वंचितसोबत येऊन राज ठाकरेंनी भाजपला दणका द्यावा

सांगली प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडी सोबत राज ठाकरे यांनी येऊन भाजपला दणका द्यावा असे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्वेसर्वा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. राजू शेट्टी यांनी मतविभाजन टाळण्यासाठी वंचितने महाआघाडी सोबत गेले पाहिजे असे मत देखील व्यक्त केले आहे. राज ठाकरे यांची राजू शेट्टी यांनी त्यांच्या निवासस्थळी जाऊन सदिच्छा भेट घेतली होती. या … Read more

वंचितमध्ये फूट पाडण्यात विरोधक यशस्वी ? ; लक्ष्मण मानेंची वेगळ्या गटाची घोषणा

पुणे प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीतून लक्ष्मण माने यांनी फारकत घेऊन नवीन वंचित बहुजन आघाडी स्थापन करण्याची घोषणा आज पुण्यात केली आहे. या घोषणे बरोबरच वंचित बहुजन आघाडीचे दोन गट पडल्याचे आज जाहीर झाले आहे. १९५७ साली झालेल्या निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या दलित चळवळीतून स्थापन झालेल्या पक्षाने लोकसभेच्या महाराष्ट्रात ७ जागा जिंकल्या. त्यानंतर तत्कालीन … Read more

लक्ष्मण मानेंचा बोलवता धनी वेगळाच आहे : गोपीचंद पडळकर

पुणे प्रतीनिधी | लक्ष्मण माने यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांना राजीनामा मागितल्याने वंचित बहुजन आघाडीचे राजकारण ढवळून निघाले आहे. अशात वंचित बहुजन आघाडीचे महासचिव गोपीचंद पडळकर हे प्रकाश आंबेडकर यांची भूज सांभाळण्यासाठी पुढे सरसावले आहेत. लक्ष्मण माने यांचे राष्ट्रवादीशी संबध आहेत. त्यामुळे त्यांचे बोलवते धनी वेगळे आहेत असे गोपीचंद पडळकर म्हणाले आहेत. मी राष्ट्रीय … Read more

वंचितच्या ‘या’ नेत्याने मागितला प्रकाश आंबेडकरांकडे राजीनामा

मुंबई प्रतिनिधी | वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फुट पडण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत. कारण वंचित आघाडीचे नेते आणि माजी आमदार लक्ष्मण माने यांनी प्रकाश आंबेडकर यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे. प्रकाश आंबेडकरांच्या हाताखाली मी काम करू शकत नाही असे लक्ष्मण माने यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हणले आहे. त्यांच्या या वक्तव्याने राजकारणात चांगलीच … Read more

वंचितच्या पडळकरांची काँग्रेसच्या या नेत्यासोबत गोपनीय बैठक

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे खानापूर-आटपाडी विधानसभा मतदार संघात आ.अनिल बाबर यांच्या विरोधात विरोधक एकवटत असून माजी आ.सदाशिव पाटील व गोपीचंद पडळकर यांची मनोमिलन एक्स्प्रेस सध्या जोरदार चर्चेचा विषय बनली आहे. पहिली चर्चा वैभव पाटील, ब्रह्मानंद पडळकर यांच्यात तर दुसरी चर्चा थेट सदाशिव पाटील व गोपीचंद पडळकर यांच्यात झाली. वंचित आघाडी कॉंग्रेसबरोबर राज्यात येईल की … Read more

प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडीबाबत ‘मोठी घोषणा’

मुंबई प्रतिनिधी | लोकसभा निवडणुकीदरम्यान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी कुठल्याही आघाडीत सहभागी न होता स्वबळावर निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मतविभाजनचा फटका बसल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा फटका बसला. लोकसभेप्रमाणे आगामी विधानसभा निवडणुकीत याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी वंचित बहुजन आघाडीने काँग्रेससोबत यावे असे प्रयत्न काँग्रेसच्या नेत्यांकडून सुरु असतांनाच प्रकाश आंबेडकर … Read more

२० जुलैला वंचित बहुजन आघाडीची विधानसभेची पहिली यादी जाहीर करणार : प्रकाश आंबेडकर

मुंबई प्रतिनिधी | आम्ही वंचित आघाडीला अधिक सक्षम करण्यासाठी मित्र पक्ष शोधत आहोत. काही लोकांशी आमची बोलणी सुरू आहेत. ते लोक सोबत आले तर ठीक अन्यथा आम्ही २८८ जागा लढण्यासाठी सक्षम आहोत असे मत वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकरांनी यांनी व्यक्त केले आहे. ते आज मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. तसेच येत्या २० जुलै … Read more

ईव्हीएम मशीनविरोधात सांगलीत घंटानाद आंदोलन

सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे लोकशाहीला काळीमा लागू नये व नागरीकांना मानसन्मान मिळावा या करीता ई.व्ही.एम. मशीन बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूका व्हाव्यात या मागणीसाठी जिल्ह्यात ठिकठिकाणी वंचित आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. सांगली, इस्लामपूर, मिरज, जत सह अनेक ठिकाणी घंटानाद आंदोलन झाले. सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जयसिंग शेंडगे यांच्या नेतृत्वाखाली वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घंटानाद आंदोलन … Read more

पराभव पाहण्यापेक्षा मला मरण का आले नाही : चंद्रकांत खैरे

औरंगाबाद प्रतिनिधी | चंद्रकांत खैरे यांना पराभवाचा झटका सहन होत नाही असेच चित्र सध्या पाहण्यास मिळते आहे. मी सबंध आयुष्य शिवसेनेच्या कामासाठी खर्च केले आहे. हा पराभव पाहण्या आधी मला मरण का आले नाही असे भावनिक उद्गार औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी काढले आहेत. ते शिवसेनेच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते. आयुष्यातील शेवटची निवडणूक म्हणून या … Read more

राष्ट्रवादीचा हा नेता आगामी विधानसभा वंचित बहुजन आघाडीकडून लढणार?

सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे लोकसभा निवडणुकीची धामधूम संपल्यानंतर आता विधानसभेची चाहूल लागली आहे. पुढील चार महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार असून राजकीय हालचालीही त्यादृष्टीने सुरु झाल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला यश मिळाले नसले तरी संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचा प्रभाव पडला. जिल्ह्यातही वंचित आघाडी पाय पसरू लागली असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य शरद लाड यांच्याशी … Read more