अधिवेशनात विरोधक फाडून खातील म्हणून कोरोनाचं भांडवल ; निलेश राणेंचा गंभीर आरोप

Nilesh rane and uddhav thakarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप नेते निलेश राणे यांनी आज पुन्हा एकदा ठाकरे सरकार वर टीका केली आहे. अधिवेशन तोंडावर आल्यामुळे सत्ताधारी ते टाळण्यासाठी कोरोनाचं भांडवल करत आहेत. अधिवेशनात विरोधक फाडून खातील, अशी भीती सत्ताधाऱ्यांना वाटतेय, अशी टीका निलेश राणे यांनी केलीय. मुंबई महापालिकेत भ्रष्टाचार वाढला आहे. सरकारमधील अनेक मंत्री कुठल्या तरी भानगडीत अडकले आहेत. … Read more

मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढवून सांगता का? मनसेचा सवाल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात आहेत, असा आरोप मनसे नेते देशपांडेंनी केला आहे. तसेच अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात? मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?” असा सवाल  संदीप देशपांडे (Sandeep Deshpande) यांनी केला आहे. अधिवेशनाच्या तोंडावरच सरकार कडून कोरोना रुग्णांचे आकडे … Read more

जनतेला वाऱ्यावर सोडलंय, निदान मंत्र्याला तरी शोधा ; भाजपची बोचरी टीका

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून महाविकास आघाडी सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यातच या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासून ते गायब आहेत. दरम्यान महाराष्ट्र भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी आज याच मुद्द्यावरून सरकारवर बोचऱ्या शब्दांत टीका केली आहे. केशव उपाध्ये यांनी या संदर्भात एक ट्वीट केलं आहे. … Read more

हिंमत असेल तर ठाकरे सरकारने मला थांबवून दाखवावं ; निलेश राणेंचं खुलं आव्हान

Nilesh Rane

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी सरकार कडून निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान भाजप नेते निलेश राणे यांनी … Read more

महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे – चंद्रकांत पाटील

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. महाभकास आघाडीच्या तीन चाकी सरकारच्या प्रत्येक चाकात अनेक ठिकाणी छिद्रे पडली आहेत. अनेक मंत्र्यांच्या कारनामे, भानगडी व मुजोरपणामुळे जनता मेटाकुटीस आलीय, अशी जहरी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे. चंद्रकात पाटील यांनी फेसबुक पोस्ट करत महाविकास आघाडी … Read more

..तर ‘शक्ती कायदा’ चाटायचाय का?; पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी नितेश राणे आक्रमक

nitesh rane uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन |  पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणाला आता वेगळंच वळण लागलंय. या प्रकरणात शिवसेनेचे नेते आणि मंत्री संजय राठोड यांचं नाव आल्यापासून भाजप नेते प्रचंड आक्रमक झाले आहेत. तसेच आता पुन्हा एकदा भाजप कडून राज्यातील ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता। भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणेंनीही पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारवर … Read more

शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का ?? ; मनसेचा संतप्त सवाल

raj and uddhav thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची तारखेनुसारची जयंती ही १९ फेब्रुवारी रोजी साजरी केली जाते. मात्र, यंदा शिवजयंती साजरी करण्यावर कोरोनाचं सावट कायम आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी शिवजयंतीसाठी सरकार कडून निर्बंध लावण्यात आले असल्याने शिवभक्तांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. बुधवारी राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढल्यामुळे … Read more

इतका इगो असेलेलं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पाहिलं नाही ; फडणवीसांचा घणाघात

Fadanvis and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | ठाकरे सरकार कडून राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची विमानप्रवास परवानगी नाकारण्यात आल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापलं आहे. याच मुद्द्यावरून राज्यातील विरोधी पक्ष भाजप कडून ठाकरे सरकार वर निशाणा साधण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या इतिहासातलं इगो असलेलं सरकार मी पाहिलं नव्हतं अस म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे … Read more

राज्यपाल vs ठाकरे सरकार वाद पेटणार ; राज्यपालांच्या विमानप्रवासाला ठाकरे सरकारने परवानगी नाकारली ?

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात ठाकरे सरकार सत्तेत आल्यानंतर आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी  आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद वाढत चालला आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावरून सरकार विरुद्ध राज्यपाल यांच्यातील वाद उफाळून येत आहे. आता तर राज्यपालांच्या हवाई प्रवासाला मुख्यमंत्री कार्यालयाने परवानगीच दिली नसल्याचं समोर आलं आहे. आश्चर्य म्हणजे राज्यपाल कोश्यारी विमानात बसल्यानंतर त्यांना परवानगी नसल्याचं कळलं. … Read more

नाही तर मराठा आरक्षणासाठी आम्ही देखील उपोषणाला बसू ; प्रवीण दरेकरांचा ठाकरे सरकारला इशारा

Darekar and Thackarey

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून वातावरण तापलं असून विरोधी पक्ष भाजप कडून सत्ताधारी महाविकास आघाडीला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणावर लवकरात लवकर तोडगा काढा. नाही तर मराठा तरुणांबरोबर आम्हालाही उपोषणाला बसावं लागेल, असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च … Read more