Diploma होल्डर आहे अल कायदाचा ‘हा’ दहशतवादी, काडीपेट्यांच्या काड्यांचा वापर करून बनवत होता बॉम्ब

लखनऊ । उत्तर प्रदेश एटीएसने रविवारी अल कायदामधील दोन दहशतवाद्यांना अटक केली. आता सोमवारी सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोठा खुलासा समोर आला आहे. अटक केलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाने चौकशीदरम्यान सांगितले की, तो जवळजवळ दीड वर्षापूर्वी त्याच्या हँडलरच्या संपर्कात आला होता आणि सामान्य वस्तूंमधून बॉम्ब बनवण्यास सांगण्यात आले होते. काकोरी भागातून अटक करण्यात आलेल्या या दोन दहशतवाद्यांना एटीएसने … Read more

“15 ऑगस्टपूर्वी मानवी बॉम्ब बनून लखनऊसह अनेक शहरे हादरविण्याची कट रचला”- ADG प्रशांत कुमार

लखनऊ । रविवारी एटीएसने राजधानी लखनऊमधील काकोरी भागात अल-कायदाच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. यूपीचे एडीजी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, लखनऊ येथून अटक केलेले दोन्ही दहशतवादी अल कायदा समर्थित अंसार गजवतुल हिंद संघटनेशी संबंधित होते. ही लोकं 15 ऑगस्टपूर्वी मानवी बॉम्ब बनून लखनऊसह अनेक शहरे हादरविण्याचा विचार करीत होते. त्यांच्याकडून एटीएसने स्फोटके जप्त केली … Read more

दिल्लीत मोठा कट उधळला! पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये गोळीबार, 5 जणांना अटक

नवी दिल्ली । दिल्लीमध्ये घातापाताचा मोठा कट उधळण्यात पोलिसांना यश आले आहे. दिल्ली पोलिसांचे विशेष पथक आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. लक्ष्मीनगरच्या शकरपूर परिसरात कारवाई करत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. तसेच पोलिसांनी यावेळी मोठ्या प्रमाणात शस्त्र आणि इतर साठा जप्त केला आहे. हे सर्व जण दहशवादी  संघटनांशी संबंधित असल्याचं सांगितलं … Read more

काबुलमध्ये झालेल्या हल्ल्यात 5 ठार, 21 जखमी

काबूल । शनिवारी एकापाठोपाठ जोरात स्फोटांनी अफगाणिस्तानातील काबूल (Kabul) हादरले, एएफपीच्या पत्रकारांनी रॉकेटसारखे स्फोट ऐकले. या घटनेत 5 मृत्यू आणि 21 जखमींची नोंद झाली आहे. अफगाणिस्तानच्या (Afghanistan) राजधानीतील दाट लोकवस्तीच्या भागात हा स्फोट झाला ज्यामध्ये केंद्रामध्ये असलेल्या ग्रीन झोनही सामील आहे. गृह मंत्रालयाचे प्रवक्ता तारिक आर्यन म्हणाले, “आज सकाळी हल्लेखोरांनी काबूल शहरावर 14 रॉकेट डागले. … Read more

मोझांबिकमध्ये नरसंहार, ISIS च्या दहशतवाद्यांनी केला 50 जणांचा शिरच्छेद

मापुटो । दक्षिण आफ्रिकेचा देश मोझांबिकमध्ये (Mozambique) इस्लामिक स्टेट (ISIS) च्या अतिरेक्यांनी एका खेड्यातील 50 जणांचे शिरच्छेद केले. हा भयंकर नरसंहार काबो डेलगाडो राज्यातील नानजबा गावात घडला. फुटबॉलच्या मैदानात 50 जणांचा बळी घेतल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्या मृतदेहांचे तुकडे जंगलात फेकले. त्याचवेळी या गावातील महिलांचे अपहरण करून त्यांना लैंगिक गुलाम केले गेले. बीबीसी आणि डेलीमेलच्या वृत्तानुसार, गावातील … Read more

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दलांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; CRPFचे २ तर १ पोलीस जवान शहीद

नवी दिल्ली । जम्मू काश्मीरच्या बारामुला जिल्ह्यात सुरक्षा दलावर पुन्हा एकदा दहशतवादी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात काश्मीर पोलिसांच्या एका जवानाने तर सीआरपीएफच्या दोन जवानांनी आपले प्राण गमावलेत. दहशतवाद्यांनी बारामुलाच्या क्रेरी भागात हा क्रूर हल्ला केला. दहशतवाद्यांकडून सीआरपीएफ आणि पोलिसांच्या जॉईंट नाका टीमवर बंधुंद गोळीबार केला. आयजी विजय कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘हल्ल्यात जम्मू काश्मीर … Read more

स्वातंत्र्यदिनाच्या आधीच जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, २ पोलीस शहीद, शोध मोहीम सुरु

श्रीनगर । जम्मू – काश्मीरमध्ये १५ ऑगस्टच्या अगोदरच्या दिवशी शुक्रवारी पोलीस पथकावर दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. श्रीनगरमधील नौगाम सेक्टरमध्ये हा हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात २ पोलीस कर्मचारी शहीद झाले आहेत, तर १ कर्मचारी जखमी झाला आहे. जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सध्या संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. पोलिसांवर … Read more

काश्मीरमध्ये CRPF च्या पथकावर दहशतवादी हल्ला; १ जवान शहीद, ३ जखमी

श्रीनगर । दक्षिण काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात असेलल्या बिजबेहरा येथे दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (CRPF) तुकडीवर हल्ला केला. या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचा एक जवान शहीद तर ३ जवान जखमी झाले आहेत. या बरोबरच या हल्ल्याच एका स्थानिक लहान मुलाचा मृत्यू झाला आहे. सुरक्षा दले आणि दहशतवाद्यांमध्ये बिजबेहरा येथे चकमक सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर सुरक्षा … Read more

पुलवामा पुन्हा एकदा दहशतवाद्यांच्या रडारवर; दहशतवादी हल्ल्यात १ पोलीस शहीद तर १ जखमी

श्रीनगर । काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोहीम उघडली आहे. हिजबुल मुजाहिद्दीनचा टॉप कमांडर रियाज नायकूला ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आलं आहे. पण दुसरीकडे दहशतवाद्यांचे सुरक्षा दलांवर हल्लेही वाढले आहेत. पुलवामात सलग दुसऱ्या दिवशी जवानांवर हल्ला झाला आहे. पुलवामामध्ये सुरक्षा दलांच्या एका टीमवर दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या एका संयुक्त पथकावर … Read more

काश्मीरमध्ये बीएसएफच्या पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला; २ जवान शहीद

श्रीनगर । जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या पंदाच भागात सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) पथकावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात भारतीय जवान गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांची हत्यारे दहशतवाद्यांनी पळवल्याचेही वृत्त मिळत आहे. या हल्ल्याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, … Read more