रात न होता दिल्लीत व्हावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टानं या याचिकेची दखल घेत राज्य … Read more

मेडिकल, डेंटल कॉलेज प्रवेशासाठी ‘नीट’ परीक्षा सक्तीची- सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली । सुप्रीम कोर्टाने बुधवारी नीट परीक्षेसंदर्भात 29 एप्रिल (बुधवारी) पार पडलेल्या सुनावणीदरम्यान मोठा निर्णय दिला आहे. देशभरातील मेडिकल आणि डेंटल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा सक्तीची असल्याचं सुप्रीम कोर्टानं सांगितलं. सुप्रीम कोर्टाने सुनावणीदरम्यान सांगितले की, एमबीबीएस, एमडी यांसारख्या महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी नीट परीक्षा देणं अनिवार्य असणार आहे. तसेच यामुळे अनुदानित किंवा विनाअनुदानित अल्पसंख्याक … Read more