विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी भाजपचे कालिदास कोळंबकर

मुंबई प्रतिनिधी । महाराष्ट्र विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदी विधानसभेतील ज्येष्ठ सदस्य कालिदास निळकंठ कोळंबकर यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शपथ दिली. महाराष्ट्राच्या आजच्या राजकीय घडामोडींचा वेग बघता अनेक गोष्टी ह्या वेग घेत आहेत. कालिदास कोळंबकर हे वडाळा विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. त्यांनी आतापर्यंत आठ वेळा या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीच्या … Read more

सत्तास्थानेच्या वाटाघाटीत महाआघाडीतील मित्रपक्ष दुर्लक्षित – राजू शेट्टी

मुख्यमंत्रीपदाच्या वाटणीवरून भाजपसोबत नातं तोडत शिवसेनेनं आता आघाडी सोबत संसार करण्याचे ठरविलं आहे. मात्र शिवसेना आघाडी कुटूंबात सामील होत असताना घरातील अन्य मित्र घटक पक्ष सदस्य आता दुर्लक्षिले जात आहेत. याबाबत महाआघाडीबरोबर विधानसभा लढलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते मा.खासदार राजू शेट्टी यांनी आपली खंत व्यक्त करताना सूचक विधान केलं आहे. नव्या सत्तासमीकरण तयार होत असताना घटक पक्षांना याबद्दल; विचारणाच झाली नसल्याचे शेट्टी यांनी सांगितलं आहे. आम्हाला अद्याप तरी शिवसेनेसोबतच्या सत्तास्थापनेविषयी महाआघाडीतील कुणीही संपर्क केला नसल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आमचं ठरलंच नाही स्वाभिमानी पक्ष बहुमताच्यावेळी योग्य तो निर्णय घेईन, असंही शेट्टींनी  स्पष्ट केल आहे.

उमेदवार बसपाचा, काम केलं राष्ट्रवादीचं; शिक्षा म्हणून बारामतीमध्ये काढली धिंड

अशोक माने यांनी राष्ट्रवादीकडून पैसे घेऊन त्यांचं काम केल्याचं निवडणुकीपूर्वीच बोललं जात होतं. त्यानंतर त्यांच्यावर पक्षाने कारवाईही केली होती.

‘मतदार ओळखपत्र’ नसल्यास १० पैकी कोणताही एक पुरावा ओळखीसाठी असेल ग्राह्य

मुंबई प्रतिनिधी । येत्या सोमवारी २१ तारखेला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटविण्यासाठी आवश्यक ओळखपत्रांची यादी भारत निवडणूक आयोगाने जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाचे मतदार ओळखपत्र (EPIC) नसल्यास पुढील १० पैकी कोणताही एक पुरावा ओळख पटविण्यासाठी ग्राह्य धरण्यात येईल. मतदाराची ओळख पटविण्यासाठी पर्यायी 10 पुरावे :- 1) आधारकार्ड, 2) पॅनकार्ड, 3) ड्रायव्हिंग … Read more

चंदगड मध्ये मोठी राजकीय उलथापालथ ; भाजप समर्थक अपक्ष उमेदवाराला राष्ट्रवादीचा पाठिंबा

मतदानाला अवघे तीन दिवस राहिले असतानाच अनेक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड मतदारसंघात तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांनी अपक्ष उमेदवाराला पाठिंबा दिल्याने एकच खळबळ उडाली आहे. चंदगड मधून काँग्रेस आघाडीकडून राजेश पाटील तर महायुतीकडून संग्राम कुपेकर हे रिंगणात आहेत. या दोघांविरोधात भाजप समर्थक अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील यांनी शड्डू ठोकला आहे.

तुम्हाला फक्त चैनसुख संचेती यांना नाही तर भाजपला निवडून द्यायचे आहे – स्मृती इराणी

मलकापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार चैनसुख संचेती यांच्या प्रचारार्थ केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा आज मलकापूर येथे दौरा होता. रोड शो झाल्यानंतर संचेती यांच्या प्रचारार्थ प्रचार सभाही घेण्यात आली. प्रचार सभेत स्मृती इराणी यांनी चैनसुख संचेती आणि स्वर्गीय भाऊसाहेब फुंडकर यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला.

देशात काँग्रेसची अवस्था चाय पेक्षा किटली गरम असल्या सारखी – लक्ष्मण सौदी

‘राष्ट्रवादी व काँग्रेसला उमेदवार न मिळाल्यानेच त्यांना इतरांची मदत घ्यावी लागली. तसेच काँग्रेस व राष्ट्रवादीची चहापेक्षा किटली गरम झाली असल्या सारखी आहे. अशी टीका कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांनी सांगली येथील भाजपच्या प्रचार सभेत बोलताना केली. दरम्यान सौदी यांनी सांगलीतील व्यापाऱ्यांशी सुद्धा संवाद साधला.

जेव्हा शरद पवारांना काॅलर धरुन विधानसभेतून बाहेर काढण्यात आलेलं…

हॅलो विधानसभा | राज्याच्या राजकारणात शरद पवार हे नाव नवीन नाही. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या राजकीय संस्कारात घडलेले शरद पवार आजही त्याच जोमाने राजकारणात सक्रिय आहेत. आजही वयाच्या ७८ व्या वर्षीही पवार एखाद्या तरुणासारखं संपूर्ण महाराष्ट्र फिरतांना दिसून येत आहेत. त्यामुळे पक्षातील एक एक नेता विरोधी पक्षात जात असतानाही पवारांमध्ये ही जिद्द कोठून … Read more

लातूर ग्रामीणमधील शिवसेनेचा उमेदवारच ‘गायब’ !! धीरज देशमुख बिनविरोध निवडून येणार?

निवडणूक एका आठवड्यावर आलेली असताना उमेदवाराचा अजून प्रचारच सुरु नसल्याने इथल्या लढतीला बिनविरोध लढतीचं स्वरूप आलं आहे. धीरज देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक सोपी झाल्याचच चित्र आहे.

‘राहुल गांधींच्या सभा भाजपच्या जागा वाढवतात’, मुख्यमंत्र्यांचा राहुल गांधींना उपरोधिक टोला

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना विधानसभा निवडणुकीचा प्रचार करताना पाहून मला आनंद झाला. कारण राहुल गांधी जेव्हा प्रचार सभा घेतात. तेव्हा काँग्रेसच्या जागा कमी होतात. आणि भाजपच्या जागा वाढतात. असा उपरोधिक टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. अमरावती जिल्ह्यातील चांदुर रेल्वेचे भाजप सेना महायुतीचे उमेदवार प्रताप अडसड यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री बोलत होते.